न ढळलेले अश्रू…

शब्दांचे अर्थ शब्दांकडे
हवे तसे वळलेच नाहीत
तिचे ते हलके इशारे
त्याला लवकर कळलेच नाहीत

निरागस तिचा चेहेरा
त्यानं जेव्हा पाहिला होता
जुन्या शब्दांचा नवा अर्थ
तेव्हा त्याला उमगला होता

तरीही न जाणे का नंतर
तो रेंगाळतच राहीला
समाजातील अंतर जणू
तो न्याहाळत राहीला

तिला मात्र समाजाच्या दरीत
डोकावयाचे नव्हते
परीमाण ते वास्तवाचे
तिला असे तोलायचे नव्हते

तिला कसं मुक्त
बेधुंद गायचं होतं
स्वप्नांच्या झुल्यावर
ऊंच ऊंच झुलायचं होतं

सुंदर स्वप्नं तिचे ते
मग स्वप्नचं राहीले
कोमल विश्व तिचे
ते हळूहळू मुरझले

निरपेक्ष प्रेमाचे झरे
आता आटले होते
पंख गोड स्वप्नांचे
अलगद तिनं छाटले होते

अल्लड भावनांना
तिनं मग आवरलं होतं
मनात उठलेले तुफान
एकटीनच सावरलं होतं

त्याच्या मनात काय होते
तिला अजून नाही कळले
पण डबडबलेल्या डोळ्यातुन
अश्रू कधीही नाही ढळले…

–  डॉ.सुभाष कटकदौंडडॉ. सुभाष कटकदौंड
About डॉ. सुभाष कटकदौंड 8 Articles
डॉ. सुभाष कटकदौंड हे स्त्री रोग तज्ञ असून १९९२ पासून खोपोली येथे वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे सदस्य आहेत. लहानपणापासूनच त्यांना लिहिण्याची आवड आहे. त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत पण विशेष करून कविता लिहिल्या आहेत. आतापर्यंत साधारण विविध विषयांवर १८० कविता लिहिल्या आहेत. "भिंतींना ही कान नाहीत" हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सोलापूर घोंगड्या

सोलापूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ १४ हजार ८४५ चौरस किलोमीटर आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या ...

महाराष्ट्राची आयटी अनुकूल शहरे

भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक संघटना नेस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ ...

श्रध्दास्थान मुक्तागिरी

विदर्भातील अमरावती जिल्हयात मुक्तागिरी हे निसर्गरम्य तसेच जैनधर्मीयांचे महत्त्वाचे धार्मिक ...

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर

करवीरनगरी अर्थात कोल्हापूर जिल्ह्यास ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वारसा लाभलेला ...

Loading…