नवीन लेखन...

अरूणाचल प्रदेश – अनोळखी प्रवास पथांचा शोध

अनोळखी प्रवास पथांचा शोध

जिथे रस्ते संपतात, तिथूनच खरी सफर सुरू होते.

भारताच्या पूर्वेकडील टोकावर, जिथे उगवता सूर्य पहिल्यांदा हिमालयाच्या कुशीत हसतो, त्या भूमीतील काही ठिकाणं नकाशावर दिसतात, पण त्यांचं सौंदर्य मनाने अनुभवावं लागतं – तेव्हाच प्रवासाचा अर्थ उमगतो. ‘तवांग’ आणि ‘सेला खिंड’सारख्या प्रसिद्ध ठिकाणां पलीकडेही अरूणाचल प्रदेशात अशा अनेक अद्भुत जागा आहेत – ज्या तुम्हाला अनोख्या संस्कृतींच्या, निसर्गाच्या आणि मानवी साधेपणाच्या जवळ नेतात. चला, या भागात करूया अशाच काही “गुप्त रत्नांचा” शोध, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास एक नवीन अनुभव ठरेल.

 

झीरो व्हॅलीनिसर्गाच्या सुरात जगणं

‘झीरो व्हॅली’ म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, तर एक जिवंत ध्वनी आहे; पक्ष्यांच्या किलबिलाटाचा, शेतकऱ्यांच्या गाण्यांचा आणि डोंगरावरून येणाऱ्या मंद वाऱ्याचा. इथे राहणारे आपटानी आदिवासी लोक आजही पर्यावरणाशी एकरूप जीवन जगतात. त्यांच्या चेहऱ्यावरच्या पारंपरिक टॅटू आणि घरांच्या बांधकाम शैली ही त्यांच्या संस्कृतीची साक्ष देतात. दरवर्षी सप्टेंबर मध्ये होणारं झीरो म्युझिक फेस्टिव्हल’ हे भारतातील सर्वात सर्जन शील आणि निसर्गाशी एकरूप होणार्‍या संगीत प्रेमींचं ठिकाण आहे. संगीत, निसर्ग आणि संस्कृती यांचा संगम इथे अनुभवताना, शहरातील गोंगाट किती दूर राहिला; हे जाणवतं. 

मेंचुका ‘मेचुका’ म्हणजे मेघांच्या पलीकडचं गाव

‘मेंचुका’ (Menchuka) म्हणजे – Medicine for Peace असं स्थानिक लोक म्हणतात.
इथं पोहोचणं म्हणजे जणू काळाच्या पलीकडे जाणं. १२,५०० फूट उंची वरील या दरीत बर्फाच्छादित शिखरं, हिरव्या-कुरणां मधून वाहणार्‍या नद्या, आणि लामा-मठांच्या घंटा एक वेगळं विश्व निर्माण करतात. 

Samten Yongcha Monastery इथलं प्राचीन मठ ४०० वर्षांहून जुना असून, त्याच्या आसपासच्या दृश्यांना ‘टॉलीवूडचं स्वर्ग’ असंही म्हंटल जातं.हिवाळ्यात बर्फात झाकलेले गाव, आणि उन्हाळ्यात इंद्रधनुष्यासारखं रंगीबेरंगी – मेंचुकाचं रुप दर वेळी बदलतं.

आलो (Aalo) – जिथे नदी बोलते आणि पर्वत ऐकतात

सियॉंग नदीच्या काठावर वसलेलं हे गाव, ‘आलो’ म्हणजे खऱ्या अर्थाने अज्ञाताचं सौंदर्य. इथली ‘गालो जमात ‘आपल्या पारंपरिक ‘Popir Dance’ साठी ओळखली जाते; गालो संगीत, लय आणि रंगांची जादू पाहताना नृत्य म्हणजे संस्कृतीचा उत्सव वाटतो. आलो जवळील Hanging Bridge ही साहसी प्रवाशांची आवडती जागा आहे. बांबू आणि दोरांनी बांधलेला हा पूल नदीवर तरंगत असल्यासारखा वाटतो. सूर्यास्ता वेळी इथं थांबलं की आकाश आणि नदीचं मिलन बघताना मन पुन्हा एकदा शांत होतं.

डोंगरांच्या पलीकडचं गाव – आंजॉ (Anjaw)

भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे आंजॉ. इथले रस्ते इतके शांत की पावलांचा आवाजही प्रतिध्व‍नी बनतो.
डोंग गाव – जिथे भारतात सर्वप्रथम सूर्य उगवतो, हे ठिकाण खरोखर ‘Land of Rising Sun’चं प्रतीक आहे. इथं सकाळच्या किरणां-सोबत बसून गरम चहा घेताना प्रत्येक दिवसाची पहाट ही एक नवी कविता आहे; हे जाणवतं. जवळचं Glow Lake आणि Kibithu सीमा स्थळ हे निसर्ग आणि देश-भक्ती दोन्हीचा संगम आहे.

रोईंग आणि मायो नदी, जंगल आणि लोक जीवनाचं त्रिवेणी संगम

‘रोईंग’ हे अरुणाचलचं पर्यावरणीय केंद्र. सियांग नदीच्या किनार्‍यावर वसलेलं शांत गाव. इथं पदुम पर्वत आणि मिश्मी हिल्स मधून वाहणार्‍या नद्यांच्या संगमावर ट्रेकिंगचा अनुभव म्हणजे एक नैसर्गिक उपचारासारखा आहे. ‘मायो’ गावात तर Namdapha National Park आहे – जिथे क्लाउड लेपर्ड, रेड पांडा आणि ४०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात. जंगलातील सकाळचं दृश्य, धुक्यातून उमटणारे किरण आणि दूर वरून येणारे पक्ष्यांचे सूर – या भूमीवर निसर्ग स्वत: कलाकार झाला आहे असं वाटतं.

पासीघाट ईशान्येचं प्रवेशद्वार

ब्रिटिश काळात स्थापन झालेलं हे अरुणाचल मधील सर्वात जुनं शहर. ‘सियांग’ नदीवर केलेला रिव्हर राफ्टिंगचा अनुभव हा रोमांचक साहसप्रेमीं साठी स्वप्नवत असतो. जवळचं Daying Ering Wildlife Sanctuary हे पक्षी निरीक्षकांसाठी स्वर्ग आहे. इथली संध्याकाळ, नदीच्या प्रवाहात विरलेलं सूर्याचं तेज, प्रवाशांच्या मनात एकच विचार आणते: प्रत्येक प्रवास हा आत्मशोधाचा नवा अध्याय असतो.

समारोप अरूणाचल, एक भाव विश्व

अरूणाचल प्रदेश हा केवळ डोंगर, तलाव आणि मठ नाही, तर एक जिवंत संस्कृती आहे. इथे प्रत्येक गावात निसर्गाशी संवाद चालतो, प्रत्येक पर्वत एक कथा सांगतो आणि प्रत्येक प्रवासी काहीतरी मागे ठेवून जातो – शांतता, नम्रता आणि कृतज्ञता.

 

लेखिका: नीलम पुजारी
संस्थापक – Marmoris Tours
संपर्क: +91- 8237810590
ईमेल: info@marmoristours.com
वेबसाइट: www.marmoristours.com

A Featured Article From Marmoris Tours

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..