नवीन लेखन...

बाळगुटी एक वरदान: भाग ६- पिंपळी वनस्पती

पिंपळी वनस्पती:

पिंपळी ही एक बहुवर्षायू वेल मुळांच्या आधाराने वर चढते. आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे, जी वेलवर्गीय असून तिला “लेंडीपिंपळी” किंवा “लवंग पिंपळी” असेही म्हणतात. पिंपळी दिसायला काळ्या लाकडाप्रमाणे आणि लवंगासारखी दिसते. ही वनस्पती कफ, दमा, खोकला, ताप आणि पोटाच्या विकारांवर गुणकारी आहे आणि तिचा उपयोग श्वसन व पचनसंस्थेच्या सुधारणेसाठी केला जातो. पिंपळीची काळी फळे लवंगासारखी दिसतात, म्हणून तिला लेंडीपिंपळी असे म्हणतात. या वनस्पतीची फळे हलकी पिवळी ते नारिंगी रंगाची आणि चवीला तिखट असतात.

पिंपळीची माहिती:
• वनस्पतीचा प्रकार: पिंपळी ही एक वेलवर्गीय वनस्पती असून, ती आधाराने वर चढते किंवा जमिनीवर पसरते.
• शास्त्रीय नाव: Piper longum
• कुटुंब: पायपरेसी (Piperaceae)
• मूळ स्थान: श्रीलंका, फिलिपीन्स बेटे आणि भारत. भारतात उष्ण आणि दमट प्रदेशात आढळते. महाराष्ट्रात विदर्भ भागात याची लागवड केली जाते. बंगालमधील लहान टेकड्या, सह्याद्री भागातील सदापर्णी जंगले आणि कोकण ते त्रावणकोरपर्यत इ. प्रदेशांत आढळते. तमिळनाडू, आसाम, प. बंगाल व चेरापुंजी येथे ती लागवडीत आहे.
• टीप: पिंपळ (Peepal) आणि पिंपळी (Pippali) या दोन वेगवेगळ्या वनस्पती आहेत. पिंपळ हा एक मोठा वृक्ष आहे, तर पिंपळी ही एक वेल आहे.
पिंपळी (Pippali) यांची वेगळ्या भाषेतील नावे:
इंग्रजी नाव: इंडियन लाँग पेपर हिंदी नाव: पिपळ, पिपली, लेंडी पीपर, पिपली
संस्कृत नाव: कपला, कटिकासिरा, चंचला, छुपुला, असमिया नाव: पिपोली
बंगाली नाव: पिपलामोर, पिपळ, रल्ली, पिपुल, पीपुल
गुजराती नाव: पिपली, कन्नड नाव: हिपली, हिप्पली, हिप्पलीबल्ली,
मराठी नाव: पिंपळी, पिपळी, पिंपळी, पिपली
मल्याळम नाव: तिप्पली, पिप्पली, आमगढी
उडिया नाव: विदेही
तमिळ नाव: अरगडी, अट्टी, कालिदी,
वर्णन:
• पाने अखंड असतात वरची पाने लांबट, अंडाकृती, बिनदेठाची, क्वचित तळाशी खोडास वेढणारी.


• मिरे यांच्या वंशातील पायपरेसी कुलातील (मिरी कुलातील) असल्याने अनेक सामान्य लक्षणांत त्यांच्याशी तिचे साम्य आहे.


• फळे सुगंधी व तिखटगोड असतात. फळांमध्ये पायपरलाँग्युमीन नावाचे मुख्य अल्कलॉइड असते. त्यामुळे या फळांना एक विशिष्ट सुगंध येतो.

पिंपळी व बाळगुटी:
पिंपळी हे बाळगुटीतील एक महत्त्वाचे घटक आहे. बाळगुटी लहान मुलांचे विविध आजार जसे की खोकला, दमा, ताप, पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. पिंपळीचा उपयोग फुफ्फुसांवर होतो आणि कफ कमी करण्यास मदत करते. पिंपळी याचे फळ औषधात वापरतात. हिचा मुख्य उपयोग श्वसनसंस्था व पचनसंस्थेसाठी होतो. पिंपळीमुळे मुलांना वारंवार सर्दी, खोकला वगैरे त्रास होण्याचे प्रमाण कमी होते. भूक व्यवस्थित लागते, अजीर्ण, पोटदुखीवरही फायदा होतो. मुलाला सर्दी-खोकला झाला असता किंवा भूक लागत नसता पिंपळीचे प्रमाण वाढवावे.

