आध्यात्म……… एक दिव्यामृत !

आजच्या यंत्रयुगात आपण सुध्दा एक यंत्र बनलो आहोतयंत्राप्रमाणे घाई घाईत आणि घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपले जीवन झाले आहेशारीरीक श्रम कमी झालेजीवन आरामातजगणे सोपे  सुकर झालेसर्व सोई सुविधा उपलब्ध झाल्यामात्र या सर्वात एक महत्वाची गोष्ट कायमचीच हरवून गेलीती म्हणजे मन:शांती होय ! आजआपल्याकडे मन:शांती सोडून सर्व काही आहेलाखोंच्या गाड्या – घोड्याहजारोंचो मोबाइल,अब्जावधींची संपत्ती हे सर्व काही आहेपण तरी सुध्दा मन:शांती नाहीतर काही जणाकडे काहीचनाही म्हणून ते दु:खी आहेतअशी आजची ‍‍स्थिती आहेज्यांच्याकडे पुष्कळ आहे तरी तो दु:खीअन् ज्यांच्याकडे गरजेपुरते आहे तरी तो दु:खीचअसे का व्हावे ? तर आपण आपला मार्ग बदललाआहेआपली जीवन शैली बदलली आहेआपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.आपण भौतिक सुखाच्या मागे धावत सुटलो आहोतक्षणभंगूर सुखाला कवटाळून बसलो आहोत.त्यामुळे जगाला मन:शांतीचे धडे देणारा भारत देश आज स्वत: मन:शांती शोधत आहे.जगभरातले लोक मन:शांती मिळविण्यासाठी भारतात येतात आणि आम्ही लोक मात्र हीचमन:शांती जगाच्या बाजारात शोधत आहोतहा विरोधाभास म्हणावा की कपाळकंरटेपणा हेच समजत नाही.
पाश्चिमात्य भोगवादी संस्कृतीत हरवलेली  मन:शांती पुन्हा पाश्चिमात्य जगातच शोधल्यासकशी सापडेलहे साधे गणित ही आपल्याला समजू नयेएवढे आपण पाश्चिमात्यांच्या अधिन गेलोआहोतहा केवढा दुर्दैवविलास आहेपाश्चिामात्य जगात आपल्याला सर्व काही मिळेलमात्रशाश्वत सुख मिळणार नाहीजेवढे आपण पाश्चिमात्यांच्या आहारी जाऊतेवढीच मन:शांतीआपल्यापासून दुर दुर जात राहीलकारण शाश्वत सुख किंवा मन:शांती ही केवळ आपल्यालाआपल्या भारत देशातच आणि ती सुध्दा फक्त आध्यात्मातूनच मिळू शकतेहा मन:शांतीचाअनमोल ठेवा परमेश्वाराने आध्यात्माच्याच तिजोरीत सुरक्षितपणे ठेवलेला आहेआध्यात्म हीएकच अशी बाब आहे कीजी अति सुखात अथवा अति दु:खातगरिबीत किंवा श्रीमंतीत मनुष्यालास्थितप्रज्ञ ठेवतेज्यामुळे मनुष्याला एक नव उर्जा मिळतेजेणेकरून तो गरिबीमुळे  लाजता ताठमानेने संकटाना तोंड देतो तर श्रीमंतीतही धनाचा गर्व  करता सात्विक प्रेमाचा वर्षाव करतोहीउच्च अवस्था फक्त आध्यात्मानेच साध्य होतेपाषाण ऱ्हदयी मनुष्यात सुध्दा ममतेचा सागर निर्माणकरण्याचे सामर्थ्य हे केवळ आध्यात्मातच आहेएवढेच नव्हे तर आपल्याला पावलोपावली त्रासदेणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोंकाचेही कल्यायणच व्हावेअशी कामना करणारे संत ज्ञानेश्वरसंतएकनाथसंत तुकाराम महारांजासारखे थोर महात्मे केवळ आध्यात्मातूनच निर्माण होतातहीआध्यात्माची शक्ती  सामर्थ्य आहेनराचा नारायण बनविण्याची व्याप्ती ही केवळ आध्यात्मातचआहे !
