नवीन लेखन...

सिक्कीम–दार्जिलिंग : हिमालयाच्या कुशीतली मोहक अशी अनुभवयात्रा!

ढगांनी वेढलेल्या हिरव्या टेकड्यांवर सूर्याची पहिली किरणं स्पर्शून जातात आणि मनात एक अनामिक शांतता संचारते. काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात; ती अनुभवण्यासाठी, आतून जाणण्यासाठी असतात. भारताच्या ईशान्य हिमालयात वसलेले, सिक्किम ही अशीच जादुई भूमी. निसर्ग, अध्यात्म, साहस, शांतता आणि सौंदर्य या सर्वांचा सुंदर संगम येथे अनुभवता येतो.

जर तुम्हाला कधी मन, आत्मा आणि प्रवास यांचं नातं काय?” हा प्रश्न पडला असेल, तर या पर्वतरांगांमध्ये केलेली एक सफर त्या प्रश्नाचं उत्तर बनते.

सिक्किम – निसर्ग, अध्यात्म आणि शांततेची स्वर्ग भूमी!

गंगटोक, सिक्किमची राजधानी, हे शहर पाहता क्षणीच मन मोहून घेते. स्वच्छ, शांत, शिस्तबद्ध आणि हिरवळीने नटलेले. तेथून सुरू होणारी सिक्किमची सफर म्हणजे प्रत्येक वळणावर निसर्गाचं नवीन रूप पाहण्याचा मंत्रमुग्ध करणारा प्रवास.

नाथुला पास – देश प्रेम जागवणारी उंची

भारत-चीन सीमेवरील नाथुला पास (14,140 ft.) हा अनुभव आयुष्यात किमान एकदा तरी घ्यावाच. बर्फाच्छादित पर्वत, विरळ हवा, थंडीचा स्पर्श आणि समोर चीनची सीमा, हे क्षण अभिमानाने अंगावर शहारे आणतात. येथील बाबा हरभजन सिंग मंदिर सैनिकांच्या त्यागाची आणि श्रद्धेची भावपूर्ण कहाणी सांगतं.

त्सोमगो लेक (छांगू लेक) – स्वर्गीय निळाईचा आरसा

बर्फाच्छादित पर्वतांच्या कुशीत शांतपणे विसावलेलं हे सरोवर म्हणजे एखाद्या पोस्टकार्ड वरील चित्र जिवंत झाल्याचा भास. पर्यटक येथे याक राइड चा अनोखा आनंद घेतात. तसेच इथल्या Cable Car चा अनुभव घेताना दिसणारे विहंगम द्रुष्य डोळ्याचे पारणे फडेतेच.

 

लाचेन आणि गुरुडोंगमार – आत्म्याला भिडणारी हिम यात्रा

गंगटोकहून लाचेन कडे जाताना वाटेत दिसणारे Seven Sisters Waterfalls, Naga, Butterfly Waterfall इत्यादी धबधबे मनात कायमचे कोरले जातात.

सुमारे 17,800 ft. उंचीवर तिबेट सीमेजवळ वसलेला गुरुडोंगमार लेक – हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मीयांसाठी अतिशय पवित्र. निळाशार शांत तलाव, डोंगरांची भव्यता आणि विरळ हवेतली नीरव शांतता… अनेक जण सांगतात, या ठिकाणी उभं राहिल्यावर मनातली गर्दी शांत होते.

लाचुंग – फुलांनी नटलेली रंगीत दरी

सिक्किममधील हे सुंदर गाव म्हणजे postcard-perfect स्वर्ग!
येथील Yumthang Valley (11,800 ft.) ला “Valley of Flowers of the East” म्हटले जाते. हिवाळ्यात बर्फाच्छादन, तर फुलांबरोबर वसंत – दोन्ही ऋतूंमध्ये अगदी भुरळ पाडणारे.

थोडं पुढे, सुमारे 15,300 ft. वर असलेला Zero Point. येथे रस्त्याचा शेवट आणि हिमालयाचा आरंभ जाणवतो. बर्फ वृष्टीचा आनंद, अतिशय शुद्ध हवा आणि थंडी, हे दृश्य आयुष्यभर सोबत राहतं.

