About Jaywant Bhaurao Wankhade
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

मागू तिला कसे मी ?

मागू तिला कसे मी ? वृत्त :- आनंदकंद लगावली :- गागालगा लगागा गागालगा लगागा गेली निघून कोठे ,गाठू तिला कसे मी? घेणे जुनेपुराणे,मागू तिला कसे मी? राहून भेट गेली ,गर्दीत चाहत्यांच्या ये एकटी पहाटे,सांगू तिला कसे मी ? घालून पोत काळी,भेटावयास आली हा लागला सुगावा,भेटू तिला कसे मी ? चर्चा नको म्हणाली,गावात भेटल्याची सोडून गाव जा […]

गझल – नको वागणे आज झाडाप्रमाणे

*गझल* *वृत्त :- भुजंगप्रयात* *लगावली :* लगागा लगागा लगागा लगागा नको वागणे आज झाडाप्रमाणे तया लोटते जग कवाडाप्रमाणे धनाचेच लोभी ,महाराज काही किती वागती ते ,लबाडाप्रमाणे सगेसोयरे फार लाडावले तू तरी वार त्यांचेच भ्याडाप्रमाणे तुझे दु:ख आहे, जरी फार मोठे नको वागवू ते , बिऱ्हाडाप्रमाणे कशाला कुणाशी ,अबोला धरावा नसे जिंदगी जर, पहाडाप्रमाणे तुला कर्ण कोणी, […]

गझल – प्रार्थना ही तिला भावली शेवटी

गझल वृत्त :- स्त्रग्विनी *लगावली* :- गालगा गालगा गालगा गालगा प्रार्थना ही तिला,भावली शेवटी साथ देण्यास ती,धावली शेवटी पोसली मी जिला रक्त पाजून ती; नागिणी सारखी,चावली शेवटी शोधली मी दया गावखेड्यात पण माझिया अंतरी , घावली शेवटी कोण येणार अंती बरे सोबती साथ येणार ती,सावली शेवटी सोडली साथ मी,काल तीची जरी हाक देताक्षणी पावली शेवटी © […]

अंगठी बोटातली फेकून गेला

*गझल* *वृत्त :- व्योमगंगा* *लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेला आवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी; स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला ” प्रेम माझे फार आहे “, भेटला तेव्हा म्हणाला मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेला दु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी […]

अभंग

घरधनी तीचा |भेटण्यां विट्ठला || वारीस निघाला |पंढरीच्या ||१|| घरदार सारं | वावर सोडून || कर्ज गा काढून | तीर्थ करी ||२|| डवरण्या शेत |नाही गडी कोणी || गेला घरधनी | पंढरीसी ||३|| वावरात तीच्या | माजले रे तण || करिते निंदण | एकटी ती ||४|| आभाळ फाटलं | लागली ही झड || झाली पडझड | […]

गझल

वृत्त :- मानसी लगावली :- गागालगा लगागा गालगा लगागा* आगीत पेटलेले गाव पाहिले मी चोरास साथ देण्या साव पाहिले मी ++++++++++++++++++ गावात श्वापदांची वाढली मुजोरी डोळ्यात पेटलेले भाव पाहिले मी +++++++++++++++++++ भूकेजला कसा आत्ताच गाव माझा धान्यास फेकणारे राव पाहिले मी ++++++++++++++++++ हास्यात आज होते दु:ख गोठलेले ह्रदयात लपवलेले घाव पाहिले मी +++++++++++++++++++ थाटात आज होते […]

भावना

गलेलठ्ठ झाले ठेकेदार उंदीर मारणारे अवकाळी फाशी चढत आहे शेतात राबणारे दिनरात राबतो घामात न्हाहतो शीवारात तो मिळवीत आहे नफा तक्क्यास टेकून लोळणारे कसे रे मिटावे कर्ज हे सातबाऱ्यावरचे आज सभागृहात कमी माझ्या हक्कांसाठी भांडणारे पुराव्याच्या फाईली सगळ्या कुरतडल्या उंदरांनी होतील मुक्त सारेच आता घोटाळे करणारे मिळावा अधिकार मलाही उंदीर हे मारण्याचा मारील आनंदाने चारदोन बाँम्ब […]