नवीन लेखन...

स्नेह… तुझा माझा 

तुझ्या माझ्या भावनांतुन
सदैव प्रेमानं आरवावं
नव्या सुंदर कल्पनांनी
घर आपल सारवावं

तुझ्या सुंदर डोळ्यांनी
तू मला भुलवावं
प्रेमाच्या झोक्यावर
मी तुला झुलवावं

कोलमडलो कधी तर
एकमेकांना सावरावं
आपल्या क्रोधाला आपण
संयमाने आवरावं

गैरसमजाच्या खड्यांनी
समंजसपणे बुजावं
छोट्या छोट्या कुरबूरींना
तू दूरवर फेकावं

तुझ्या माझ्या स्नेहाला
दोघांनी साचवावं
नात्याच्या बंधांना
तुटण्यापासून वाचवावं

तू कधी खोटं खोटं
माझ्यासाठी हरावं
मी कधी तुझ्यासाठी
जग सारं जिंकावं

झालेल्या तुझ्या चूकांना
मी अगदी सहज विसरावं
कधी माझ्या कुशीत शिरून
तू दूःखाला ओघळावं

तुझ्या माझ्या प्रेमाला
ह्रुदयात खोलवर रूजवावं
दोघांच्या सहजीवनात
प्रेमाचे सुंदर फुल उजवावं

– डॉ.सुभाष कटकदौंड

डॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 25 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर २०० हुन अधिक कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..