नवीन लेखन...

मुक्या वेदना

प्रेमाच्या जुन्या आठवणीं आता सुन्या झाल्या आहेत अव्यक्त अश्या त्या वेदना आता मुक्या झाल्या आहेत माझ्या सुंदर अश्या जीवनातून तू का गेली ते कळलच नव्हतं तू नसलेल्या त्या गोष्टींमध्ये मन माझं कधी रमलच नव्हतं अडकलेल्या पाशातून स्वतःला मुश्किलीनं सोडवलं मी नव्या स्नेह बंधनात मनाला अगदी हलकेच गुंतवलं मी माझा तर प्रेमावरचा विश्वासच असता उडाला कोमल नव्या […]

आठवणींच गाठोडं

आठवणींच गाठोडं मनाच्या चोर कप्प्यात ठेवलेलं छोट्या अनुने हट्ट केला तेव्हा पहिल्यांदा बाहेर काढलेलं अनु नेहमी हट्टानं विचारत काय आहे पप्पा गाठोड्यात…? मग मीही सगळ्या आठवणी ओतायचो तिच्या पुढ्यात आठवणी मग घेवून जात तिला माझ्या भाव विश्वात तिला गाढ झोपवुनच परतायच्या त्या गाठोड्यात वेळ आहे तिची आता तिच्या विश्वात रमण्याची सवय झालीय मला गाठोडं उशाशी घेऊन […]

न ढळलेले अश्रू…

शब्दांचे अर्थ शब्दांकडे हवे तसे वळलेच नाहीत तिचे ते हलके इशारे त्याला लवकर कळलेच नाहीत निरागस तिचा चेहेरा त्यानं जेव्हा पाहिला होता जुन्या शब्दांचा नवा अर्थ तेव्हा त्याला उमगला होता तरीही न जाणे का नंतर तो रेंगाळतच राहीला समाजातील अंतर जणू तो न्याहाळत राहीला तिला मात्र समाजाच्या दरीत डोकावयाचे नव्हते परीमाण ते वास्तवाचे तिला असे तोलायचे […]

मातीचा देह मातीला शरण गेला

आजी आजोबा होते थकलेले थकलेल्या वाड्यात रहात होते. काळाने केला भयानक घात सारं उद्ध्वस्त झालं भूकंपात पण पडताना वाड्याने हात टेकले आजी आजोबांना त्याने वाचविले जख्मी वाड्याला बघून आजोबा खचले अगदी थोडया दिवसांतच देवाघरी गेले आजी मात्र एकटीच राहिली धीराने वाडा नाही सोडला तिनं हट्टाने म्हणाली, आहे मी अजून जिवंत मजेनं या तूम्ही सारी असेच दर […]

आठवले मला 

माझी लाडकी माझी आई झाली होती, कोवळ्या हातांनी मला थोपटू लागली. ती आठवण मग उतरवली मी कागदावर.

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..