नवीन लेखन...

गेट सेट गो २०२५

लेखक : निरंजन घाटे – अद्वैत फिचर्स अद्वैत फिचर्स कडून मराठीसृष्टीसाठी आलेल्या लेखांमधून पुनर्प्रकाशित 


मानवाने चाकाचा शोध लावला तेव्हापासून त्याची वेगाने प्रगती झाली. त्यापूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना तो केवळ पायांचाच वापर करत असे. घोड्यासारख्या प्राण्यांना माणसाळवल्यावर त्यांचा वापर सुरू झाला. चाकांचा शोध लागल्यावर बैल, घोडे, उंट, याक अशा विविध ठिकाणच्या स्थानिक प्राण्यांचा गाड्या किंवा रथ ओढण्यासाठी वापर केला जाऊ लागला. बैलगाडीसारख्या वाहनांचा वापर कित्येक शतके सुरू होता. त्यानंतर सायकल, स्वयंचलित दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा शोध लागला. गंमत म्हणजे पहिल्या कारला ‘रिव्हर्स गियर’च नव्हता. मग हळूहळू विमान, हेलिकॉप्टर आणि इतर वाहनांचा शोध लागला. आज जगात असंख्य प्रकारची वाहने असली तरी वाहतुकीची साधने म्हटले की डोळ्यांसमोर सायकल, स्कूटर, मोटारी, ट्रक, आगगाडी, जहाज आणि विमान हीच वाहने येतात. पण ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतुकीच्या साधनांचा विचार केल्यास आपले विचार किती मर्यादित आहेत आणि वाहतुक व्यवस्थेबद्दलची आपली माहिती किती त्रोटक आहे हे लक्षात येते.

वाहनांचा शोध लागल्यापासूच मानवाला वाहतुकीच्या कोंडीची समस्या सतावत आहे. प्रत्येक नवीन वाहन अवताराच्या वेळी या वाहनामुळे पूर्वीचे प्रश्‍न सुटणार असे भाकीत केले जायचे. सात-आठ वर्षे गेली, की या वाहनांमुळे निर्माण झालेल्या प्रश्‍नांची चर्चा हळूहळू सुरू व्हायची. १८४५ मध्ये रेलरोड कार्समुळे वाहतुकीच्या प्रश्‍नांवर मात केल्याचे बोलले गेले. १८९५ मध्ये सायकली, जहाजं आणि वाफेवर, विजेवर आणि पेट्रोलवर चालणाऱ्या मोटारींमुळे घडून आलेल्या वाहतूक क्रांतीचा बोलबाला झाला.

व्यक्तीचे आणि राष्ट्राचे आर्थिक उत्पन्न वाढते तसतशी त्या व्यक्तीला आणि राष्ट्राला अधिकाधिक चलनवलनक्षमतेची आवश्यकता भासू लागते. वेळ हा फार मौल्यवान घटक बनतो. त्याच वेळात वाढत्या आर्थिक क्षमतेबरोबर जास्त अंतर कापणे महत्त्वाचे बनते. आधीचे वाहन कमी क्षमतेचे भासू लागते. राष्ट्राच्या दृष्टीने वाहनांची आणि त्यातही जलद गतीने एका जागेहून दुसर्‍या जागी माणसे आणि सामान (किंवा माल हलवणाऱ्या वाहनांची गरज वाढते. यातून ट्रॅव्हल टाइम बजेट’ची संकल्पना अस्तित्वात येते. या ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक वेगवान वाहनांची गरज भासते. त्यातूनच बकमिन्स्टर फुलर यांची डायमॅक्सियन कार, जेम्स बाँडच्या चित्रपटातील फ्लाईंग कार, जेट बेल्टस्‌, हिलर कॉर्पेरेशनचा उडता चौथरा, न्यूमॅटिक ट्रेन्स, फिरते पदपथ, कारबोट, अणुशकक्‍तीवरचे विमान, अणुशक्तीवरची मोटार असे शोध लागले. हॉवरक्राफ्ट हा शोध आजकाल थोड्या-फार प्रमाणात वापरला जातोय, पण अपेक्षेइतका वापर वाढलेला दिसत नाही. दुसरा कालौघात मागे पडतोय असा वाटणारा, पण ज्याच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू आहेत असा वाहनप्रकार म्हणजे झेपेलीन.

