जेवण संस्कृती
आपल्याला बोलायला देत नाही म्हणून वाईट वाटायचं, क्वचित रागही यायचा. पुढे मोठं झाल्यावर यामागचा आईचा उद्देश कळायला लागला. आपल्या पोटात पुरेसं अन्न जावं, गप्पांच्या नादात खाण्याकडे दुर्लक्ष होऊन आपण अर्धपोटी राहू नये हा स्वच्छ निखळ हेतू असायचा आ.मु.जे. ब. च्या मागचा. घरातल्या स्त्रिया आज्जी, आई, ताई सकाळपासून स्वयंपाकघरात कामात असायच्या. […]