नवीन लेखन...

जरट्रड बेले एलियन – दुःखातून प्रेरणा

रसायनशास्त्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या जरट्रड बेले एलियन हिने कर्करोगावर उपाय शोधून काढला. तसेच हृदयविकार व पोटातील वायुविकारासंबंधी महत्त्वाचे संशोधन करून त्यासंबंधीची औषधे विकसित केली. त्याबद्दलच तिला १९८८ मध्ये शरीर-विज्ञानासंबंधीचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. […]

मराठी कवी बी उर्फ नारायण मुरलीधर गुप्ते

कवी बी हे नामाभिधान धारण करून नारायण मुरलीधर गुप्ते यांनी आपल्या अमृतमधुर गुंजारवाने मराठीचिये नगरी मधील विचाराचे व कल्पनेचे कुंज काही काळ निनादवून सोडले व तेथील रसिक रहिवाशांवर आपल्या गीतमाधुर्याची जबरदस्त मोहिनी घातली. त्यांचा जन्म १ जून १८७२ रोजी झाला. खरे सांगायचे म्हणजे ‘बी’ हे कवींचे कवि आहेत. अनेक कवींना स्फूर्ति पुरविण्याइतके चैतन्य व तेज त्यांच्या […]

प्रसिद्ध गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र

शंकरदास केसरीलाल हे शैलेंद्र यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९२३ रोजी झाला. १९४७ साली एका कार्यक्रमात काव्यवाचनाचे त्याला निमंत्रण आले. तेथे त्याने ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाला राज कपूर उपस्थित होते. त्याने शैलेंद्र यांची कविता ऐकली आणि ते भारावले. त्याने शैलेंद्र यांना गाठले. तेव्हा राज कपूर ‘आग’ बनवत होता. ‘आग’साठी […]

गायक जयवंत कुलकर्णी

आपल्या जादुई स्वरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तर कधी थिरकायला लावणारे गायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.जयवंत कुलकर्णी यांनी गायनाचे धडे प्रसिध्द शास्त्रीय गायक लक्ष्मणराव देवासकर यांच्याकडुन गिरवले, त्यासोबतच हार्मोनियम वाजवण्याची कला सुध्दा त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवासकर यांच्यामुळेच मिळाली. त्यांच्या आवाजातील गाण्यांवर सत्तरच्या दशकातील तरुणाई इतकी फीदा होती की, महाविद्यालयात […]

पंजाबी आणि हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अमृता प्रीतम

अमृता प्रीतम यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९१९ रोजी झाला. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी महत्त्वपूर्ण साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित […]

सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष

ऋतुपर्णो घोष यांनी अनेक बंगाली आणि हिंदीमध्ये यशस्वी चित्रपटांचं दिग्दर्शन केले होते. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. स्त्रीत्वाच्या खुणा कधी साडीतून तर कधी दागिन्यांमधून अधोरेखित करणा-या घोष यांनी नव्वदीच्या दशकात चित्रपट दिग्दर्शनातील कारकीर्द सुरू केली, घोष यांच्या कारकिर्दीला जाहिरात क्षेत्रापासून सुरुवात झाली. यानंतर ते चित्रपटसृष्टीकडे वळाले. ऋतुपर्णो घोष यांनी १९ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये […]

सुप्रसिद्ध संतूर वादक पंडित उल्हास बापट

अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली आहे. पं. उल्हास बापट यांनी संगीताचे रीतसर शिक्षण श्रीमती झरीन शर्मा, पं के जी गिंडे आणि पं वामनराव सडोलीकर या संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींकडून घेतले. ‘क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस बाबा सांगतात… सांगेन गोष्टी हिताच्याच चार…. निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे. तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला “जीवन” असा आणखी […]

मराठी संगीतकार दशरथ पुजारी

बार्शीच्या गोपाळराव भातंब्रेकर गुरुजींकडून दशरथ पुजारी यांनी संगीताचे व गायनाचे धडे घेतले. त्यांचा जन्म ३० ऑगस्ट १९३० रोजी झाला. वयाच्या अवघ्या १८ वर्षांपासूनच त्यांनी संगीत दिग्दर्शनातील कारकीर्दीस सुरुवात केली. दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्यांनी पं.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले यांच्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मा. दशरथ पुजारी हे एक उत्तम संगीतकार आणि तितकेच उत्तम […]

अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…! […]

1 2 3 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..