नवीन लेखन...

बांगड्या

संक्रांतीचा सण आला की कासाराच्या दुकानात किंवा डोक्यावर बांगड्यांचा मोठा हारा घेऊन घरोघरी जाऊन बांगड्या भरणारी कासारीण आठवते अजून. आठ पंधरा दिवस ही धामधूम सुरू असते. पाटल्या बिलवर घेऊन दुकानात गेल्यावर आपल्या मापाच्या बांगड्या भरवल्या की कासाराच्या पाया पडून निघायचे अशी पद्धत होती. कुणी साध्या ज्याला पूर्वी कॉफी बांगड्या म्हणत. चपट्या आणि गोल अनेक रंगी. तर काही बांगड्या वर सोनेरी ठिपके रेघा असलेल्या असतात जाड नाजूक डब्यातील आणि बाहेरचे वेगवेगळ्या प्रकारे ठेवलेले मांडलेले असतात.

तूळजापूरच्या बांगड्या प्रसाद म्हणून घातल्या जातात हिरवा रंग आणि वर पिवळे ठिपके. पण काहीही म्हणा हातभार बांगड्या भरुन आल्यावर एक प्रकारचा आनंद समाधान आणि मुख्य म्हणजे आधार वाटतो. म्हणून त्यावर हात फिरवत हात दोन्ही बाजूला फिरवत बघायला छान वाटतं. म्हणूनच म्हणतात ना हातच्या काकणाला आरसा कशाला नाजूक किणकिण वातावरण प्रसन्न करणारी. पंचमी. संक्रात दिवाळी. लग्न डोहाळे जेवणाच्या वेळी हमखास बांगड्या आवश्यक असते. सौभाग्याचे लेणं आहे हे. यावरून एक वाचलेले आठवते. श्रीरामांच्या विवाह प्रसंगी सीतेला रामाला वर पोषाखात बघण्याचा मोह आवरला नाही पण ते शक्य नाही हे बघून तिने हातातील हिरवा चुडा समोर धरून त्यात श्री रामाची छबी पाहून ती आनंदली.

कल्पना करा कसा असेल तो प्रसंग. शिवाय हाताला एकप्रकारे बंधन जे प्रत्येक वेळी मर्यादेची कर्तव्याची जाणीव करून देतात. वैज्ञानिक कारण असेलच. मला आठवतय की आमच्या लहानपणी हातात बांगड्या नसल्या की चिडवले जायचे अमूक एकीचा हात थोटा नवरा मोठा. अजूनही काही बायका एकेका हातात डझनभर बांगड्या घालतात. आणखीन एक गोष्ट म्हणजे हातात बांगड्या भरताना पूर्ण हात कधीच रिकामा ठेवला जात नसे एक काढलेली बांगडी त्या हातावर ठेवून धरली जाते. बांगडी वाढली असा म्हणण्याचा प्रघात आहे. आणि त्या तुकड्यांचा एक खेळ पण खेळत होतो आम्ही. माहेरपणाला आलेल्या लेकीला बांगड्या भरवल्या शिवाय ओटी भरली जात नाही. तालेवार घरी चोळी बांगडीचा हिस्सा म्हणून काही भाग पैशाच्या जमिनीचा तुकडा देतात. असे हे बांगडी महात्म्य याला पंरपंरा. संस्कृती आहे.

मी दरवर्षी एकीला तिच्या पसंतीच्या बांगड्या भरवते. काम करणाऱ्या सखीला. तात्पर्य सांगायचे तर सूनबाईनी मला बांगड्या भरवल्या. मला खूप त्रास होतो आता पण तिने हळूहळू चढवल्या कळलेच नाही वेदना झालेल्या. संस्क्रातीचा सण गोडीचा म्हणून बांगड्या भरवल्या ते ही गोडीने मी पण सुखावले गोडीने. लेकीने जेव्हा माहेरपण केले होते तेव्हाही हाच अनुभव आला होता. आणि विशेष म्हणजे कासारणीने पैसे फक्त एक रुपया घेतला. कारण ती म्हणाली होती की या माझ्या पण आईच आहेत म्हणून मी पैसे घेणार नाही. बांगड्या म्हणजे एक नात जोडणारा पूल आहे तो पैशावर नव्हे तर प्रेम माया आपुलकी यांनी भक्कम बांधलेला आहे हे सांगणारा हा संस्क्रातीचा सण गोडीने आपुलकीने साजरा करण्यात यावा एवढेच…..

सौ कुमुद ढवळेकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..