नवीन लेखन...

सुखाचे संदर्भ

रविवार या एकाच दिवशी मनासारखे झोपायला मिळते म्हणून जाग आलेली असतानाही मी आणि माझा दहा वर्षाचा मुलगा अंथरुणावर लोळत पडलो होतो. बायको उठली आहे हे किचनमधल्या भांडयाच्या आवाजावरून कळत होते. कुठलेही भांडे गॅसवर ठेवण्याआधी ते टिकाऊ आहे की नाही हे आपटून बघते की काय कळत नव्हते. “अरे दहा वाजले, उठा आता दोघेही.” “काय यार मम्मी पण, […]

मी प्रेमभाव जागवला

माझ्यातला चांगुलपणा मी पुन्हा जागवला प्रेमभाव अंतरीचा पुन्हा मी जोपासला मनातली वैरभावना ती कशी कावरी-बावरी झाली प्रेमाच्या सानिध्यात फार काळ नाही टिकली खूनशी वृत्ती ती मन पोखरत राहीली चांगुलपणाला घाबरून प्रेमाला शरण आली तिरस्काराचे ते पेटते बाण होते जरी सुटलेले आपुलकीच्या ओलाव्याने आपसुकच ते विझलेले रोषानेही मग आपला रस्ता तेंव्हा बदलला द्वेषालाही अस्तित्वाचा जणु उबग आला […]

मतांची पोतडी सत्तेची गोधडी : अर्जन्सी

( जुन्या काळीं, अर्जन्सी दर्शविण्यासाठी असें लिहीत – ‘जेवत असलात तर हात धुवायला इकडेच या’. त्या आधारानें,  हें काव्य, जरासें खट्याळ ).   तुम्ही तातडीनें इकडे या, अर्जंट या.   जेवत असलात तर हात धुवायच्या आधी इकडे या. अन् मत द्या. पाणी पीत असलात तर फुलपात्रं खाली ठेवण्यांआधी इकडे या. अन् मत द्या. आंघोळ करत असलात […]

आध्यात्म……… एक दिव्यामृत !

आजच्या यंत्रयुगात आपण सुध्दा एक यंत्र बनलो आहोत. यंत्राप्रमाणे घाई घाईत आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपले जीवन झाले आहे. शारीरीक श्रम कमी झाले, जीवन आरामातजगणे सोपे व सुकर झाले, सर्व सोई -सुविधा उपलब्ध झाल्या. मात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट कायमचीच हरवून गेली, ती म्हणजे मन:शांती होय ! आजआपल्याकडे मन:शांती सोडून सर्व काही आहे.  […]

अभंग

घरधनी तीचा |भेटण्यां विट्ठला || वारीस निघाला |पंढरीच्या ||१|| घरदार सारं | वावर सोडून || कर्ज गा काढून | तीर्थ करी ||२|| डवरण्या शेत |नाही गडी कोणी || गेला घरधनी | पंढरीसी ||३|| वावरात तीच्या | माजले रे तण || करिते निंदण | एकटी ती ||४|| आभाळ फाटलं | लागली ही झड || झाली पडझड | […]

आठवले मला 

माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर.

अमेरिकेच्या स्पेस फोर्स’मुळे अंतरिक्षाला युद्धभूमी बनवण्याची शक्यता

भारताने संयुक्त राष्ट्रसंघात अंतरिक्षाला  रणभूमी बनविता कामा नये, अशी भूमिका मांडली होती. परंतु आता अंतरिक्षातील धोक्यांपासून पृथ्वीचे संरक्षण करण्याऐवजी आपापल्या देशांच्या सुरक्षिततेसाठी अंतरिक्षाचा वापर करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. […]

आनंदी जीवन

जिवन हे आनंददाई आहे त्याचा आनंद प्रत्येकाने भरभरुन घेणे अपेक्षित असते. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या घरापासुन केली तर सर्वच घर आनंदाने भरून जाईल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदात असल्याने सर्वांचे आपापसातील संबंध आपुलकीचे व जिव्हाळ्याचे राहतील. घरातील कौटुंबिक वातावरणाचा परीणाम संपुर्ण वास्तूवर होत असतो. घराची वास्तू सभोवतालचे वातावरण सर्वच आनंदी राहते. […]

मतांची पोतडी सत्तेची गोधडी : खांदणी

आमचं नांव खंडेराव मते. आम्ही पक्षातले ‘चुनावी-महत्व’ असलेले नेते.      १   इलेक्शनचं ओझं आमच्या खांद्यावर होतं. त्यासाठी खूऽप खूऽप खपलो. विरोधकांचा खडक फोडायचा, मतांच्या खुरटल्या रोपट्याला पाच वर्षं खतपाणी घालायचं, मतं खांदायची, आपल्या पक्षाच्या बांधावर मांडायची, सांधायची, मनं जोपासायची, तण खुरपायचं, मतदारांना खिलवायचं-पिलवायचं, तन-मनानं, पण मुख्य म्हणजे धनानं मळा शिंपायचा, फळ येईल याची खात्री करायची, आपला […]

श्री स्वामी समर्थ पंथाचे श्रेष्ठत्व !

अनादि कालापासून चालत आलेल्या सृष्टिचा गाडा सुरळित चालविण्यासाठी परमेश्वराने नानाविध अवतार धारण करुन जगताला सन्मार्गाला लावण्याचे कार्य केले. धर्माला आलेली ग्लानी दुर करून, सज्जनांचा सांभाळ केला. प्रंसगानूरुप घेतलेल्या अशा अनेक अवतारावरून त्या त्या देवतेची उपासना सुरू झाली. या उपासनेचा क्रम असाच पुढे वाढत जाऊन, त्यातून मग अनंत पंथ, असंख्य संप्रदाय निर्माण झाले. या असंख्य संप्रदायाचे पुढे अगणित पंथ प्रमुख, धर्मगुरू निर्माण झाले. पुढे याच प्रमुखांचे, धर्मगुरूंचे वारस आणि अनुयायी वाढत गेले. […]

1 2 3 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..