झेपेलीन या विमानप्रकाराची संकल्पना जर्मनीच्या झेपेलीन यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मांडली. १८७४ मध्ये त्यांनी त्याचे डिझाईन तयार केले आणि १८९३ मध्ये ते पूर्ण झाले. १८९४ मध्ये झेपेलीनची योजना पुन्हा हाती घेण्यात आली आणि १८९९ मध्ये तिला अमेरिकेत पेटंट मिळाले. या विमानांमध्ये रिजिड मेटल मिश्र धातूंच्या रिंज आणि गर्डर्सच्या सांगाड्याचा वापर केला जातो. ही विमाने पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी व्यावसायिक तत्त्वावर चालवली गेली. जर्मन सैन्याने या विमानांचा बॉम्बर्स म्हणूनही वापर केला. पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर १९१८ मध्ये या विमानांचा व्यवसाय तात्पुरता थांबवला होता. पण, १९२० मध्ये ह्युगो एकनर यांनी प्रसावी वाहतुकीसाठी झेपेलीनचे पुरुज्जीवन केले. पुढील काही वर्षांमध्ये ते कालौघात पुन्हा मागे पडले आणि आता त्याला नवीन स्वरूपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेईकल (एचईव्ही) म्हणजे विजेरी आणि पेट्रोलच्या मोटारगाडीचा संकर. या गाडीत पुनर्भारित होऊ शकणारे विद्युतघट, एक अंतर्ज्वलन यंत्रणा आणि एक विद्युत जनित्र असते. ही कल्पना सर्वप्रथम १९०५ मध्ये मांडण्यात आली. त्यावर गेली बरीच वर्षे संशोधन सुरू आहे. पण का कोण जाणे, त्यावेळी ही लोकप्रिय झाली नाहीच; शिवाय राजकारणाने घोळ घातल्यामुळे या कल्पनेवर सातत्याने पैसाही व्हावा तसा खर्च झाला नाही. या गाडीमुळे पेट्रोलची बचत तर होतेच. पण, प्रदूषणही कमी होते. आता बर्‍याच देशांमध्ये एचईव्ही लोकप्रिय बनल्या आहेत. भारतात अजूनही इलेक्ट्रीक कार्सची बाजारपेठ तशी लहानच आहे. त्यामुळे एचर्सव्ह आता लगेच बाजारपेठेत येईल असे वाटत नाई पण, पुढे ती काळाची गरज बनेल.

ऑटोमेटेड हायवेज ही एकविसाव्या शतकाची चाहूल देणारी संकल्पना आहे. गाडीळू बसायचे, कुठे जायचे ते सांगायचे की कमीत कमी वेळात कमी गर्दीच्या रस्त्याने गाडी तुम्हाला इच्छित ठिकाणी घेऊन जाईल. अशी ही संकल्पना आहे. यामुळे अमेरिकेतल्या माणसांचे दर वर्षी पाच अब्ज प्रवास तास वाचतील. त्यामुळे इंधन बचत तर र पणं प्रदूषणाची पातळीसुद्धा खाली येईल. पुढच्या शतकाच्या पूर्वार्धातच हे शक्‍य होईल. संगणळ आणि दूरप्रक्षेपण यामुळे दूरसभा (टेलिकॉन्फरन्स) शक्‍य झाल्यामुळे, विशेषत: त्रिमित प्रतिमा प्रक्षेपणाचे तंत्र नजीकच्या भविष्यकाळात परिपक्व होऊन व्यवहारात अवतरेल, अशी शक्‍यता असल्यामुळे आवश्यकता कमी होऊन वाहतुकीवरील ताण बराच कमी होईल.

जेट पॉवर्ड मोटारकार ताशी हजार किलोमीटर वेगाने कशी धावेल; त्याबद्दलचे कुठले प्रयोग कुठे चालू आहेत आणि या वाहनाच्या चाचण्यांचे निष्कर्ष काय, याबद्दल सर्वांनाच माहिती हवी असते. सध्याच्या कार्स, विशेषत स्पोर्टसकार आणि दुचाकी वाहनेही वाऱ्याशी स्पर्धा करताना दिसतात. यापुढील काळात तर या वाहनांच्या वेगात आणि फीचर्समध्ये भरच पडणार आहे.

वैयक्तिक वाहनांमधली ही प्रगती पाहून आपण थक्क होतो. सामूहिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत रेल्वेला अनन्यसाधारण महत्व आहे. अतिवेगवान आगगाड्या, चुंबकीय उद्धरणाचा उपयोग करून धावणाऱ्या रेलगाड्या आणि त्याबरोबरच जपानी शिंकान्सेन अथवा बुलेट ट्रेन, जर्मन इंटरसिटी एक्स्प्रेस अशा ताशी ३०० किलोमीटर वेगाने पळणाऱ्या गाड्यांची वर्णणे आपण ऐकलेली असतात. ही वर्णने रंजकही वाटतात; पण या वेगाने चालणाऱ्या गाड्या चालवताना अनेक अडचणी येतात. या गाड्यांना स्थैर्य प्राप्त होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक करांमती, इंधन खर्च, प्रदूषण अशा अनेक बारीकसारीक बाबींचा विचार करावा लागतो.

