नवीन लेखन...

लेह-लडाख : हिमालयाच्या कुशीतलं अद्भुत स्वर्ग

लेह-लडाख, ज्याला Land of High Passes म्हणून ओळखलं जातं, हा भारताच्या उत्तरेतील अप्रतिम प्रदेश आहे. आयुष्यात एकदा तरी इथे जावं, अशी इच्छा अनेकांना असते.

लेह-लडाखला कसे जायचे?

लेह ला तीन मार्गांनी पोहोचता येतं –

  • मनाली मार्गे (Manali–Leh Highway)
  • श्रीनगर मार्गे (Srinagar–Kargil–Leh Highway)
  • हवाई मार्गे थेट लेह विमानतळावर

श्रीनगरहून लेहचं अंतर साधारण ४१८ किमी आहे. लेह समुद्र सपाटीपासून ३,५०० मीटर उंचीवर असल्यामुळे येथे पोहोचल्यावर शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यासाठी (acclimatization) किमान एक दिवस विश्रांती घेणं आवश्यक आहे. उंचीमुळे येथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे भरपूर पाणी पिणं व हळूहळू हालचाल करणं उपयुक्त ठरतं.

भेट देण्याचा योग्य काळ

एप्रिल ते सप्टेंबर हा लेह-लडाखला भेट देण्यासाठी उत्तम काळ आहे. नोव्हेंबर नंतर इथे प्रचंड थंडी पडते. हिवाळ्यात प्रसिद्ध चादर ट्रेक (Zanskar नदीवरील बर्फाच्छादित मार्गाने केलेली पायपीट) पर्यटकांसाठी खुला असतो.

लेह-लडाखची खास वैशिष्ट्यं

  • फेस्टिव्हल्स : एप्रिल महिन्यात एप्रिकॉट फेस्टिव्हल अनुभवण्याजोगा असतो. गुलाबी-पांढर्‍या फुलांनी बहरलेली एप्रिकॉटची झाडं मोहून टाकतात.
  • शांती स्तुपा (Shanti Stupa) : जपानी बौद्ध भिक्षूंनी बांधलेली ही स्तूप लेहच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. येथे मिळणारी शांतता आणि तेथून दिसणारे निसर्ग दृश्य अप्रतिम आहे.
  • लेह पॅलेस : १७व्या शतकातील हा नऊ मजली राजवाडा तिबेटी स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
  • हॉल ऑफ फेम : भारतीय सैन्याने बांधलेलं हे संग्रहालय भारत–पाक युद्धातील शूर सैनिकांच्या स्मृतीस समर्पित आहे.

अविस्मरणीय ठिकाणं

  • गुरुद्वारा पत्थर साहिब : १५१५ मध्ये गुरु नानक यानी येथे दिलेल्या भेटीची आठवण जपणारं पवित्र स्थळ.
  • मॅग्नेटिक हिल : गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारा अनोखा अनुभव येथे मिळतो.
  • सिंधू आणि झंस्कार नद्यांचा संगम : दोन्ही नद्यांचं नयनरम्य मिलन पाहण्याजोगं आहे.
  • खारदुंगला पास (5,359 मीटर) : जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता. येथील दृश्ये हृदयात कायमची कोरली जातात.
  • नुब्रा व्हॅली : शायोक नदीच्या काठी वसलेली ही दरी प्रसिद्ध आहे डबल हंप कॅमल राईडसाठी. रात्रीच्या वेळी दिसणारं तारांगण अप्रतिम अनुभव देते.
  • पँगॉंग लेक (14,500 फूट उंचीवर) : निळ्याशार पाण्याचं हे तलाव अनेक हिंदी चित्रपटांमध्ये झळकलं आहे.

संस्कृती आणि खाणं-पिणं

येथील खाद्यसंस्कृतीत थुकपा (नूडल सूप), मोमो, स्क्यू (पारंपरिक तिबेटीयन डिश) यांचा समावेश आहे. ‘souvenir’ म्हणून तिबेटीयन हस्तकला, एप्रिकॉट उत्पादनं, तसेच याकच्या लोकरीच्या शाली लोकप्रिय आहेत.

समारोप…

लेह-लडाख हा प्रवास म्हणजे निसर्गाच्या कुशीत घेतलेली आत्मशोधाची सफर आहे. इथलं शांत वातावरण, हिमाच्छादित पर्वत, स्वच्छ हवा आणि मनाला भिडणारी संस्कृती… हे सगळं मिळून या ठिकाणाला हिमालयामधील अद्भुत स्वर्ग” बनवतं.

— अनुप लाटणेकर 

A Featured Article From Marmoris Tours

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..