गाण्यांच्या कहाण्या –‘ नैना बरसे रिमझिम रिमझिम ‘

का ? या प्रश्नाचे नेहमीच उत्तर सापडत नसते.  तसे मनोजकुमार का आवडत होता याचे उत्तर पण मला सापडत नाही . मी मनोजकुमारचे सिनिमे जसे आवर्जून पहिले तसे इतर कोणत्याही  नटाचे सिनिमे मुद्दाम हून नाही पहिले . आज हि मी youtube वर त्याचे सिनेमा/ गाणी पहातो . ती मला पुन्हा त्या काळात घेवून जातात ! काल ‘ वह कोन थी ‘ मधल —नैना बरसे ,रिमझिम ,रिमझिम हे गाण ऐकल !क्षणात पन्नास वर्ष ,  मागे ओढला गेलो !आणि –“पिया तोरे आवन कि आस –“हि साद कोणीतरी मलाच घालत असल्याचा भास झाला !

लता मंगेशकरचा आवाज मदन मोहनच्या संगीतात अफलातून बहरतो , याचे हे गाणे एक उत्तम उदाहरण आहे . या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळची एक आठवण सांगितली जाते . सिमल्यात चित्रीकरण ठरले होते . सगळी व्यवस्था झाली होती . पण –पण गाणेच तयार नव्हते ! गाण्याचे ध्वनीमुद्रण होवू शकले नव्हते , कारण लाताजींचा घसा खराब होता . त्या गावू शकणार नव्हत्या ! मदन मोहनजीनी मनात आणाल असत तर कोणतीही गायिका घेता आली असती . पण त्यांना लता मंगेशकरच हवी होती !(का ? ते गाण ऐकल्यावर आपल्याला हि पटते ! इतरांच्या आवाजात हे गाण इम्याजिन नाही करता येत . )मग या वर उपाय काय ? तर मदनजीनी हे गाण स्वतः च्या आवाजात रेकोर्ड केल ! गाण्याच शुटींग पार पडल . नंतर मग लाताजीनी ते गायलं . आणि ते सिनेमात मदनजीच्या गाण्याला रिप्लेस केले . या गाण्यात मनोज कुमारने कुठेही त्याची स्टाईलवाला तो बोट फाकावलेला हात चेहऱ्या समोर धरलेला नाही हा गमतीचा भाग आहे !

लताजीनी हे गाणं खूप बहारदारपणे गायलंय यात वादच नाही . पण मी जेव्हा मदन मोहनचा आवाजातली क्लिप ऐकली तेव्हा ते मला खूप भावलं . लताजी पेक्षाही गाण्यातल्या भावना मदन मोहनच्या आवाजात ज्यास्त गहिऱ्या वाटल्या !(youtube वर उपलब्ध आहे )

हे गाणं एक ‘ भूत ‘ गातंय असं सिनेमात दाखवलाय . लता मंगेशकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवशीच्या कार्यक्रमात त्या गमतीने म्हणाल्या कि त्यांनी ‘ भूता ‘ची गाणी खूप गायली आहेत . त्यांनी गायलेली आणि मला माहित असलेली काही ‘ भूता ‘ची गाणी –आयेगा आनेवाले —-(महल ), तू जहाँ ,जहाँ चलेगा (मेरा साय ),कही दीप जले ,कही दिल —(बीस साल बाद ), गुम नाम है कोई —(गुमनाम )

साधारण दोन वर्षा नन्तर ‘ वह कोन थी ? ‘ चा तामिळ रिमेक निघाला होता . त्यात हे गाणे पी . सुशीला यांनी लता मंगेशकरांच्या तोडीस तोड गायलंय ! थोडी सवड कढून रसिकांनी जरूर स्वाद घ्यावा .

या सिनेमाची प्रेरणा एका ब्रिटिश नाटका वरून घेतली आहे ! The Woman In White हे त्या नाटकाचे नाव ! आणि नाटककार -Wilkie Collins . शम्भर वर्षा पूर्वीच्या कलाकृतीवरी सिनेमा !

माझी आवड आपल्याला आवडेल अशी आशा आहे .

— सु र कुलकर्णी

आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .

About सुरेश कुलकर्णी 77 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

सिंधूदुर्गाच्या संरंक्षणासाठी बांधलेला किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर ...

डोंबिवलीतील ग्रंथालय व वाचनालये

सुशिक्षितांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या डोंबिवलीत अनेक समृद्ध ग्रंथालये आणि ...

बिनखांबी गणेश मंदिर, कोल्हापुर

कोल्हापुर शहराच्या महाद्वार रस्त्यावर हे मंदिर आहे. याला बिनखांबी गणेश ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवतीचा किल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे असलेला निवतीचा हा किल्ला पर्यटकापासून बराच दूर आहे ...

Loading…