धर्मशाळा ते शिमला : हिमालयाच्या कुशीतला अद्भुत प्रवास
हिमाचल प्रदेशाची ओळख म्हणजे स्वच्छ निसर्ग, शांत धवल पर्वत, बर्फाचे गालिचे, देवदारांच्या झाडांचा सुगंध आणि अध्यात्माची अनोखी अनुभूति. या प्रवास कथेत आपण धर्मशाळा, डलहौजी, अमृतसर, मनाली आणि शिमला या सर्व लोकप्रिय स्थानांना जोडणाऱ्या एका संस्मरणीय यात्रेचा अनुभव उलगडून पाहणार आहोत.
धर्मशाळा : दलाई लामांच्या सान्निध्यातील शांत पर्वतांची नगरी

धर्मशाळा हा तिबेटी संस्कृतीचा जीवंत वारसा जपणारा प्रदेश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. येथील मॅक्लोडगंज, नड्डीलेक, बक्षूनाग मंदिर, ध्रुवबाळ मंदिर आणि विशेष्याने दलाई लामा मंदिर या ठिकाणी भेट देताना मनाला विलक्षण शांतता लाभते.
धर्मशाळा ते डलहौजी मार्गात निसर्गाच्या कुशीत वसलेला मॉल रोड प्रवाशांचे मन मोहून टाकतो.
डलहौजी ते खज्जियार: मिनी स्वित्झर्लंडची ओळख

खज्जियार हे भारताचे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते.
हिरव्यागार माळरानांवर उभे असलेले पानझडी वृक्ष, स्वच्छ तलाव, थंडगार हवा आणि शांतता, हे सगळे मिळून त्याला एक अद्भुत सौंदर्य प्रदान करतात.
स्थानिक हस्तकला, स्मरणिका, चर्च, सुंदर दृश्ये आणि गजबजलेला बाजार प्रवासाला एक आनंदमयी कलाटणी देतात.
डलहौजी ते अमृतसर: देशभक्तीचा अभिमान
अमृतसरला पोहोचल्यावर आपल्या प्रत्येक भारतीयाच्या हृदयात देश भक्तीची आग पुन्हा पेटते.
वाघा बॉर्डरचा बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम

भारत–पाकिस्तान सीमा रेषेवरील या परेडचे थरारक दृश्य आपणास आयुष्यभर लक्षात राहील.
स्वर्ण मंदिर, जलियांवाला बाग आणि दुर्गियाना मंदिर

स्वर्ण मंदिरातील शांततेत काही क्षण घालवताना मन आतून हलके होते. इतिहासाच्या जखमा सांगणारे जलियांवाला बाग आपल्याला विचार करायला भाग पाडते. या पवित्र भूमीच्या अनुभूतिनंतर पुढील प्रवास मन शुद्ध करून पुढे नेतो.
मनाली: साहस, बर्फ आणि सौंदर्य

मनाली हा हिमालयातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक. येथील काही खास ठिकाणे:
१) तिबेटी – मठ (१९६६)
गौतम बुद्धांच्या तपस्वी अवस्थेतील सुवर्ण प्रतिमा व तिथली शांतता हे मुख्य आकर्षण.
२) फळा घाऊस
येथे होणारे ऑडिओ-व्हिज्युअल शो आणि स्थानिक कला अनुभवणे हा एक वेगळाच आनंद.
३) सोलंग व्हॅली – साहसाचे केंद्र
स्कीईंग, झोर्बिंग, पॅराग्लायडिंग आणि विविध बर्फातील खेळ येथे उपलब्ध असल्याने पर्यटक नेहमी उत्साहात असतात.
४) अटल टनेल
जगप्रसिद्ध रोहतांग खालील हा टनेल प्रवाशांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव देतो. पर्वतांच्या आतून जाणारा हा मार्ग मनाला रोमांचित करतो.
मनाली ते धर्मशाळा: अध्यात्मिक प्रवास
मनालीहून धर्मशाळेकडे जाताना दलाई लामा यांच्या सानिध्यात मनाला अवर्णनीय शांतता प्राप्त होते. तसेच मार्गातील चामुंडा देवी मंदिर आणि पालमपूर टी गार्डन हे स्थळे मनाला रसरशीत आणि प्रसन्न करतात.
पर्वतीय प्रदेशातून शिमलाकडे
शिमला हे हिमाचल प्रदेशाचे रत्नच जणू. विमानतळाजवळून दिसणारी पर्वतश्रेणी, दऱ्या, ढगांनी वेढलेले डोंगर – हे सर्व जणू स्वप्नवत वाटते.
शिमला: क्रीडा आणि निसर्गाचा सुंदर संगम
कुफ्री मधील स्कीईंग साठी प्रसिद्ध ट्रॅक, घनदाट झाडी आणि थंड वातावरण हे शिमल्याचे मुख्य आकर्षण आहे.
विशेषतः कुटुंबांसाठी आणि साहस प्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच म्हणावे लागेल.
मनालीतील प्रमुख धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे
१) हिडिंबा देवी मंदिर
मनालीतील सर्वांत प्राचीन आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक.
महाभारतातील भीमाची पत्नी हिडिंबा देवीला समर्पित हे मंदिर ४५० वर्षे जुने असून देवदारांच्या दाट जंगलाने वेढलेले आहे.
२) मणिकर्ण
उपचारक्षम गरम पाण्याच्या कुंडांसाठी आणि धार्मिक विधींसाठी प्रसिद्ध. वैकुंठ मुनी आणि भगवान राम मंदिर येथील महत्त्वाची केंद्रे.
प्रवासाचा सार
धर्मशाळेची शांतता, खज्जियारचे सौंदर्य, अमृतसरची देशभक्ती, मनालीचे साहस आणि शिमल्याची मन मोहकता या सर्वांची एकत्रित अनुभूति म्हणजेच हिमालयातील सर्वश्रेष्ठ प्रवास.
हा प्रवास फक्त डोळ्यांना सुखावणारा नाही, तर मन, आत्मा आणि स्मरणात कायम राहील असा अनुभव देणारा आहे.
लेखिका: नीलम पुजारी
संस्थापक – Marmoris Tours
संपर्क: +91- 8237810590
ई-मेल: info@marmoristours.com


Leave a Reply