अंगठी बोटातली फेकून गेला

*गझल*

*वृत्त :- व्योमगंगा*

*लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा

अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला
साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेला

आवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी;
स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला

” प्रेम माझे फार आहे “, भेटला तेव्हा म्हणाला
मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेला

दु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही
स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी पाहून गेला

हौस त्याची भागलेली ,पाहता आले न कोणा
लग्न त्याचे मोडले ही, बातमी देवून गेला

श्राप माझा लागला त्याला म्हणे कोणी तरी ते
भेटला लग्नात माझ्या, तो क्षमा मागून गेला

© जयवंत वानखडे,कोरपना

 About Jaywant Bhaurao Wankhade 12 Articles
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

पुणे जिल्ह्यातील रोहीडा किल्ला

शिवकालात रोहीडय़ाचा किल्ला दुय्यम होता. तसेच इतिहासमधेही फारशी मोठी घटना ...

नागपूर जवळचा रामटेक किल्ला

नागपूरजवळच्या रामटेक गावामध्ये रामटेकचा गिरीदुर्ग उभा ठाकलेला असला तरी या ...

पद्‌मालय गणेश मंदिर, एरंडोल, जि. जळगांव

हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आहे. भारतातील प्रमुख गणेश ...

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

Loading…