सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

एकांत

विझवून दीप सारे ये प्रिये माझ्या कुशीत वाट तुझी पाहतो मी पाहू नकोस आता अंत । झोपली गाय गोठ्यात झोपे वासरु पुढ्यात समई देवापुढील ही झालीय आता शांत । विरह अपुला संपण्याची जवळ आली घडी किती दिसानी सखे ग आज मिळे एकांत । नेसून ये भरजरी शालू माळून केसात गजरा नसे ठाऊक पुन्हा कधी लाभेल असा […]

रात्र मिलनाची

मला वाटते आज नव्याने जगावे तुझ्या धुंद डोळ्यात मिसळुनी जावे पुन्हा एकदा ती मधूर रात्र यावी मिठीत तुझ्यासवे विसावून जावी । पुन्हा आठवे मज ती रात्र मिलनाची थंडगार वारा अन ती रात्र चांदण्यांची तशी रात्र मिलनाची पुन्हा जागवावी रात्र सरली तरी ना कुणा जाग यावी । विसरावे सर्व जग हे तु मज जवळी येता ना कुठल्याही […]

नाते

तुझे नी माझे कसले नाते अजून मला ते कळले नाही एकदा तरी तुज पाहिल्यावीना मजला काही करमत नाही । ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो । आता तरी तू सांग मजला काय आहे आपुले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते । सुरेश काळे […]

संगीत सुर्य

गदीमा आणी बाबुजींनंतर रामायणातील गीत संपले भावमधुर त्या भावगीतातील भावनांचे अस्तित्व संपले । बाबुजीं नंतर पुन्हा एकदा भावगीत ते स्तब्ध जाहले देण्या संगीत स्वर्गलोकी संगीतसुर्य यशवंत निघाले । संवादिनी ती तानपुऱ्यासह आज अश्रु ढाळीत आहे ताल हरवलाय आज तबल्याचा विणा सरस्वतीची अबोल आहे । भाव मराठी भावगीतातील आज गेले आहेत हरवूनी गायकांच्या मधूर गळ्यातील सूरही आज […]

सुवासिनीचा पाडवा

दिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही । लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई । किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई । ऊन वारा पाऊस तर कधी बर्फ वृष्टी होई नाही विश्रांती कधी […]

तुजवीण जीवन

मरणाची भिती नाही जगणे कठीण झाले मोकळ्या या घरात सगळे अबोल झाले । मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली । हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे । जाता चार दिवस दूर माझी अशी अवस्था होई जाशील खरोखर दूर तर मग माझे काय […]

नाते तुझे माझे

दिवस रात्र मम नयनी वसते स्वप्नात येऊनी मला छळीते सांग रमणी हे सांग मला ग तुझे नी माझे हे कसले नाते । जरी न दिसशी मला कधी तू सैरभैर मन हे होऊनि जाते तुला पाहिल्यावर मन हे माझे सांग का ग आनंदीत होते । असशी जरी दूरवर तू तेथे मम हृदयी तुझेच रुप येथे आहे खरोखरी […]

जातीय राजकारण

आम्हीच लावली येथे भांडणे दोन जमातीत फोडावीत एकमेकांची डोकी हेच स्वप्न डोळ्यात । आम्हीच तारणहार असे बिंबवले तुमच्या मनात धर्माचा कैफही आम्ही वाढविला तुमच्याच रक्तात भिती बागुलबुवाची दाखविली सदा तुम्हाला बनविले आम्ही पुन्हा पुन्हा ऊल्लू की हो तुम्हास । अशिक्षीत तुम्ही रहावे हाच ऊद्देश असे अमुचा केले बहू प्रयत्न की अमुचा ऊद्देश सफल व्हावा राहिलात तुम्ही […]

नाते

तुझे नी माझे कसले नाते अजून मला ते कळले नाही एकदा तरी तुज पाहिल्यावीना मजला काही करमत नाही । ऊजाडताच दिवस नवीन रोज नव्याने तुला पाहतो रम्य त्या गत आठवणीने का पुन्हा रोमांचित होतो । आता तरी तू सांग मजला काय आहे आपुले नाते का आजही तव आठवणीने मन माझे ग मोहीत होते । सुरेश काळे […]

भारत माँ की कसम

अब भी जोश मेरे सीनेमे है बाकी भले दुष्मनने गोलीया चलाई है दुष्मनने पीठपे गोली चलाई है मेरा सीना तो अबभी खाली है । दुष्मनकी गोलीमे वो ताकत कहाँ जो मेरे सीनेके पार हो जाये ये तो बस अपनोेकी बेवफाई है जो सिनेपे नही पिठपे वार करते है । ना निराश हूँ ना ऊम्मीद खोई है […]

1 2 3 5