नवीन लेखन...

बाळगुटी एक वरदान – १ : प्रस्तावना व परिचय

बाळगुटी एक वरदान भाग १ : प्रस्तावना व परिचय

ह्या लेख मालिकेत आपण बाळगुटी व त्याचे उपयोग ह्याची माहिती घेणार आहोत. प्रत्येक भागात एक किंवा दोन बाळगुटीतील औषधी वनस्पतींची माहिती घेणार आहोत.

अगदी पूर्वीपासून आपल्या आज्जी – पणजी पासून आपण ऐकत आलो आहोत, बाळ जन्माला आलं की घरात असलेल्या अनुभवी बायका बाळाला काही त्रास झाला किंवा बाळ खूप रडत असल तर त्याला बाळगुटी द्या म्हणून सल्ला देतात.

आज आपण असाच आपल्यआजीच्या बटव्यातल पूर्वापार चालत आलेली बाळगुटी का देतात त्यात कोणत्या औषधींचा समावेश असतो त्याचे प्रमाण आणि द्यायची पद्धत ह्याबाबत माहिती मिळवणार आहोत.

तुम्ही तुमच्या आई किंवा आजीकडून बाळगुटी पाजणं किती गरजेचं आणि लाभदायक असतं याची कहाणी ऐकलीच असेल. इतकंच काय तर तुम्ही देखील बाळगुटी प्यायलीच असेल. पण या पारंपारिक बाळगुटीबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे की खरंच ही गुटी लाभदायक असते का? त्यांच्यासाठी हा लेख!

बाळगुटी (balguti) हा शब्द तुम्ही ऐकून असालच, नसेल माहित तर आपल्या घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींना किंवा आई वडिलांना विचारा. आजही बहुतांश समाजामध्ये बाळाला जन्मानंतर बाळगुटी पाजण्याची प्रथा आहे. डॉक्टर मात्र बाळाला बाळगुटी न पाजण्याचा सल्ला देतात, पण जुनी जाणती मंडळी मात्र बाळाला बाळगुटी पाजण्याचा आग्रह धरतात.

बाळगुटी पाजल्याने नक्की बाळाला फायदा होतो की नाही? फायदे होत असेल तर काय होतात आणि जर याचे तोटे असतील तर काय तोटे आहेत हि सर्व माहिती आज आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हालाही या दोन गटांमधील योग्य बाजू कळेल आणि तुमच्या मनातील सर्व अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील.—

बाळगुटी ही बाळाच्या प्रकृतीला उपयुक्त असलेल्या अनेक औषधी वनस्पतींचा एक पारंपरिक आयुर्वेदिक संग्रह आहे, ज्यामध्ये पचन सुधारणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि एकूणच बाळाच्या आरोग्याच्या विकासासाठी उपयुक्त घटक असतात. बाळगुटी सिरप किंवा उगाळून देण्याच्या स्वरूपात उपलब्ध असते. तरीही, काही उत्पादनांमध्ये जड धातूंचे प्रमाण जास्त आढळल्याने, बाळगुटी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. बाळाला दहाव्या दिवसापासून गुटी द्यायला सुरुवात करावी. बाळगुटी पहिले आठ महिने द्यावीच द्यावी. मात्र नंतरही शक्य असल्यास वर्ष- सव्वा वर्षापर्यंत गुटी देणे बाळाच्या एकंदर आरोग्य आणि विकासाच्या दृष्टीने उत्तम होय.

बालकांची बाळगुटी साहित्य आणि उपयोग:

परंपरागत चालत आलेली घरोघरी प्रत्येक नवजात बालकास संगोपनात उपयोगात आणली जाते ती म्हणजे बाळगुटी. यात कडू आणि तिखट चवीची औषधे असतात. हे पदार्थ पाण्यात,मधात उगाळून बाळाला दोन ते तीन वेळा मात्रा नुसार चाटवली जातात. अशी औषधे परंपरेने घराघरांतून चालत आली आहेत.काही वस्तूचे प्रमाण ते वापरातुन सिद्ध होते तसेच बाळगुटी ही वर्षानुवर्षे चालत आलेली वापरातील सिद्ध पध्दती. आपल्या आजीचा सोनेरी बटवा म्हटलं तरी चालेल. तसेच आजारपण होऊ नये म्हणून आधीच लक्षणावरच उपचार पद्धती भारतीय आयुर्वेदिकशास्त्र सांगते. ही औषधे टिकाऊ स्वरूपात आपणास केव्हा ही वापरता येतात. ही बाळगुटी उगाळून त्यांचे सूक्ष्म अंश बाळाला रोज देता येतात.

बाळगुटी म्हणजे काय?

• एक पारंपरिक आयुर्वेदिक मिश्रण:
बाळगुटी हा बाळांच्या आरोग्यासाठी दिला जाणारा एक पारंपरिक आयुर्वेदिक उपाय आहे, ज्याला जन्मगुटी असेही म्हणतात.
• औषधी वनस्पतींचा संग्रह:
यामध्ये पचनशक्ती सुधारणारी, हाडांना बळकट करणारी, मेंदूचा विकास करणारी आणि जंत कमी करणारी अशा अनेक औषधी वनस्पतींचा समावेश असतो.
• दोन प्रकार:
बाजारात बाळगुटी दोन स्वरूपात उपलब्ध आहे – एक सिरप स्वरूपात आणि दुसरे उगाळून देण्याच्या स्वरूपात, ज्यात वनस्पतींचे मूळ किंवा काष्ठ स्वरूपात वापरले जातात.
कसा वापरतात?
• उगाळून देण्याच्या गुटीसाठी, सहाणेवर औषधी वनस्पती उगाळून त्या आईच्या दुधात किंवा उकळलेल्या पाण्यात मिसळून बाळाला पाजले जाते.
फायदे: बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी हे फायदेशीर मानले जाते, पचनशक्ती सुधारते, रोगप्रतिकारशक्ती आणि वजन वाढण्यास मदत करते.
• अमेरिकन एफडीए (U.S. Food and Drug Administration) ने काही बाळगुटी उत्पादनांमध्ये आर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारखे जड धातू आढळून आल्याने ती वापरू नयेत असा इशारा दिला आहे.

