अभंग

घरधनी तीचा |भेटण्यां विट्ठला ||
वारीस निघाला |पंढरीच्या ||१||

घरदार सारं | वावर सोडून ||
कर्ज गा काढून | तीर्थ करी ||२||

डवरण्या शेत |नाही गडी कोणी ||
गेला घरधनी | पंढरीसी ||३||

वावरात तीच्या | माजले रे तण ||
करिते निंदण | एकटी ती ||४||

आभाळ फाटलं | लागली ही झड ||
झाली पडझड | गावोगावी ||५||

पाऊस बोवारा | कधीचा थांबेना ||
तीला करमेना | घरामंधी ||६||

हंबरते बैल | गोठ्यात जोरानं ||
रिकामी गव्हाण | पाहुनिया ||७||

नाही पाहवला | त्यांचा कळवळा ||
उचलून विळा | निघाली ती ||८||

मुक्या त्या जिवात |दिसला रे तीला ||
देव लपलेला | भूकेजुन ||९||

सांगिले संतांनी | करा भूतदया ||
द्यावी रे बा माया | प्राणीमात्रा ||१०||

आचरले तीने | आवडीने व्रत ||
नाही पंढरीत | देव तीचा ||११||

— © जयवंत वानखडे,
कोरपना

About Jaywant Bhaurao Wankhade 13 Articles
मी स्वेच्छा सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून कविता लेखन करतो

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…