पिंपळीची काळी फळे लेंड्या प्रमाणे दिसतात, म्हणून तिला लेंडी पिंपळी म्हणतात. पिंपळीची विशेष क्रिया फुफ्फुसांवर होते. उत्तेजक गुणामुळे

नवीन कफ निर्माण होत नाही व असलेला सुटतो. ती जुनाट खोकला, दम, ताप यातही उपयोगी पडते. पिंपळी, यकृत, प्लिहा यांना उत्तेजित करून पाचक स्त्राव नियमित करते. पिंपळी ऊष्ण आहे, म्हणून जास्त वापरू नये. पिंपळी पिंपळी कशी वापरावी? – एक ते २ थेम्ब सहाणेवर दूध घेऊन पिंपळी (लेंडी पिंपळी) उगाळावी साधारणतः ५ ते ६ वळे आणि चमचा किंवा छोट्या वाटीत काढून घ्यावे व बाळाला चाटवावी. मात्रा जास्त घेऊ नये. लेंडी पिंपळी उष्ण असते. अनुभवी वैद्याच्या सल्ल्यानुसारच डोस ठरवावा.हिवाळ्यात खाणं फायद्याचं ठरू शकतं. याशिवाय गर्भवती महिलांनी पिंपळीचं सेवन करणं टाळावं.

पिंपळीचे गुणधर्म आणि उपयोग : पिंपळीचा उपयोग तिच्या फळांसाठी केला जातो, जी औषध म्हणून वापरली जातात.

आरोग्यासाठी फायदे:

1. श्वसनसंस्थेसाठी: खोकला, दमा आणि कफ यांसारख्या श्वसनसंस्थेशी संबंधित समस्यांमध्ये पिंपळी फायदेशीर आहे.

2. पचनसंस्थेसाठी: ही पचनक्रिया सुधारते आणि अपचन, पोटदुखी तसेच मेदोरोग यांसारख्या समस्यांवर उपयोगी आहे.

3. इतर उपयोग: ताप, कुष्ठरोग, काविळ, प्लिहावृद्धी आणि मेंदूच्या अशक्तपणावरही पिंपळीचा उपयोग होतो.

4. पिंपळी दिसायला काळ्या लाकडाप्रमाणे आणि लवंगासारखी दिसते.

ही एक अतिशय छोटी वनस्पती जरी असली तरीही विविध आजारांवर प्रचंड गुणकारी असून औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जेव्हा कोरोना व्हायरसने जगाला आपली मगरमिठी मारायला सुरूवात केली होती. तेव्हा भारतीयांना आर्युवेदीक औषधांचं महत्त्व पटू लागलं होतं. आयुर्वेदातल्या विविध औषधी वनस्पतींचं सेवन करून प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न भारतीय नागरिक करत होते. आयुष मंत्रालयानेही आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने काही आयुर्वेदिक वनस्पतींचा अभ्यास केला होता. यात काही वनस्पती या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरल्याचं सिद्ध झालं होतं. अशीच एक आयुर्वेदिक वनस्पती आहे पिंपळी किंवा पिप्पली. पिप्पली दिसायला काळ्या लाकडाप्रमाणे आणि लवंगासारखी दिसते. ही एक अतिशय छोटी वनस्पती जरी असली तरीही विविध आजारांवर प्रचंड गुणकारी असून औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.

4. जाणून घेऊयात पिंपळीच्या फायद्यांबद्दल. आयुर्वेदानुसार, पिपली दमा, ब्राँकायटिस आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये देखील प्रभावी ठरू शकते. ज्या लोकांना खोकला आणि कफची समस्या आहे ते पिंपळीचं सेवन करू शकतात. पिंपळीच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे, ते वेदनाशमक म्हणून काम करतं. यामुळे सांध्यातील वेदना आणि सूज कमी होऊ शकते. सुश्रुत संहितेत याला दहन उपकर्ण म्हणून ओळखले जाते.

5. विविध त्वचा विकारांवर पिंपळी फायदेशीर आहे. पिंपळीमुळे रक्त शुद्ध व्हायला मदत होते, ज्यामुळे मुरुम आणि खाज सुटण्याची समस्या कमी होते. पिंपळीच्या वापरामुळे अनेक त्वचाविकार मुळापासून दूर व्हायला मदत होतात. मात्र तज्ञांच्या सल्ल्याशिवाय पिप्पलीचं सेवन करू नये.

6. कॅन्सरवर गुणकारी:

7. रोगप्रतिकारक शक्तीवर्धक: पिंपळीच्या फळं आणि मुळांचा वापर सर्वाधिक केला जातो. त्याची मुळं आणि देठाचे जाड भाग कापून वाळवले जातात. यामुळे चयापचय सुधारायला मदत होते. दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या पिंपळीमुळे जळजळ कमी होण्यास मदत होते. याशिवाय पिप्पलीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

8. मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी पिंपळी फायद्याची आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पिंपळीची पावडर मध किंवा पाण्याबरोबर सेवन केल्याने मूत्रपिंड निरोगी राहायला मदत होते. पिंपळीच्या सेवनाने चयापचय सुधारतं. त्यामुळे वजन देखील कमी व्हायला मदत होते. पिंपळीच्या सेवनामुळे पचनसंस्थेपासून ते श्वसनसंस्थेपर्यंतच्या अनेक आजारांना दूर ठेवता येतं. मात्र पिंपळी ही उष्ण स्वभावाची आहे.