बाळगुटी हे एक आयुर्वेदिक औषध असून खास नवजात बाळांसाठी ते तयार केले जाते. यात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो आणि त्यातील औषधी तत्वे बाळाच्या शरीराला सक्षम करतील असं त्यामागाचा हेतू असतो. या प्रामुख्याने अश्वगंधा, अतिविष, मुरुडशेंग, बाळ हिरडा, जायफल, हळदीचे मूळ, सुंठ, खारीक, बदाम, जेष्ठमध, डिकेमाळी, वेखंड आणि काकड शिंगी या औषधी वनस्पतींचा समावेश असतो. या सर्व वनस्पती एकत्र करून त्यांच्यापासून तयार होते बाळगुटी. बाजारात रेडीमेड बाळगुटी सुद्धा उपलब्ध होते.

बाळगुटीला जन्मगुटी असेही म्हणतात. हा एक पारंपारिक भारतीय आयुर्वेदिक काढा आहे. हा काढा आईच्या दुधामध्ये किंवा पाण्यात मिसळून बाळाला पाजला जातो. बाळगुटीमध्ये असणाऱ्या विविध औषधी वनस्पतींमुळे त्यात विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आढळून येतात. काही पालक बाळ जन्मताच पहिल्या दिवसापासून त्याला बाळगुटी पाजायला सुरुवात करतात. असं म्हणतात की बाळगुटी पाजल्याने बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि दात येताना किंवा अतिसार व बद्धकोष्ठता झाल्यावर त्याला ज्या वेदना होतात त्या बाळगुटीच्या सेवनाने होत नाहीत.

अश्वगंधा, अतिविष, मुरुडशेंग, बाळ हिरडा, जायफल, हळदीचे मूळ, सुंठ, खारीक, बदाम, जेष्ठमध, डिकेमाळी, वेखंड आणि काकड शिंगी या सर्व औषधी वनस्पतींना सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. 20 ते 30 मिली इतके आईचे दुध घ्यावे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही फॉर्म्युला दुधाचा सुद्धा वापर करू शकता. स्लेटवर एक थेंब दुध टाका आणि नंतर एक एक करून सर्व औषधी वनस्पती दोन ते तीन वेळा घासून उगाळून घ्या. एक औषधी वनस्पती उगाळून झाली की त्याचा लेप बोटांनी उचलून चमच्यात घ्या. जेव्हा अशा प्रकारे सर्व वनस्पती उगाळून होतील तेव्हा तो सर्व लेप आईच्या दुधात व पाण्यात मिसळून बाळाला पाजा.

बाळगुटी कधी पाजावी?

जर बाळ वारंवार रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी तुम्ही बाळगुटी पाजू शकता. दात आल्यावर हिरड्यांमधील सूज आणि बाळाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा बाळगुटी बाळाला देऊ शकता. याशिवाय बाळाचे पोट फुगले वा त्याला अपचन होत असेल तर बाळगुटी दिली जाते. जेणेकरून त्याच्या पचनक्रियेत सुधारणा होईल. याशिवाय बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि बाळाचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून बाळाला बाळगुटी देण्याचा सल्ला दिला जातो.
डब्‍ल्‍यूएचओचं मत काय?

जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO च्या म्हणण्यानुसार नवजात बालकाला जन्माच्या सहा महिन्यांपर्यंत आईचे दुध आणि फॉर्म्युला मिल्क याशिवाय काहीही देऊ नये. हा काळ त्याच्या शरीरासाठी अतिशय नाजूक असतो. या काळात बाळाला सर्वात जास्त आपल्या आईच्या दुधाची गरज असते. डॉक्टर सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार बाळगुटी न पाजण्याचा सल्ला देतात. बाजारात मिळणाऱ्या बाळगुटीमध्ये प्रिजर्वेटिव्स असतात जे बाळासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. तर मंडळी एकंदर पाहता बाळाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जाणकारांकडून बाळाला बाळगुटी न पाजण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदिक काढे हे कधीकधी बाळासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतात आणि त्यांचा फायदा होण्याऐवजी बाळाच्या शरीरावर उलटे परिणाम होऊ शकतात. म्हणून शक्य असल्यास बाळाला बाळगुटी न पाजणे योग्य ठरेल असे WHO चे मत आहे. परंतु बाळगुटी ही आयुर्वेदात हजारो वर्षांपासून अस्तित्वात व वापरात आहे. त्याचे चांगले परिणामही सिद्ध झालेले आहेत.

त्यामुळे WHO चे मत हे अमेरिकेतील बाळांना देणारी औषधे खपवण्यासाठी व्यक्त केले आहे असे म्हणण्यास जागा आहे. अर्थात बाळास जन्मजात गंभीर आजार असेल तर बाळगुटी वर्ज्य करण्याचा सल्ला स्वतःहून वैद्यच देतात.

संदर्भ:
१. पतके हॉस्पिटल कोल्हापूर यांचा लेख
२. मराठी विश्वकोश
३. Wealth of India, CSIR New Delhi
४. गुगळे वरील बरेच लेख
५ सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
मोबा: ९८८१२०४९०४
इ मेल : dkkul@yahoo.com
२५. १०. २०२५

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 103 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on बाळगुटी एक वरदान – १ : प्रस्तावना व परिचय

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..