नवीन लेखन...
डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

स्नेह… तुझा माझा 

तुझ्या माझ्या भावनांतुन सदैव प्रेमानं आरवावं नव्या सुंदर कल्पनांनी घर आपल सारवावं तुझ्या सुंदर डोळ्यांनी तू मला भुलवावं प्रेमाच्या झोक्यावर मी तुला झुलवावं कोलमडलो कधी तर एकमेकांना सावरावं आपल्या क्रोधाला आपण संयमाने आवरावं गैरसमजाच्या खड्यांनी समंजसपणे बुजावं छोट्या छोट्या कुरबूरींना तू दूरवर फेकावं तुझ्या माझ्या स्नेहाला दोघांनी साचवावं नात्याच्या बंधांना तुटण्यापासून वाचवावं तू कधी खोटं खोटं […]

दोष नव्हता तिचा…

दोष नव्हता तिचा अन् वाट ही नव्हती ती चुकली बदमाशांच्या जाळ्यात अनाहुतपणे होती फसली उन्मत्त नशेने माजून ते सैतान झाले होते विकृत ओंगळ भावनेला पूरूषार्थ समजत होते मनावरच्या आघाताने जरी नव्हती ती खचली आत्मसन्मानाची लढाई जिंकू नव्हती शकली विधात्यालाही नाही कळले  विकृत हवस ती कसली नीच त्या नराधमांनी माणूसकीलाही भोसकली आंधळ्या त्या न्यायदेवतेला होते सारे स्पष्ट […]

प्रेम स्वयंपाक घरातुन…

नको ना रे राजा नको असा माझ्यावर रूसुस वड्यांवरचे तेल नको वांग्यावर तू काढुस संसार म्हणजे लागणार रे भांड्याला भांड पण मनातल्या संतापाला तू हळुवारपणे सांड तापलेल्या वातावरणात एकान बसावं चूप वाफाळलेल्या वरणभातावर ओतेन मायेचं साजुक तूप प्रेमाला असु द्यावी रूसव्या फूगव्याची जोड प्रेम म्हणजे लोणच्याची आंबट तिखट फोड थोडीशी थट्टा मस्करी म्हणजे जगण्याची मजा कोशिंबीर […]

गोड स्वप्नं 

अजुनही एकांतात कधी तिला आठवते कोवळ्या त्या मनाचे सुंदर गोड स्वप्न ते… त्याला पाहुन तिचं मन झुरलं होतं कळलं नव्हतं तिला पण ह्रुदय हरवलं होतं बसल्या बसल्या बोटानं वहीत रेषा ओढत होती स्वतःच्या नावापुढे त्याच नाव जोडत होती झुरलेल मन तिचं शब्द शोधत होतं भावनां व्यक्त करण्यास बळ शोधत होतं ओठांवरच्या शब्दांना कंठ नाहीच फूटला हळुहळू […]

रात्र…चिरःकाल टिकणारी 

लहानपणी रात्र कशी अगदी लवकर यायची थकलेल्या मला कशी पटकन निजवायची. कळु लागले तशी रात्र ही शांत झाली तिला मला जणु स्वतःची ओळख मिळाली. तरूण झालो तेंव्हा रात्र कशी रोमांचित होई रातराणीच्या वासानं ती धुंद होउन गाई. संसाराच्या धावपळीत चैन रात्रीची हरपली काळजीने ग्रस्त रात्र उशीराने झोपू लागली. स्वप्नाळु रात्र फार काळ नाही स्वप्नात रमली वास्तवाच्या […]

मैत्रीला निरोप

शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप […]

आई माझी रूसली…

गोष्टी ऐकायला कोणी नाही म्हणुन आई माझी रूसली माझ्याकडे पाहून तेंव्हा अगदी उदास कोरडं हसली. नंतर माहित नाही कसे तिने हात पाय गाळले खचली ती अन् तिने कायमचे अंथरुण धरले. जणु तिची जगण्याची ईच्छाच होती मेली मरणाकडे डोळे लावून वाट पहात राहिली. एका रात्री बाबा येऊन माझ्या अगदी जवळ बसले अस्वस्थ मला बघून त्यांचे डोळे दूःखाने […]

रुसल्या त्या आठवणी 

पूर्वीच ते घर कसं जायचं अगदी गजबजून गप्पांच्या त्या मैफलीत आठवणी यायच्या धावून. आता कसं सर्व काही शांत अन् निवांत आहे पण, आठवणींच्या आठवणींने मन थोडसं अशांत आहे. पूर्वी आठवणी कशा अगदी मनमोकळ्या हसत सवय नव्हती त्यांना अन् नव्हत्या कधी रुसत. आठवणी पूर्वी कशा रहायच्या सदैव बोलत कुजबूजतात कधिमधी आणि बसतात आता झूरत. भिजतात काही आठवणी […]

प्रितीची नवी ओळख 

रिमझिम पाऊस आला सृष्टी रोमांचित झाली प्रेमाच्या वर्षावात दोघं होती नहाली थोडावेळ एकाच छत्रीत दोघं होती चालली स्पर्शाला टाळत नंतर आडोशाला स्थिरावली मी हलकेच नजर तिच्याकडे वळवली ओल्या गालावरून लाज होती घसरली सोसाट्याचा वारा तरी ती नाही घाबरली नकळत थोडीशी माझ्या बाजूला सरकली थंड वाऱ्याच्या स्पर्शाने जरी ती शहारली संयमाला टेकून हलकेच कुडकुडली मध्येच विज कडाडली […]

मनाच्या नदीने वाहतच रहावं

मनाच्या नदीने कसं वाहतच रहावं झाले गेले सारे ते विसरून जावं वाटेवरच्या वळणावर थोड्यावेळ थांबावं अपरिचित काही मनांना प्रेमानं जोडावं मनाच्या काठावर कधी शांत बसावं चिंता विवंचनांना अलगद पाण्यात सोडावं येणाऱ्या साऱ्या प्रवाहांना आपल्या पोटात घ्यावं जिवलगांच्या दूःखांना कसं प्रेमाने सहावं मनाच्या नदीने कसं वाहतच रहावं मनाच्या नदीने कसं संयमाने वहावं संतापाच्या परिणामांना शांत प्रेमानं भरावं […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..