नवीन लेखन...

देह

देह – बाळपणीचा सुखावणारा मातापित्यांना घरच्यांना दारच्यांनाही मऊ, रेशिमस्पर्शी पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा.. देह – यौवनातला …सुखवणारा इतरांना….स्वत:लाही रेशिमस्पर्शी सुख देणारा भोगणारा भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा गर्वोन्नत – टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा… देह – मावळतीचा काहीच न सोसणारा दुःखच नव्हे तर सुखही… जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा.. मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना देहावाचून अर्थ नाही तरीही तुझ्या-माझ्यात असावं देहापलिकडचं काही हातात घेतलेले […]

खंत

इतकं सारं तुझं व्हावं की माझं काही उरूच नये त्याहीपेक्षा खंत वाटते तुलाही हे कळू नये फुलं सारी तुझीच होती, कधी फुलली कधी सुकली वाईट एवढंच वाटतं, तुला त्यांचा गंध येऊ नये किती किती विरहगीतं मी स्वत:शीच गात राहिले एकसुध्दा सूर का रे तुझ्यापर्यंत पोचू नये? शब्दाविनाच रंगते नेहमी खरी प्रेमकहाणी तरी गोष्ट अर्धी राहून जाईल […]

आता

आता स्वतःसाठीही थोडेसे जगू या आज थोडे या जगाला विसरु या हृदयावरी या कोरलेली प्रश्नचिन्हे आज ती हलक्या हातांनी रे पुसू या घेत गेलो दुःख कोणाचे कुणाचे आज अपुल्याही व्यथेला सावरु या सोसल्या ज्या वेदनाही लपवूनी एकमेकांना तरी त्या दाखवू या प्रौढत्व माथी घेऊनी जे हरवले कोवळेपण जाईचे ते भोगू या खूप जळलो पाहुनी तम भोवती […]

वसंत

कुण्या लोकीचा पातला धरेवरी जादुगार? गर्भातून मातीच्याही घुमू लागले हुंकार तरुवेलींवर आली पुन: नवी तरुणाई दूर राईत आंब्याच्या आर्त कोकिळाही गाई इथे तिथे लोचनांना सृजनांचे साक्षात्कार कुण्या लाजवंतीचे ग स्वप्न होतसे साकार? गडे, माझ्या अंगणी वाजे वसंतपाउल जडावल्या फांदीवर हळू उमलू ये फूल !

घरटं जपायला हवं

‘तू आहेस ना घरट्यात मी आत्ता आलो’ असं म्हणून तो गेला तेव्हा मला दिसला – अपरंपार विश्वास .त्याच्या डोळ्यात दूरदेशी जाताना लढावं लागलंच तर आपले जायबंदी पंख घेऊन तो येईल माझ्याचकडे किंवा टिपलेलं सोनं मोती आणून देईल माझ्याच पदरात ! त्याच्या डोळ्यातला विश्वास – मला जपायलाच हवा ! हसरं चिवचिवतं चिमणंपाखरू घरट्यात शिरलं तर त्याला मी […]

दूर नक्षत्रांच्या देशी

दूर लोटते ही माती, म्हणून का खिन्न होशी? तुझी माझी वाटचाल दूर नक्षत्रांच्या देशी राजहंसाचे कौतुक बगळ्यांनी का करावे? तुझ्या-माझ्या डोळ्यातील इथे परकेच रावे स्वर्गभूमीची ही स्वप्ने धरेवरी परदेशी दीड वितीचे हे जग म्हणायचे ते म्हणू दे चार काचमण्यांसाठी ऊर फाटेतो धावुदे नाते आपले जडले आगळ्याच प्राक्तनाशी तिथे अमृताचा चंद्र रोज चांदणे सांडतो कल्पवृक्षाच्या तळाशी जीव […]

काट्यांच्या कविता

तू दिलेल्या फुलांबरोबर थोडे काटेही आले, म्हणून काय बिघडलं? ते ‘तू’ दिलेले आहेत हे सुख काय कमी आहे? तसं मान्य केलंय मी चालणं काट्यांवरुनही बघ, ओठावरचं स्मित पुरतं ढळलं नाहीए डोळेही आहेत कोरडे थोडं रक्त वाहतंच अटळपणे.. तिकडे लक्ष देऊ नकोस माझी पावलं लोखंडाची नाहीत रे । अढळ विश्वास आहे तुझ्यावर तितका देवावरही नाही पण कसा […]

वनवास

कोण म्हणतं वनवास दःखाचा होता? तिथे तर राम फक्त माझा होता। ती पर्णशाला उभारलेली त्याच्या समर्थ बाहूंनी मीच तर होते – तिथली अनाभिषिक्त महाराणी तिला प्रीतीच्या सुवास होता.. कष्टाचा सुगंध होता कोण म्हणतं वनवास दुःखाचा होता? कधी तो जायचा रानात दूर.. तेव्हा उरायचे मी नि माझं घर मला एकांत सुसह्य व्हावा म्हणून लता हसायच्या सुरेख फुलांच्या […]

चांदराती

कधी या चांदरातींनी तुला हाकारले होते तुझ्या डोळ्यात चंद्राचे गीत आकारले होते फुलांची वाट पायाशी फुलांची वेळ ती होती फुलांनी मी आयुष्याला पूर्ण शाकारले होते थंड ही आग लावूनी क्षणांनीही गुन्हा केला चंद्र मागायचे धैर्य फुलांनी दाविले होते अशा या चंद्रबाधेचा कुणा उपचार मागावा? सभोती सर्व होते, ते कधीचे भारले होते आता कित्येक वर्षांनी, चंद्र होऊन […]

मैफल

मी काय कथू जे साहियले ते तुजला? डोळ्यात वाच या तू विरहाच्या गजला तुजवाचून सारी मैफल रंगविताना अश्रूत भिजवल्या मी कंठातिल ताना ऐश्वर्य लेऊनी महाल होता धुंद अंगणी ढवळे रातराणीचा गंध झुंबरी पेटले दीप, उजळली रात वर चंद्रकलेची अमृतमय बरसात छेडिली तार मी … ओठी आली तान पायात नूपुरे हरपून गेली भान मी ताल सूरांचे धुंद […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..