पेलिंग – कांचनजंघाच्या दर्शनाने मन हरखून जाणारे ठिकाण

जर एखाद्या क्षणी मनात शांतता, सौंदर्य आणि विस्मय यांचा संगम एकत्र अनुभवायचा असेल, तर पेलिंग या नावाजलेल्या हिल स्टेशनाला जरूर भेट द्या. येथील:

  • Pelling Skywalk – भारतातील पहिला काचेचा skywalk
  • चेनरेझिग – भव्य (42 मी.) बौद्ध प्रतिमा
  • कांचनजंघाचे राजेशाही विहंगम दर्शन

धुक्यातून अचानक उलगडणारी हिम शिखरे जादुई दिसतात.

रावंगला (Ravangla) – अध्यात्म आणि निसर्गाचा संगम

येथील Buddha Park मध्ये 130 ft. उंच भव्य बुद्धमुर्ती आणि आजूबाजूचा निसर्ग मनाला विलक्षण शांत करतो. ध्यान, शांती आणि निसर्ग यांचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे.

दार्जिलिंग – चहाचा सुगंध, धुकं आणि जुनी ब्रिटिश मोहकता

दार्जिलिंग म्हणजे हिमालयाचं रत्न. येथे पोहोचताच थंड वार्‍याची झुळूक, धुक्यातून दिसणार्‍या चहाच्या मळ्यांच्या रांगोळी आणि शांत सकाळ मनातली धावपळ थांबवतात.

Must Experience in Darjeeling:

टी गार्डन्स – जग प्रसिद्ध दार्जिलिंग चहा
Darjeeling Himalayan Railway (Toy Train) – UNESCO World Heritage अनुभव
Tiger Hill Sunrise – कांचनजंघा हिम शिखरांवर उगवणारा सुवर्ण सूर्य
Batasia Loop, Peace Pagoda, Rock Garden

दार्जिलिंग म्हणजे शांतता आणि रोमँटिक अनुभवाची परिपूर्ण जागा. कुटुंब, मित्र, कपल्स सर्वांसाठी योग्य.

कधी जावे?

महिना                   अनुभव

मार्च-जून                 सर्वोत्तम हवामान, फुले, दर्शन

ऑक्टोबर-डिसेंबर    थंडी + स्वच्छ हिमालय दर्शन

डिसेंबर – फेब्रुवारी    हिमवृष्टी (Zero Point, लाचेन, लाचुंगसाठी उत्कृष्ट)

 प्रवास टिप्स

  • नाथुला पाससाठी परवाना आवश्यक -1 दिवस आधीची प्रक्रिया
  • उंचीशी जुळवून घ्या – पाणी जास्त प्या, अतिश्रम टाळा
  • हिवाळ्यात उबदार कपडे अत्यावश्यक
  • सिक्किममधे स्वच्छतेबाबत कठोर नियम – प्लास्टिक टाळा

शेवटचा अनुभव–स्पर्श

सिक्किम-दार्जिलिंग ही फक्त एक ट्रिप नाही…
ती एक अनुभूति आहे – जी निसर्गाशी, स्वत:शी आणि जीवनाशी जोडून जाते. इथून परतताना मन भरलेले असतं – शांतता, सौंदर्य, आठवणी आणि स्वत:ला शोधल्याची भावना घेऊन.

तुमची पुढची सफर हिमालयात असावी का?

जर या लेखाने तुमच्या मनात या प्रवासाची हाक जागवली असेल, तर Marmoris Tours तुमच्यासाठी अगदी प्रेमाने, काळजीपूर्वक आणि अनुभव पूर्ण अशी सिक्किम–दार्जिलिंग सफर घडवण्यास सज्ज आहे.

लेखिका: नीलम पुजारी
संस्थापक – Marmoris Tours
संपर्क: +91- 8237810590
ईमेल: info@marmoristours.com

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..