नवीन लेखन...

ठेच-लागलीच पाहिजे

मित्रांनो ! आयुष्यात ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तबंबाळ व्हावं इतक्या !! कुणीतरी प्रचंड विश्वासघात केला पाहिजे, कुठेतरी फसवणूक झाली पाहिजे, जवळची माणसे तिऱ्हाईतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत, कुठल्यातरी क्षणी भीतीने गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाचवेळी सगळी संकटे यावीत आणि इतकी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळंच संपलं! […]

नमस्कार का करावा ?

लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्या व्यक्तींचेच चरणस्पर्श केले पाहिजे ज्यांचे आचरण योग्य असेल. […]

प्रेम लग्नानंतरचं…

एकदा एक फोन आला म्हणाली छान लिहीता, कवी महाशय सांगा ना तुम्ही कुठे रहाता… मी ही थोडा बावरलो भलतच हे अघटीत, डायरेक पत्ता विचारते बाई पहिल्याच भेटीत…. हळुहळु जिव गुंतला रोज फोन यायचा, घरात असल्यावर जीव धाकधुक व्हायचा…. कळलं जर बायकोला तर आपलं काही खरं नाही, या वयात प्रेम करणं हे काही बरं नाही….. तासनतास चॅटींग […]

जातानाचे शब्द

हा अतिशय सुंदर लेख शेअर करतोय. लेखक माहित नाही. “मी असा काय गुन्हा केला ?” हे शब्द मा. प्रमोद महाजन यांनी, मा.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, आपल्या अंत समयी उच्चारले होते. आपल्या सख्ख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, अरे हे काय करताय ?” असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. […]

पुणेकरांचे WhatsApp ग्रुप

पूण्यातील मुळे, लिमये, बर्वे, घाणेकर कुटुंबियांनी व्हाटस्अॅप वर ग्रुप बनवला आणि नाव दिलं…. मु लि ब घा ग्रुप …. तयार झालेल्या ग्रुपचे नाव पाहून लगेच त्यांच्या दामले ,खरे, वाकनिस, नामजोशी, मराठे, गद्रे या मित्रांनीपण ग्रुप तयार केला…. दा ख वा ना म ग …  मग पुण्यातल्या त्यांच्या मैत्रीणी कानडे, नाफडे, खासनिस,लिमये, देसाई, उनकर, कारखानिस यांनी पण आपला ग्रुप तयार केला का ना […]

अरबी समुद्रातील शिवस्मारक

मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकारचे भुमीपुजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या भुमीपुजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले हे देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार असल्याची माहिती […]

लोणावळ्याजवळचा कोरीगड

गड, कोट, किल्ले असे शब्द घेतले की, डोळय़ांसमोर इतिहास नाचू लागतो. राजवटी, लढाया, पराक्रम, कटकारस्थाने आणि अशा कितीतरी स्थलकालाच्या घटना त्या त्या वास्तूभोवती फेर धरायला लागतात. पण प्रत्येक गडकोटांना असा ज्वलंत इतिहास मिळतोच असे नाही. पण अशांपैकी काहींचे भाग्य मात्र मग भूगोलात उजळते आणि निसर्ग त्यांना आपली सारी अपूर्वाई बहाल करतो. या कुळातीलच एक लोणावळय़ाजवळचा कोरीगड! […]

गदिमांच्या ‘चोर बाजार’ पासून बनला गुरुदत्तचा ‘प्यासा’

पंचवटीच्या व्हरांडयात गदिमा त्यांच्या सुप्रसिद्ध निळ्या कोचावर बसले होते. फाटकातून दोन व्यक्ति आत शिरल्या. त्यातले एक तेजपुंज व्यक्तिमत्व पांढरा परिवेश,धारधार नाक,गदिमांचे त्यावेळचे स्विय सहाय्यक बाबा पाठक स्वागताला पुढे झाले, ‘या गुरुदत्तजी!’. हिंदी चित्रपट सृष्टीतले सुप्रसिद्ध नट-दिग्दर्शक-निर्माता ‘गुरुदत्त’ आपल्या सहाय्यका सकट गदिमांच्या भेटीस आले होते, ‘माडगूलकरजी आपका बहोत नाम सुना है,आप अगर हमारे लिये स्टोरी लिखेंगे तो […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..