नवीन लेखन...

मार्मोरिस प्रवासगाथा – वाराणसी: काशीची दिव्यता आणि अद्भुत आध्यात्मिक प्रवास

भारतातील हजारो शहरांमध्ये काही शहरे फक्त वास्तूंच्या आणि रस्त्यांच्या ओळखीवरून जिवंत राहत नाहीत; ती शहरं जन्माला येतात श्रद्धेतून, संस्कृतितून आणि अध्यात्मातून. अशीच एक नगरी म्हणजे वाराणसी किंवा काशी.
जीवन आणि मृत्यू यांच्या मधील पडदा सर्वात पातळ जिथे आहे, ते ठिकाण म्हणजे काशी” – असे अद्वैत वेदान्तात सांगितले जाते.


वाराणसी म्हणजे काय
?

  • काशीलाच वाराणसी म्हणतात
  • असी आणि वरुणा या दोन नद्यांमधील क्षेत्राला वाराणसी असे नाव पडले
  • येथे वाहणारी गंगा केवळ नदी नाही, तर मोक्षाचा मार्ग मानली जाते

वाराणसीतील पहाट ही साधी पहाट नसते. ती आरतीच्या शंखध्वनीने जागणारी पहाट, गंगेच्या पाण्यात चैतन्य साठवणारी पहाट आणि भक्तांच्या श्वासात देवत्व जागवणारी पहाट असते.


गंगाघाट : अध्यात्माचा समुद्र
काशीतील गंगाघाटांवर उभं राहिल्यावर काळ थांबून राहिल्यासारखं वाटतं. अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या घाटांनी या नगरीला स्वरूप, सौंदर्य आणि शाश्वतता दिली. येथील गंगा आरती हा दृश्यानुभव नसून आध्यात्मिक विद्युतप्रवाह आहे. शेकडो दीप, घंटा नाद, वेदांचे मंत्र आणि गंगेची वलये, या संगमात भक्ती जिवंत होते.

वाराणसीतील प्रमुख मंदिरांची ओळख

१) काशी विश्वनाथ मंदिर


भारताच्या १२ ज्योतिर्लिंगांमधील सर्वात प्राचीन आणि प्रतिष्ठित ज्योतिर्लिंग. इथे छत्रपती शिवरायांनी आत्मसात करुण अमर केलेला हर-हर महादेव” असा मंत्र केवळ कानावर येत नाही, तो शरीरात, मनात आणि चेतनेत उतरत जातो. आधुनिक काशी विश्वनाथ कॉरिडॉर मुळे मंदिराचा भव्यत्व पूर्वीपेक्षा अधिक उंचावला आहे.

२) काल भैरव मंदिर
शिवाचे उग्र रूप असलेले काल भैरव हे काशीचे कोतवाल मानले जातात. काशीत प्रवेश करण्यापूर्वी येथे दर्शन घेण्याची परंपरा आजही पाळली जाते. अशी श्रद्धा आहे की कालभैरव ची कृपा असली तर काशीचे दर्शन सफल होते.

वाराणसीचे वैशिष्ट्य: अस्तित्व आणि अनंताचे संगम स्थान वाराणसी बद्दल एक वाक्य फार प्रसिद्ध आहे. काशी नष्ट झाली तर धर्म नष्ट होईल; पण धर्म असे पर्यंत काशी अस्तित्वातच राहील.” येथील प्रत्येक विट, प्रत्येक घाट, प्रत्येक घंटा नाद जीवनाच्या अनित्यतेची जाणीव आणि आत्म्याच्या अमरत्वाची खात्री देतो.

सांस्कृतिक वारसा

  • संगीताचे घराणे, विशेषतः बनारसी ठुमरी
  • प्रसिद्ध बनारसी साड्या – अद्वितीय जरी काम व कारागिरी
  • बनारसी पान – चव आणि परंपरा दोन्ही अनोख्या
  • ज्ञानपीठ, विद्यापीठे, तत्त्वज्ञान, योग आणि साधना यामुळे वाराणसी, ही एक सार्वत्रिक अभ्यास भूमी आहे.

मोकळेपणाने मृत्यूला सामोरे जाणारी नगरी
वाराणसी म्हणजे मृत्यूचे भय नाहीसे करण्याची शाळा. येथे असे मानले जाते की, काशीत देह ठेवला तर आत्मा मुक्त होतो.” ही श्रद्धा चितेच्या धुरा प्रमाणे आकाशात विरते, पण चेतनेत कायम स्वरुपी जिवंत राहते.

काशीची रात्र
इतर शहरांत पहाट जिवंत असते, पण काशीत रात्रसुद्धा जागी असते. आरती, किर्तन, शिव नामस्मरण, यात्रेकरू, साधू, नदीच्या काठावरचे शांत ध्यान, येथे रात्र म्हणजे अंधार नव्हे, तर अंतर्मुख होण्याची वेळ.

समाप्ती
वाराणसी म्हणजे प्रवास संपत नाही, तो सुरू होतो. काशी भेट म्हणजे एक बाह्य यात्रा नव्हे, ती आहे स्वत:च्या आतल्या विश्वाच्या दिशेने जाण्याची यात्रा.

ही नगरी आपल्या मनाला विचारते, तू कोण आहेस?” आणि मग हळूच उत्तर देते, तूच परमेश्वराचे अंश आहेस!

पुढील लेखात भेटूया

भारतीय आध्यात्मिक आणि ऐतिहासिक यात्रेतील नव्या पायरीसह मार्मोरिस प्रवासगाथा! आपला अभिप्राय आम्हाला लिहा

तुम्हाला काशीची ही यात्रा कशी वाटली? टिपणी, प्रतिक्रिया आणि शेअर, हीच लेखक व यात्रेची खरी प्रसाद रुपी कमाई!

लेखिका: नीलम पुजारी
संस्थापक – Marmoris Tours
संपर्क: +91- 8237810590
ई-मेल: info@marmoristours.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..