सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील नेमके मर्म ओळखून डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मार्काचे मंत्र हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीचे उपयुक्त असे मौलिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. बालकापासून पालकापर्यंत शिक्षणा बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेकांचे शिक्षणा मधील संकल्पनेचे संबोध स्पष्ट नाहीत. शिक्षण कां? व कशासाठी?व कसे?घ्यायचे याबाबत मार्गदर्शन सर्वांनाच आवश्यक आहे. ज्ञानाचा प्रचंड स्फोट होत आहे व ए.आय. आपल्या मदतीला हात जोडून उभा आहे अशा परिस्थितीमध्ये ज्ञानाचा उपलब्ध साठा मिळविणे सोपे झाले आहे पण ते आत्मसात करून त्याच्यात कौशल्य मिळवणे तितकेच दुरापास्त काही जणासाठी आहे. स्पर्धेच्या युगात ज्ञानावर आधारित प्रश्न मुले सोडऊ शकत नाहीत कारण शालेय अभ्यासक्रमात केवळ पाठांतर वर भर दिला जातो. मुलांचे संबोध स्पष्ट होत नाहीत त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात त्याचे उपयोजन त्यांना करता येत नाही. गणितात 100 मार्क असतील पण बहुतेकाना छटाक साखरेची किंमत किती हे त्यांना काढता येत नाही. पोपपपंची करून मुले बोर्डात पहिली येतात पण त्यांना चार वाक्य धड बोलता येत नाहीत. वेळेचे नियोजन मुलांना करता येत नाही व तसं त्या बाबतीत त्यांना प्रशिक्षितही केलं जात नाही. कमळ, शरद यांनी सुरू झालेलं शिक्षण त्याच्यापुढे गेलेच नाही व बदललेही नाही. केवळ ज्ञान नाही तर परीक्षा व परीक्षेत मिळवलेले गुण हे आज व्यक्तिमत्त्वाचा निकष झाले आहेत.
शिणक्ष पद्धतीपेक्षा आज परीक्षा पद्धतीला महत्त्व आले आहे. जे जे परीक्षेला येणार आहे मग गांधी पाच मार्काचा असेल तर तेवढेच लिहायचं दहा मार्काचा असेल तर जास्त लिहायचं. गुणाानुसार एखाद्या व्यक्तीमत्त्वाविषयी माहिती मुलं घेत आहेत.
शिक्षणाचे व्याख्ये पासूनच शिक्षण खूप दूर गेलं आहे. शिक्षण म्हणजे योग्य वर्तन बदल. शिक्षणातून अपेक्षित योग्य वर्तन बदल होतच नाही. मुल्ल्यांची रुजवणूक तर फार दूरची गोष्ट.
Education is not problem but Retention is problem.
भाराभार माहिती कोंबली जाते पण पण तिच रवथ होत नाही, ती आत्मसात होत नाही त्यासाठी म्हणून वाचन,मनन, चिंतन हवं ते शिक्षण प्रक्रियेतून हद्दपार झालं आहे. प्रत्येक गोष्टीला एक तंत्र असतं ते समजलं की तुम्ही यशाच्या जवळ जाता. ठराविक मुलेच परीक्षेत अपेक्षित गुण किंवा अपेक्षा केली नव्हती एवढे गुण मिळवून चांगल्या क्रमांकाने पास होतात व डॉक्टर व इंजिनियर होण्याच्या पायवाटेकडे हमखास अग्रेसर होतात.नियोजन सातत्य व चिकाटी यामुळे हे शक्य होते.
वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असूनही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्यासाठी, शिक्षणासाठी काय व कसे प्रयत्न करायला हवे त्याचे संपूर्ण अभ्यासपूर्ण मार्गदर्शन डॉ चंद्रकांत कणसे यांनी या पुस्तकात एखाद्या शिक्षण तज्ञा प्रमाणे केले आहे. अनेक विद्यार्थी अभ्यास करतात पण दिशाहीन. अनेक जण पाठांतर करतात पण त्यातला काहीच भाग त्यांच्या लक्षात राहतो किंवा त्याचं आकलन होते. केवळ परीक्षेसाठी अभ्यास करण्याऐवजी ज्ञान मिळविण्यासाठी शिकलेत्या ज्ञानाचा उपयोग व्हायला हवा, केवळ परीक्षेसाठी नाही तर जीवन यशस्वी जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा. आजच्या शिक्षण पदधतीचे दुर्दैव म्हणजे विद्यार्थ्यांचे संबोध स्पष्ट नाहीत. निसर्गात व पावसात जाऊन कविता शिकवणारे, चालीत कविता शिकविणारे शिक्षक आता नाहीत, आणि त्यामुळे त्यांना आकलनामध्ये बाधा येते आणि जेव्हा आकलन नसेल तर ते परीक्षेत मुद्देसुद लिहीता व मांडता येत नाहीत. वेगवेगळ्या युक्त्या वापरून जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर ते परीक्षेत चांगल्या प्रकारचे गुण मिळवतील व आयुष्यातही यशस्वी होतील.
आज अनेक कोचिंग क्लासेस मधून व अपेक्षित तेही फक्त 21 अपेक्षित विद्यार्थ्यासमोर हात जोडून असणारे अनेक प्रलोभन ही आहेत, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययन यावर भर द्यायला हवा. सगळी भाराभर माहिती कोंबली जाते आहे, ती घोका ओका, पहा व लिहा या पद्धतीने बाहेर पडत आहे. आत्मसात काहीच होत नाही, ना दृष्टिकोन ना मूल्ये. वैज्ञानिक दृष्टिकोन याची व्याख्या पाठ केली जाते पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा वापर होत नाही. मोठेच करत नाही त्यामुळे लहानांकडून कशी अपेक्षा ठेवणार? केवळ गुण मिळविण्यासाठी नाही तर ज्ञानाने आयुष्य समृद्ध करण्यासाठी अभ्यास कसा करायचा याचे तंत्र व मार्क मिळवण्यासाठी मंत्र याचा वापर या पुस्तकात डॉ.चंद्रकांत कणसे यांनी सविस्तर व उदाहरणासहीत केला आहे. अनेकांना अभ्यास करणे कंटाळवाणं वाटतं पण अभ्यास आनंददायी आणि यशाकडे कसा न्यायचा हे या पुस्तकातून विद्यार्थ्यांना कळेल तसेच पालक व शिक्षक यांनाही हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
केवळ महागड्या शाळेत विद्यार्थ्यांना पाठवून व नावाजलेल्या कोचिंग क्लास मध्ये पाठवून पालकांची जबाबदारी संपत नाही तर आपला पाल्य अभ्यास करतो का, करत असेल तर कसा करतो, किती करतो, व कोणत्या तंत्राने करतो याचा विचार सुद्धा आजच्या पालकांनी, शिक्षकांनी करायला हवा.
आपल्या पाल्याला गृहपाठामुळे मार बसणार आहे म्हणून काही हळवे पालक स्वतःच गृहपाठ करतात पण या पुस्तकात सांगितलेल्या अनेक बाबीकडे, तंत्राकडे जर लक्ष शिक्षकानी, पालकांनीही दिले तर त्यांचा पाल्य अभ्यासात नक्कीच गती दाखवेल. शाळेतही अध्यापनाची व गृहपाठ देण्याची पद्धत यामध्ये बदल व्हायला हवा यासाठी शिक्षकांना सुद्धा या पुस्तकातून नक्कीच दिशा मिळणार आहे. कोणतेही नवीन ज्ञान आत्मसात करताना अभ्यासाची पद्धत योग्य असेल तर मिळणारे ज्ञानही अचूक परिपूर्ण आणि सखोल असते. आज बोर्डाच्या परीक्षेत पहिला येणाऱ्याला चार वाक्य धड बोलता येत नाहीत. परीक्षेचे तंत्र सांगताना वार्षिक परीक्षा पाठ्यपुस्तकावर आधारित असतात आणि वर्णनात्मक उत्तरावर भर देण्यात येतो तर स्पर्धा परीक्षा तारखेचा सामान्य ज्ञान आणि जलद निर्णय क्षमता यांना प्राधान्य देतात या फरकांचा विचार करून विद्यार्थ्यांनी योग्य तयारी केल्यास दोन्ही प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळवणे कसे शक्य आहे यासाठी नियमित सराव वेळेचे नियोजन आणि तांत्रिक दृष्टिकोन अधिकाऱ्याला हवा असे या पुस्तकात नमूद केले आहे.
