आकांक्षांचा चंद्र
तुझ्यामाझ्या माथ्यावरती आकांक्षांचा चंद्र आहे नको असा उदास होऊस मला वचन याद आहे! दूर असेल जात वाट माझी पावलं सिध्द आहेत तुझ्या वाटेवरचे काटे माझ्या पायी वेदना आहेत तुझ्या-माझ्यासाठी चांदणं अमृत बनून वहात आहे ! आपली सारी प्रेमगीतं गंगेकाठचे मंत्र आहेत मंदिरातले मंजूळ निनाद हृदयातली स्पंदनं आहेत आजच्या व्यथागीतातही उद्यावरती श्रध्दा आहे ! तुझ्या प्रत्येक पावलापाठी […]