9. एंडोटॉक्सिनसाठी ही औषधी वनस्पती उपयुक्त आहे. कच्च्या पिप्पलीमुळे कफाची तीव्रता वाढते.

10. सुक्या पिप्पली मधात मिसळल्यास पित्त वाढवते. ते खोकला, ताप, चरबीयुक्त ऊतींचे प्रमाण कमी करते आणि पचन अग्निसाठी चांगले आहे. जर पिप्पलीचा वापर गुळासोबत केला तर ते कमी पचन अग्नि, अपचन, दमा, हृदयरोग, अशक्तपणा आणि कृमींसाठी उपयुक्त आहे.

11. हे केसांच्या वाढीसाठी देखील चांगले आहे आणि केसांचे टॉनिक म्हणून वापरले जाते.

12. बी१ च्या कमतरतेमुळे होणाऱ्या बेरीबेरीमध्ये वापरण्यासाठी ही एक उत्तम औषधी वनस्पती आहे.

13. पिप्पली हे एक मजबूत दीर्घायुष्य वाढवणारे देखील आहे.

14. ही वनस्पती पोषक तत्वांचे वाहतूक करण्यास आणि शरीरातील कचरा बाहेर काढण्यास मदत करते.

15. अन्नाचे पचन, आत्मसातीकरण आणि चयापचय सुधारण्यासाठी हे चांगले आहे.

16. फुफ्फुसे, मूत्रपिंड आणि लसीका ग्रंथी स्वच्छ करण्यासाठी एक चांगला डिटॉक्सिफायर.

17. हे मेंदूचे टॉनिक म्हणून वापरले जाते.

18. स्तनांत दूध येण्यास- तापलेल्या दुधात दोन मासे चूर्ण घालून द्यावें .

19. रातांधळ्यास- गोमूत्रांत पिंपळी उगाळून अंजन करावे , व अगस्त्याची भाजी रोज खात जावी.

20. वमन होण्यास- पिंपळी , गेळफळ व सैंधव यांचे चूर्ण ऊन पाण्याशी द्यावें

21. मूर्छेवर- पिंपळीचे चूर्ण मधांत खलून चाटण द्यावे.

22. आमवातावर- गाईचे दूध १ शेर घेऊन त्यांत पिंपळी एक सबंध व बिबे चार कातरून घालून पावशेर शेष राहीपर्यंत आटवून , त्यांत खडीसाखर घालून तें दूध घ्यावें.

23. दंतरोगावर पिंपळी , जिरें व सैंधव यांचे चूर्ण करून दांताच्या मुळाशी घासावे , म्हणजे ठणका , सूज , हालणे , वगैरे विकार शमतात.

24. मूळव्याधीवर- पिंपळीचे चूर्ण ताकांत द्यावें .

पिंपळीची लागवड:
अमरावतीतील अंजनगाव सुर्जी तालुक्यात शेतकरी औषधी वनस्पतींची शेती करतात. कोडगाव येथील शेतकऱ्यांनी पिंपळी या औषधी वनस्पतीची शेती केली आहे पिंपळीची लागवड जानेवारी ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करतात. स्थानिक वेलीचाच उपयोग नविन लागवडीसाठी करतात.

रासायनिक रचना:
त्याची रासायनिक रचना म्हणजे पाइपरिन, पिप्लार्टाइन, पाइपरनोनिन, पाइपरंडेकॅलिडाइन, आयकोसाडिएनामाइड, आयकोसॅट्रिएनोइक, गिनीन्साइन, लाँगामाइड, ऑक्टाडेकाडियन, पाइपरलॉन्गुमाइन, पाइपरलॉन्गुमाइन, पेलिटोरिन, पाइपरसाइड, पाइपरंडेकॅलिडाइन आणि आवश्यक तेले.

पायपर लाँगमचे आयुर्वेदिक उत्पादन:
1. कास हरचूर्ण
2. पचनास आधार
3. चंद्रप्रभा वती
4. कैशोर गुग्गुल
5. महाशंख वती

संदर्भ:
१. मराठी विश्वकोश
२. डॉ. मीनाक्षी चौहान (एमडी – वैद्यकशास्त्र) यांचा लेख
३. डॉ. कैलास उगले यांचा लेख
४. गुगलवरील लेख.
५. सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
०६. १२. २०२५

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 105 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on बाळगुटी एक वरदान: भाग ६- पिंपळी वनस्पती

  1. पिंपळी चे बहुउपयोगी गुणधर्म लेख वाचल्यावर समजले. लेखक दिलीप कुलकर्णी ह्यांना माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..