नवीन लेखन...

महाराष्ट्रातील विविध संस्थांची माहिती देणारा विभाग

ज्ञान प्रबोधिनी….हिंदू धर्मात सुधारणा करणारी पुण्यातील संस्था

आपल्या धर्मातील अनिष्ट गोष्टींना आपणच मूठमाती द्यायची असते.सुधारणा प्रथम स्वतः पासून आणि आपल्या कुटुंबां पासून करायची असते.याचीच जाणीव झाल्यामुळे कै. विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी १९६२ साली ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली. स्वदेशात विचारप्रबोधन व्हावे, कार्यप्रबोधन व्हावे, देशाचा कायापालट व्हावा, लोकमानसात नवचैतन्य निर्माण व्हावे हा प्रबोधिनीच्या कार्याचा हेतू आहे. […]

सरस्वती सेकंडरी स्कूल – नवकांती पालवली विद्याभवनी !

नूतन विद्या संकुल प्रत्यक्षात साकार करणे हे शिवधनुष्य उचलण्यासारखे मोठे कठीण काम आहे. संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि हितचिंतक यांच्या एकत्रित प्रयत्नाने हा मेरू पर्वत उचलला जाईल असा संस्थेचा विश्वास आहे. अस्त पावलेल्या जुन्या इमारतीतील विटांनी नवी वास्तु उदयास येणार आहे. या विटांच्या रूपाने, विमलाबाई कर्वे यांनी रुजविलेले आणि जोपासलेले, जुन्या वास्तूतील संस्कार, मूल्य आणि उच्चतम गुणवत्ता हि जीवन सूत्रे नव्या वास्तुच्या गर्भात पुनर्जीवित होणार आहेत. त्यातूनच, मराठी शाळेची कळी नव्याने उमलणार आहे. ‘नवकांती पालवली विद्याभवनी’ असेच वर्णन सरस्वती विद्या संकुलाचे होईल याची मला खात्री आहे. […]

‘टाइम्स’ संस्थेच्या मानांकनात पुण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अव्वल

‘टाइम्स हायर एज्युकेशन’ या जागतिक स्तरावर शैक्षणिक संस्थांचे मुल्यांकन करणा-या संस्थेने शैक्षणिक वर्ष 2017-18 ची जागतिक क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात सातवा क्रमांक पटकावला असून, पारंपरिक विद्यापीठांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल ठरले आहे. हे विद्यापीठ वगळता महाराष्ट्रातील एकाही विद्यापीठाचा क्रमवारीत समावेश झालेला नाही. देशात बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्युट आॅफ सायन्स ही […]

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडेमी) स्थापना दिन

सैनिकी प्रशिक्षण देणारी भारतातील एक महत्त्वाची संस्था. पुणे शहराजवळ खडकवासला येथे ही संस्था असून तिन्ही सैनिकी दलांचे प्राथमिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची सोय या संस्थेत आहे. भूसेना, नौसेना व वायुसेना या दलांतील अधिकाऱ्यांचे शिक्षण सुरुवातीस एकत्र केले जावे, या उद्देशाने १९४५ साली तत्कालीन हिंदुस्थान सरकारने नॅशनल वॉर अकॅडेमी वर्किंग कमिटी नेमली. या कमिटीचे अध्यक्ष फील्ड मार्शल सर […]

‘आरंभ’ एका यशोगाथेचा !

१४ ऑक्टोबर, २०१४ चा हा माझा लेख. ‘आरंभ’ च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा पोस्ट करतो आहे. फेसबुकच्या कृपेने औरंगाबादमधील एका संस्थेचा त्रोटक परिचय झाल्यापासून ती संस्था सतत मला खुणावत होती. तिच्या विविध उपक्रमांची माहिती वाचत असतांना ‘ऑटिस्टिक’ या शब्दाचा आयुष्यात प्रथमच परिचय झाला. दुर्बलमनस्क, मतिमंद हे शब्द अगदी शाळकरी वयापासून कानावर पडले होते. ज्यांच्या घरात अशी […]

सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) – १०० वर्षांचा इतिहास

पुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात. […]

सोशियल सर्विस लीग, एक सेवाभावी संस्था

सर नारायण गणेश चांदवडकर, श्री भालचंद्र कृष्णा भाटवडेकर, श्री गोकुळदास के. पारेख, सर जमशेटजी जीजीभॉय आणि इतर अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांनी गिरणी कामगारांचा सामाजिक स्तर उंचावा, गरिबी संपावी, त्यांना चांगले माणूस होता यावे म्हणून १९ मार्च, १९११ रोजी त्यांनी ‘सामाजिक सेवा लीग’ अशी अद्वितीय सेवाभावी संस्था स्थापन केली. लीगचे पहिले सचिव म्हणून श्री एन.एम. जोशी यानां मान देण्यात आला. […]

धारावीचं संगीत गुरुकुल

मुंबईतल्या धारावी येथील, गरीब मुलांना संगीत विषयाची गोडी उत्पन्न व्हावी तसंच संगीत वाद्य शिकता यावीत यासाठी धारावी येथील इंदिरा नगरच्या गुरुकुल ट्रस्टने जानेवारी २०१२ पासून गरिब विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत कमी किमतीत शिकता यावे या उद्देशाने ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.
[…]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..