केवळ पाठ करण्यावर भर देऊ नये तर संकल्पना व संबोध समजून घ्यायला हवे तरच त्यांना त्या ज्ञानाच उपयोजन करता येईल. A I या साधनांचा उपयोग सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना करता येईल तसेच पालक शिक्षक आणि शिक्षण संस्थांना सुद्धा याचा वापर केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. स्पर्धा परीक्षेचा आधार हा मजबूत शैक्षणिक पाया असतो. प्रत्येक विद्यार्थ्याचे ज्ञानाची आणि अज्ञानाची कक्षा वेगवेगळी असल्याने त्यांचे पूर्वज्ञान, संज्ञात्मक क्षमता शिकण्याची पद्धत आणि घरचे वातावरण आणि मानसिक स्थिती ही प्रमुख कारणे आहेत त्यामुळे शिक्षणात वन हिट्स ऑल ही संकल्पना प्रभावी ठरत नाही. शिक्षकांनी टीचिंग वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धती स्वावलंब केल्यास प्रत्येक विद्यार्थ्यांची ज्ञान असल्याने शक्य होईल. प्रश्नउत्तर पद्धत हे विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि अज्ञान घटकांना प्रभावी साधन आहे या पद्धतीने शिक्षकाला वेगवेगळ्या चाचण्या घेण्याची गरज भासत नाही आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मर्यादा आणि सामर्थ्याचा अंदाज येतो. थोडक्यात ग्रुप डिस्कशन हे शिक्षणाचे गतिमान आणि परिणामकारक माध्यम आहे जे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देते पण वेळापत्रकात ग्रुप डिस्कशनला कुठे वेळ आहे. स्वयम अध्ययनाला चालना देणारे अनेक उपक्रम शाळांनी राबवायला हवेत. काही तंत्र विद्यार्थ्यांनी जर आत्मसात केली तर ते यश मिळवू शकतात. दिशाहीन अभ्यासामुळे अपेक्षित गुण त्यांना मिळत नाहीत. स्वतःला प्रश्न विचारून शिकलेले आठवले की विस्मरण कमी होते एखाद्या घटकाची पुनरावृत्ती अंतराने केली की ते ज्ञान दीर्घकाळ मेंदूत साठवले जाते. ग्रुप डिस्कशन, ओपन बुक टेस्ट यासारख्या पद्धतीमुळे व्यवहारिक होते अवघड प्रश्न सोडवण्याची सवय जी विद्यार्थ्यांना अवघड गोष्टी झुंजण्यास शिकवते. सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे साक्षरता आणि अंक ज्ञान जरी साध्य होत असले तरी सर्जनशीलता, करिअर, दिशा आणि व्यक्तिमत्व विकास ही मुख्य उद्दिष्टे मोठ्या प्रमाणावर अपूर्ण राहत आहेत. पाठांतर केंद्रित ते पासून कौशल्य केंद्रितेकडे बदल होणे आवश्यक आहे. बालपणापासूनच स्पर्धात्मक मानसिकता विकसित ठेवायला हवी त्यामुळे विद्यार्थी भविष्यातील आव्हानासाठी सज्ज होतील. शिक्षक वेळापत्रकानुसार शिकवतात पण सर्वच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही त्यासाठी विविध प्रकारचे उपाय या पुस्तकात सुचविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे ज्ञानेश्वरी आहे त्याचे पारायण जितके जास्त ते करतील तेवढे ते यशस्वी होतील.
अभ्यासाचे तंत्र आणि मार्कांचा मंत्र
डॉ. चंद्रकांत कणसे
पृष्ठे : 284 मूल्य: 560
प्रकाशन: संवेदना प्रकाशन
मुखपृष्ठ: पोरे ब्रदर्स सोलापूर
– डॉ अनिल कुलकर्णी


Leave a Reply