ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

‘मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक’ ह. ना. आपटे

‘मराठी अर्वाचीन कादंबरीचे जनक’ अशा शब्दांत ज्यांचे वर्णन होते अशा हरी नारायण उर्फ ह. ना. आपटे यांचा जन्म ८ मार्च १८६४ रोजी झाला. भारतातील कंपनी सरकारचे राज्य खालसा होऊन ब्रिटिश सरकारची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर प्रतिभावंतांची जी पहिली पिढी जन्माला आली, त्यात ह. ना. आपटे यांचा समावेश होता. हरी नारायण आपटेंनी कथा, स्फूट लेखन, कविता, कादंबरी, नाटक व पत्रकारिता अशा विविध […]

आमचं नव्हे, त्यांचं !

नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने एका मित्राला फोन केला. शुभेच्छा दिल्यानंतर सगळे म्हणतात तसं तो मला ‘सेम टू यू’ म्हणेल या आशेने मी काही क्षण थांबलो. पण कसलं काय, तो अत्यंत त्रासिक आवाजात चिरकला ‘अरे, कोणतं नविन वर्ष? कोणाचं नविन वर्ष? हे त्या इंग्रजांच्या बाळांचं नववर्ष आहे, आपलं नाही. आपलं नववर्ष सुरु झालं की शुभेच्छा दे.’ असं […]

भाकरी

भाकरीच्या पाठीवर     ठसे दिसती हातांचे जातां तव्यावर भाजूनी    निशाण राहते कष्टांचे एका भाकरीच्या पाठीं     हात कितीक गुंतले कण कण देती ग्वाही      मन भरुनी कसे आले उन्हां पावसात फिरे      शेतामधीं शेतकरी टप् टप् घाम गाळी      उभी करितो जवारी पोती पोती उचलूनी      वाहून नेई मजूर दमछाक होऊनी ही      मिळत नाहीं पोटभर ओवी म्हणत मुखानें       आई थापिते भाकरी साऱ्यांच्या […]

एका मनाचे हे भाग

एक विशाल मन,  भाग त्याचे अनेक  । विखूरले जाऊनी, स्वतंत्र वाटे प्रत्येक…१, छोट्या भागावरी,  वेष्टण शरीराचे  । अस्तित्व वेगळेच, भासते त्या मनाचे…२, मनाचे स्वभाव,  सारखेच असती  । फरक वृत्तीमध्ये,  कुणाच्याही नसती…३, अगणीत  मनें, कोठे नसे फरक  । अनेक बनली, जनक तिचा एक….४, डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

‘आनंद ‘ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।। शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।। सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।। ‘आनंद ‘ भावना असे एकटी नसे […]

आमचे खेळ

या मित्रांनो सारे या,    सर्व मिळूनी खेळू या   ।।धृ।। खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे  । मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते  ।।  खेळांना त्या    समजून घ्या– १—  या मित्रांनो सारे या,  हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा  । स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी  ।। एकाच दमात   भिडू मारू या –२— या मित्रांनो सारे […]

वातावरणाची निर्मिती

वातावरण  निर्मित होते,  जसे जातां वागूनी  । हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१, फिरत असती वलये ,  सारी अंवती भंवती  । चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२, जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी  । चांगुलपणाचे भाव उमटती,  आपोआप त्यावेळी….३, जाता दुष्ट व्यक्ती ,  आपल्या  जवळूनी  । चलबिचल मन होते,  केवळ सानिध्यानी…..४, याच लहरी घुसुनी शरीरि, […]

पाऊस

पाऊस

पाऊस

मला हवा असतो प्रत्येक वर्षी

कारण त्या शिवाय माझ्या एका

नवीन कवितेचा जन्म होणारच नसतो…

पाऊस

कोसळण्याची वाट मी चातकासारखी पाहतो

कारण त्या शिवाय मी तिला

पावसात भिजताना पाहू शकणार नसतो…

पाऊसात

मी भिजवून सतत ओलाचिंब होतो

कारण त्या शिवाय माझ्या कल्पनेला

पुन्हा नवीन अंकूर फुटतच नसतो…

पाऊस

मुसळ्धार कोसळ्ण्याची वाट पाहत असतो

कारण त्या शिवाय मी पाण्यातून

रस्ता काढत चालू शकणार नसतो…

पाऊसात

भिजणारा शेतकरी पाहायला मला आवडतो

कारण त्या शिवाय मला सर्वात

आनंदी चेहरा पाहायला मिळ्णार नसतो…

कवी – निलेश बामणे ( एन. डी. )
[…]

1 2 3 4 5 129