आठवले मला 

माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर.

कधी तरी अगदीच कधी तरी
सौकाही दिवस नसायची घरी

सोनुली माझी मजेत रहायची
हौस मला तिची आई होण्याची

पण
झोपायची वेळ झाली की
कावरे बावरे व्हायची

म्हणायची मग, मम्मी कुथे गेली
पप्पा, मम्मी कुथे गेली ?…

मी म्हणायचो

येइल बघ आता ती कधीपण
चल, खोटं खोटं झोपायचं का आपण

मग ती घ्यायची 

खोटं खोटं डोळे मिटून
माझे डोळे मात्र जायचे 

आसवांनी भिजुन

आणि मग त्या रात्री
थोड्या वेळाने पुन्हा 

तिने हळूच डोळे उघडले
माझे ओलावले डोळे 

नाही मला लपवता आले

म्हणाली, पप्पा खरं खरं सांग ना
तुला पण मम्मीची आठवण येतेय ना ?…

आणि मग
कोवळ्या हाताने 

मलाच ती थोपटू लागली
पप्पा जो जो म्हणत 

अलगद झोपी गेली.

डॉ. सुभाष कटकदौंड, खोपोली.

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…