नवीन लेखन...
सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

नव्या वाटा

सध्या बरेच पालक आपल्या मुलास किंवा मुलीस ते मुल ५ / ६ वर्षाचे असतानाच गायन, वादन, नृत्य अशा कोणत्या तरी कलेचे शिक्षण घेण्यासाठी क्लास लावतात. सर्वच मुलांना त्यांची आवड असते असेही नाही. काहींना जन्मजात देणगी असते अशी मुले योग्य मार्गदर्शन व परिश्रम घेतल्यास उत्तम कलाकार बनतात. शरयू दाते हे ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे. […]

असाही एक प्रवास

आपण अनेक मोठमोठ्या लेखकांनी लिहिलेली प्रवास वर्णने वाचली असतील व त्याचा मनसोक्त आनंदही घेतला असेल. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य नवशिक्या लेखकाने प्रवासवर्णन लिहावे हे थोडेसे धाडसच होतंय याची मलाही जाणीव आहे. पण एखादा प्रवास किती मजेशीर होऊ शकतो याची एक झलक म्हणून हा लेखनप्रपंच. या प्रवासातील सर्व घटनाच इतक्या मजेशीर होत्या की आज जवळजवळ सव्वीस सत्तावीस वर्षे झाली तरी त्यातील प्रत्येक प्रसंग माझ्या पूर्ण आठवणीत आहे. […]

गुंतता नयन हे

सांगते मी गुपीत तुला रे सांगू नको तू कुणाकडे नजरेत तुझ्या गुंतता नजर का पाहू मी या जगाकडे । एक शब्द मज  एक ध्यास अशी नजरेत नजर राहू दे जन्मोजन्मी साथ सजणा सदैव अशीच राहू दे । हात तव मज हाती असता अन नजरेत माझ्या नजर तुझी भासते मज जग जिंकीले मी असता मजला साथ तुझी […]

आनंदी जीवन

जिवन हे आनंददाई आहे त्याचा आनंद प्रत्येकाने भरभरुन घेणे अपेक्षित असते. याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या घरापासुन केली तर सर्वच घर आनंदाने भरून जाईल. कुटुंबातील सर्व व्यक्ती आनंदात असल्याने सर्वांचे आपापसातील संबंध आपुलकीचे व जिव्हाळ्याचे राहतील. घरातील कौटुंबिक वातावरणाचा परीणाम संपुर्ण वास्तूवर होत असतो. घराची वास्तू सभोवतालचे वातावरण सर्वच आनंदी राहते. […]

गुरु महिमा

आज व्यासपौर्णीमा. महर्षि व्यासमुनी यांना आद्य गुरु मानले जाते. म्हणून आजच्या दिवसाला गुरु पौर्णिमा असे संबोधले जाते. या दिवशी आपल्या गुरुची पुजा करुन त्यांचे विषयी आदर व्यक्त केला जातो. तसे गुरु हे आपणास कायमच वंदनीय असतात व आपण गुरुविषयी सदैव आदर बाळगत असतोच त्याच आपल्या गुरुप्रती असलेल्या भावना व आदर व्यक्त करण्यासाठी आजच्या दिवसाला महत्त्व आहे. […]

श्री गणरायाला आवाहन

गंधर्व संगीत श्री वरदविनायक सिध्दगणेशा हे मंगलमुर्ती हे श्रीगणराया घेऊनी सोबत सप्तसुरांना यावे तुम्ही हो श्रीगणराया । शब्द माझीया हृदयी वसती अर्थ शब्दांना तुम्हीच द्यावा द्यावे सूर तुम्ही मम शब्दांना संगीतही द्यावे त्यांना गाया । नाही सूर अन् नाही संगीत काय अर्थ मग मम शब्दांना करितो विनती हात जोडूनी सूरसंगीत तुम्ही द्या गणराया । देता संगीत […]

शुभारंभ

नमस्कार मी आयडीबीआय बॅंकेच्या सेवेतून जुन २०१७ मधे निवृत्त झालो आहे. मी मुख्यतः काव्यलेखन करतो. काही वैचारिक लेखन केले आहे.ते मी आपणाबरोबर शेअर करीन. या साईटवर लेखनाची सुरुवात आमची कुलदेवता श्री. मोहीनीराज याचे मी रचलेल्या आरतीने कैलेली आहे. कृपया वाचकांनी अभिप्राय व पाठींबा देऊन माझे सारख्या नवोदित साहित्यिकांना ऊर्जा द्यावी ही विनंती. सुरेश काळे सातारा

श्री मोहीनीराज आरती

जय देवा जय देवा जय मोहिनी देवा शरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा  ।।   समुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली सर्व देवांना ती तु अर्पण केली । अम्रुत वाटप करता तंटा बहू झाला वाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला ।।   रुप बदलून राहू देवासह आला नजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला नजरेतुन तुझ्या तो नाही […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..