आजच्या युगात हेलिकॉप्टर तंत्रज्ञानातल्या अत्याधुनिक संकल्पना, टिस्टरोटर एअरक्राफ्ट, धावपट्टीचा कमीत कमी वापर करून जास्तीत जास्त माणसे वाहून नेणारी यंत्रणा, यंत्रचलित विमाने अशा प्रकारे शहरातंर्गत वाहतुकीठर्चा करणाऱ्या संकल्यना महानगरांचा विस्तार वाढत महानगरांमध्ये व्यवहार आणि उपनगरांत वस्ती यामुळे कामावर जाण्यासाठी कापावे लागणारे अंतर आणि करावी लागणारी यातायात कमी करण्यासाठी अशी हवाई वाहतूक उपयुक्त ठरेल.

स्वबळावर आकाशात उडायची स्वप्ने माणूस पूर्वीपासून पाहत आलाय. लिओनार्दो द विचीने अशा उड्डाणयंत्रांची सचना कशी करता येईल याचा विचार केला होता. त्याने अशा यंत्रांबाबत ५०० रेखाटने केली आणि ३५ हजार शब्दांत ही कल्पना स्पष्ट करायचा प्रयत्न केला. त्या काळात असे यंत्र करणे अवघड होते. आता अतिहलक्या, पण प्रचंड बळकट (अल्ट्रालाईटवेट अँड इमेन्सली स्ट्राँग) पदार्थांमुळे, तसेच तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे मानवी शक्तीने उड्डाणयंत्रे चालवणे शक्‍य झाले आहे. अशा तऱ्हेने माणूस ११५ किलोमीटर अंतर कापून गेला आहे.

१९५७ मध्ये पहिला स्पुटनिक नावाचा मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीला मिळाला. त्यानंतर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती झाली. ती अशीच होत राहिली, तर आज ज्या सहजतेने विमानांमधून आपण आकाशात जातो त्याच सहजतेने अवकाशात जाणे शक्य होणार आहे. नुकतेच अमेरिकन सरकारने नासाच्या मदतीने हौशी अंतराळवीरांना अवकाश पर्यटन घडवायचे ठरवले आहे. यापूर्वी रशियात हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. अमेकित अशी पर्यटक याने तयार करून पर्यटकांना अंतराळातील स्थानकावर घेऊन जाण्याचे काम बोईंग अण्ड बिगेलो एअरोस्पेस ही कंपनी करणार आहे. अवकाशवारी अजून महाग असली तरी आपली नातवंडे किंवा पतवंडे नक्कीच अंतराळातील स्थानकावर पोहोचतील आणि विज्ञानकथाच सत्यसृष्टीत अवतरेल.

अधिकाधिक लोकांना विमानप्रवास परवडायला लागल्यावर समुद्री प्रवासाला तेवढे महत्त्व उरले नाही. जहाजांचा वापर प्रवासी वाहतुकीपेक्षा मालवाहतुकीसाठीच मोठ्या प्रमाणावर केला जातो. वाईट हवेत सागरप्रवास ही कसोटी असेत आणि सागरप्रवासाला भरपूर वेळ लागतो. पुढील काळात समुद्राच्या पृष्ठभागाबरोबरच सागरतळाचाही मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल. सागरतळाचे संशोधन, प्रवास, सागरी वसाहती हे भूपृष्ठावरच्या वसाहती वाहतूक आणि जमिनीवरच्या मोटारगाड्यांप्रमाणे मायक्रोसब्ज किंवा छोटेखानी पाणबुड्या यांचे आराखडे तयार होत आहेत. सागरतळाशी जाणारी वाहने एक किंवा दोन व्यक्तींना सागरतळी नेतील, तसेच त्यांचे यांत्रिक हात सागरावरची वस्तू उचलायलाही मदत करतील.

दिवसेंदिवस जागेचा प्रश्‍न सर्वांना भेडसावतोय. यासाठी भुपृष्ठाखाली इमारती, तसेच भुपृष्ठावर उंचच उंच इमारती बांधल्या जाऊ लागल्या आहेत. या इमारतींत जिन्यावरून चढउतार करणे अवघड आहे. एलिवेटर्सचे तंत्र विकसित करण्यात येत आहे. अतिजलद लिफ्ट, एक्स्प्रेस लिफ्ट, हाय कपॅसिटी, रोपलेस एलिवेटर अशा यंत्रणा भविष्यात सर्रास दिसू लागतील.

निरंजन घाटे

अद्वैत (SV10)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..