नवीन लेखन...

उपवास

हिंदू, जैन, मुस्लिम कोणत्याही धर्मामध्ये उपवासाचं महत्त्व फार. त्यातही हिंदूंचे उपवास म्हणजे मौजच वाटते. या उपवासांना चालणाऱ्या पदार्थांची यादी एवढी असते की, लोक उपवासाच्या जिनसांचा चारी ठाव स्वयंपाक करून पोटभर जेवू शकतात. त्यातही महाराष्ट्रीय लोकांना उपवास म्हटलं की, साबुदाणा, वऱ्याचे तांदूळ वगैरे लागते तर दक्षिणेकडे उप्पीट, पोहे, पाण्याऐवजी दुधात भिजवलेल्या पिठाची भाकरीसुद्धा चालते. हे पाहून वाटायचं, साध्या तांदळाऐवजी वऱ्याचे तांदूळ खाल्ले किंवा गहू, ज्वारी यांच्याऐवजी साबुदाणा की लगेच स्वर्गाची दारं कशी काय खुली होतात? एखादं धान्य पौष्टिक असू शकेल पण एखाद्याच धान्यात ‘आध्यात्मिक शक्ती’ वगैरे असते की काय?

खरं तर ‘उपवास’ म्हणजे जवळ बसणे. त्यादिवशी आपल्या इष्ट देवतेच्या सानिध्यात राहणे, निकट राहणे म्हणजे उपवास. देवाच्या जवळ आपण अर्थातच फक्त मनाने राहू शकतो. म्हणूनच उपवासाच्या दिवशी देवाचं चिंतन, स्मरण या गोष्टी अभिप्रेत आहेत. तो एक दिवस तरी स्वयंपाक – पाणी अशा प्रापंचिक कामातून सुटका व्हावी, म्हणून त्यादिवशी करायचा तो ‘फराळ’ म्हणजेच फलाहार.

एरवी आपण बरंच खात असतो. त्यामुळे पचनशक्ती सतत ओव्हरटाइमच

करत असते. कारण पोटाच्या गरजेपेक्षा जिभेच्या हौसेसाठी आपण जास्त खातो.

उपवासामुळे पचनशक्तीला थोडी विश्रांती मिळते. पण नुसतं फळावर राहणं नाहीच शक्य झालं तर निदान नेहमीपेक्षा कमी आणि हलकं खाणं हे यात अभिप्रेत आहे. कुणी काय खावं याला फारसं महत्त्व नाही. कमी खाल्ल्यामुळे जडपणा येऊ नये, झोप येऊ नये व जास्त वेळ उपासनेत जावा हे महत्त्वाचं. मग ते उप्पीट असू दे, नाहीतर खिचडी.

आपलं मन तसं व्यवहाराच्या व्यापात गुंतलेलं असतं. या व्यापातून त्याला देवाची आठवण यावी कशी? पण उपवासाच्या दिवशी काहीतरी वेगळं खाताना हा दिवस इतर दिवसासारखा नाही हे आठवलं की आपोआप ज्याच्यासाठी खाण्यापिण्याची बंधनं पाळायची तो आठवतो आणि देवाचं स्मरण होतं. त्याच्या दैवी गुणांचं स्मरण. देवाचं स्मरण म्हणजे क्षमा, दया, प्रेम, शांती यांचं स्मरण.

हे आपल्या देवतेचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी प्रार्थना करणं, त्यांचं स्मरण करणं म्हणजे उपवास. रोजच्या अन्नात बदल झाला की हे स्मरण आपल्याला दिवसभर खाताना – पिताना राहावं, हा उपवासाचा हेतू.

मात्र नुसते खाद्यपदार्थ हेच आपलं अन्न असतं असं नाही. डोळ्यांनी जे पाहतो ते डोळ्यांचं अन्न असतं. कानांनी ऐकणं म्हणजे कानाचं अन्न. स्पर्श हे त्वचेचं अन्न आणि वास हे नाकाचं. जिभेबरोबरच या चारही ज्ञानेद्रियांनी संयमित राहून ईश्वराचं स्मरण करणं म्हणजे व्रत

सात्विक विचारांशिवाय अन्य विचार किंवा विकार चाळवणारं काही ऐकणं, पाहणं, स्पर्शणं या दिवशी वर्ज्य मानायला हवं.

मध्यतरी एक आई कौतुकानं सांगत होती, माझी मुलगी हरतालिका कडकडीत करते. रात्री झोप येऊ नये म्हणून एकदा लागोपाठ दोन सिनेमे व्ही. सी. आर.

वटसावित्री

वर लावून बसली होती. हा प्रकार हास्यास्पद नव्हे काय? हरतालिका, या खरं तर आदर्श, निष्ठावंत प्रेमिकांच्या कहाण्या. यातून मिळणाऱ्या पाप-पुण्याचा विचार बाजूला ठेवू. तो कदाचित् कालबाह्य असेलही. पण पार्वती काय किंवा सावित्री काय

स्वयंनिर्णयाच्या हक्कासाठी यांनी काय काय सोसलं ! दोघींनीही

एकदा वैभवावर लाथ मारून, गरीब, संसारात फारसं लक्ष नसलेला जोडीदार स्वीकारला व त्याच्याच संसारात रमल्या. त्याला आपल्या जिद्दीनं संसारात आणलं. ही जिद्द, ही निष्ठा, स्वत:च्या निर्णयासाठी सारं सहन करून त्या निर्णयावर अढळ राहण्याची वृत्ती हे जास्त संस्मरणीय म्हणूनच पूजनीय वाटतं. स्त्रीत्वाच्या या तेजस्वी पैलूसाठी हा उपवास. त्याचं जागरण काय छचोरपणे नाचणाऱ्या नायक-नायिका बघत

करायचं?

कदाचित् म्हणूनच पूर्वीच्या काळी त्या त्या व्रताची कहाणी ऐकायची पद्धत पडली असेल. कहाणीमधून त्या त्या देवतेच्या गुणांचं स्मरण होतं.

बदलत्या काळानुसार व्रतांच्या कल्पना बदलताहेत. पण एक निश्चित की, एखादी हवीहवीशी गोष्ट मग तो खाद्यपदार्थ का असेना, आपण निग्रहानं दूर सारतो तेव्हा त्या निग्रहामुळं, संयमामुळं आपली इच्छाशक्ती वाढते. काम्य व्रत करून कधीकधी इच्छित ते मिळतं ते आपलीच इच्छाशक्ती प्रबळ झाल्यामुळं.

स्वतःहून स्वीकारलेले निर्बंध म्हणजे तप. त्यामुळे आपली इच्छाशक्ती वाढते

पण व्रत करायचं ते काहीतरी मागण्यासाठीच का? आपण या संस्कृतीचं,

समाजाचं देणंही लागतो. काही देण्यासाठी का व्रत करू नये?

देण्यासारखं आपल्याजवळ खूप काही असतं. धन, वेळ, ज्ञान… पारंपारिक उपवासाबरोबर दीन-दुबळ्यांमध्ये, समाजातल्या उपेक्षितांमध्ये परमेश्वर पाहून त्यांना आपला थोडा वेळ, थोडी सेवा, थोडं धन, ज्ञान दिलं तर तो कदाचित खरा ‘उपवास’ होईल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..