नवीन लेखन...

आफ्रिकेचे बिअर आख्यान

‘केनिया बिअर’चा संस्थापक जॉर्ज हर्स्ट एके दिवशी शिकारीला गेला असतांना त्याला एका हत्तीने ठार मारले. जॉर्जच्या स्मरणार्थ बिअरला ‘टस्कर’ नाव दिले. ही बिअर इतकी लोकप्रिय झाली की इंग्लंडच्या सुपरमार्केटमध्ये ती २००८ सालापासून विक्रीसाठी अवतरली. […]

लवंगांच्या वृक्षांनी डवरलेले झांझीबार

भारतीय, चिनी आणि आता पाश्चिमात्य पारंपारीक आयुर्वेद शास्त्रात लवंगेला मानाचे स्थान लाभले आहे. विशेषतः दंतविज्ञान शास्त्रात दाताच्या दुखण्यावर लवंगेचा वेदनाशामक म्हणून सर्रास उपयोग होतो. त्यामुळे दंतदाह कमी होतो. पचनकारी औषधे-पेयात लवंगेचा उपयोग आलाच. चीन व भारतात मूत्राशयातील अस्वास्थ्य, पोटदुखी, तीव्र खोकला, अतिसार, ओकार्‍यांना प्रतिबंध यासारख्या अठरा दुखण्यांसाठी लवंगेचा वापर होतो. […]

तुमचं आमचं ‘सेम’ असतं !

झांझीबारला जाणार्‍या विमान-प्रवेशाचा पास घेण्यासाठी लागलेल्या रांगेतले सहप्रवासी बघितल्यावर माणिकताईंचे गीत आठवले. ‘सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी’. काही तर चक्क कॉफी रंगाचे. म्हटले तर गोरे आणि नाही म्हटले तर सावळे. […]

झांझीबार डायरी – अवघा रंग एकचि झाला

एकदा का मुलाच्या वडिलांनी, आईने, मोठ्या मुलाने व धाकट्या मुलीने ‘छान आहे’ म्हटले की मुलगी पसंत झाली मानायचे. अगदी तसेच वॉशिंग्टन-दिल्लीच्या विश्वबॅंक कार्यालयाने, दारेसालामच्या आफ्रिकन डेव्हलपमेंट बॅकेने आणि झांझीबारच्या परिवहन मंत्रालयाने माझी चरित्रसूची म्हणजे बायोडेटा ओके केल्याचे म्हणजे ‘मी पसंत पडल्याचे’ संगणक टपाल आले. माझी झांझीबारच्या रस्ते वाहतूक, जलमार्ग व हवाई वाहतूकीची कृतियोजना अहवाल तयार करून […]

झांझीबार डायरी…. एक अप्रतिम पुस्तक… क्रमशः

झांझीबार डायरी हे एक प्रवासवर्णन नाही.  जागतिक बॅंकेच्या कामानिमित्त अरुण मोकाशींनी केलेल्या झांझीबार वारीमध्ये त्यांनी अनुभवलेले झांझीबारमधील जनजीवन, तिथल्या प्रथा-परंपरा, सोहोळे, वन्य-जीवन यासारख्या विषयांवरील अत्यंत सुंदर लेखांचे हे संकलन आहे. मोकाशी यांनी अत्यंत प्रभावी भाषेत, खेळीमेळीच्या शैलीत हे सर्व लेख लिहिलेले आहेत. […]

अवघा रंग एकचि झाला

`झांझीबार’ या आफ्रिकेतील एका छोट्याशा देशातील दोन वर्षांच्या वास्तव्यादरम्यान आलेल्या अनुभवांवर श्री अरुण मोकाशी यांनी लिहिलेल्या `झांझीबार डायरी’ या पुस्तकातील एक लेख. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..