भौतिक सुखापेक्षाही काही वेगळे  आत्मानंद देणारे चिरतंन सुख या जगात आहेयाची जाणीव  प्रत्याक्षानुभूती आध्यात्मानेच येतेमनुष्य एका दिव्य चैत्यन्याने चिंब भिजून जातो.ब्रह्मानंदाचे रसपान करतोसुखाचा संसारसमाधानी जीवनशाश्वत शांतीची प्राप्ती हे केवळआध्यात्मच देतेम्हणून आपण नेहमी आध्यात्माच्या संगतीत राहावेअल्पशी का होईना ईश्वरआराधना दररोज  चुकता करावीआपल्या इष्ट देवतेचे ध्यानचिंतनमनन करावेतिचे स्मरणकरावेमात्र यात कोणताही बाह्य देखावा नसावाजटिल कर्मकांड नसावेनियमांचा अतिरेकनसावातर यात शुध्दसात्विक भक्तिभाव  अतुट श्रध्दा असावीआपल्या साधनेलाईश्वरभक्तिला वैदिक अधिष्ठान असावे.
आध्यात्म तो शक्ती:पुंज आहेजो आपल्या संपर्कांत आलेल्या सर्वांना आपल्याशक्तीपाताने पवित्र  पावन करतोजसे चंदन आपल्या सहवासात आलेल्या सर्वांना सुंगधित करते,तसेच काम आध्यात्म करतेसर्वांना सुखी  समाधानी करणे हा आध्यात्माचा मुळ उद्देश आहेयाउद्दिष्टपुर्तिसाठीच आध्यात्माची उत्पत्ती विधात्याने केलेली आहेकारण शेवटी आध्यात्म म्हणजे
                                        ॐ सर्वे भवन्तु सुखिनसर्वे सन्तु निरामया:
                                         सर्वे भद्राणि पश्यन्तुमा कश्चिद्दु:खभाग्भवेत्
असे सर्वांच्या कल्याणाचासद्गतीचा मार्ग सांगणारे  त्यासाठी प्रयत्न करणारेअहोरात्रझटणारे शास्त्र म्हणजे आध्यात्म होयआध्यात्म हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहेयात श्रमिकांच्या श्रमापासून ते चक्रवर्ती सम्राटाच्या ऐश्वर्यापर्यंत सर्वांची उत्तरे आहेतसमाधान पुर्वक जगण्याचासोपा मार्ग प्राप्त करून देणारे एक आधारभूत अमृत म्हणजे आध्यात्म शास्त्र होयम्हणून सर्वांनी आध्यात्माचे यथेच्छ रसपान करून इतरांना ही याचा स्वाद चाखु द्यावाहीच अंतरीची तळमळव्यक्त करून लेखणीला येथेच विराम देतो.
॥ श्री स्वामीसमर्थचरणार्पणमस्तु 
— सुनिल कनले 

सुनिल कनले
About सुनिल कनले 14 Articles
श्री.सुनिल कनले हे गेल्या 16-17 वर्षापासून स्वामी सेवेत आहेत. त्यांनी परभणी जिल्ह्यातील 70 गावात स्वामी कार्याचा प्रचार व प्रसार केला आहे, शेकडो व्याख्याने दिली आहेत. लोकांच्या मनातील स्वामी महाराजांबद्दल असलेले गैरसमज दुर करणे व लोकांना परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्य आणि शुध्द स्वरूपाची माहिती पोहोचविणे, हे कार्य लेखक स्वामी कृपेने करत आहेत. स्वामी सेवेचा प्रचार करणे व पाखंडी लोकांचे मत खंडण करणे हा प्रमुख उद्देश आहे. तसेच डोळस व आपल्या कर्मावर विश्वास असणारी नविन पिढी निर्माण करण्याचा प्रयत्न लेखकांचा आहे. आळसी माणसाचे तोंड ही पाहू नये ! हे स्वामी वचन कायम स्मरणात ठेवून ही वाटचाल सूरु आहे. लेखकांकडे स्वत:चे असे 1000 ग्रंथाचे वैयक्तिक ग्रंथालय हे त्यांच्या स्वत:च्या वाचन आवडीतून व ग्रंथ संकलनातून निर्माण झालेले आहे. यात 04 वेद, 18 पुराण, धर्मसिंधू, निर्णयसिंधू, मनुस्मृती, प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथ, संत चरित्रे, अंभग गाथा, ज्योतिष्य शास्त्रविषयक ग्रंथ, तसेच ईतर अनेक सांप्रदायिक ग्रंथ, ऐतिहासिक ग्रंथ, कांदबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे इ. अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…