डोहात वेदनेच्या आनंद शोधतो मी

गझल – वृत्त :- आनंदकंद

लगावली :-गागालगा लगागा गागालगा लगागा

डोहात वेदनेच्या ,आनंद शोधतो मी
दु:खातही हसावे,हृदयास सांगतो मी

वेडा म्हणेल कोणी,याची मला न चिंता
गातो नवे तराणे ,तंद्रीत राहतो मी

गेले उडून पक्षी शोधात भाकरीच्या
ओसाड गाव झाले, माणूस मागतो मी

जातीत वाटलेली झाली हवा विषारी
जाती बघून आता संबंध ठेवतो मी

पंथात कोणत्याही भक्ती मला दिसेना
ही जात माणसाची ढोंगीच मानतो मी

गेले निघून माझ्या शब्दातले निखारे
हल्ली नव्या पिढीच्या शब्दास झेलतो मी

© जयवंत वानखडे,कोरपनाAbout Jaywant Bhaurao Wankhade 12 Articles
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – करवंदे

'डोंगरची काळी मैना' म्हणून प्रचलित असलेले करवंद हे काळे लहानग्या ...

कोकणचा मेवा – कोकम

आंब्याबरोबरच काळसर लाल रंगाचे कोकमही लक्ष वेधून घेतात. ताजे कोकमही ...

कोकणचा मेवा – आंबा

उन्हाळा वाढत असतांना काजूसोबतच उभ्या असलेल्या आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या ...

कोकणचा मेवा – काजू

कोकणचा मेवा - काजू

उन्हाळा सुरू झाला की रस्त्याच्या कडेला असलेल्या काजूच्या झाडातून चमकणारी ...

Loading…