नवीन लेखन...

जनता सहकारी बँकचा ७२ वा वर्धापनदिन

आज ‘छोट्या लोकांची मोठी बँक’ म्हणून गेल्या सात दशकाहून अधिक काळ राज्याच्या सहकार क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केलेल्या जनता सहकारी बँक पुणे चा वर्धापन दिन.

१८ ऑक्टोबर १९४९ रोजी समाजातील दुर्बल घटकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनता बँकेची स्थापना झाली. १९८८ मध्ये बँकेस शेड्युल्ड दर्जा प्राप्त झाला तर मार्च २०१२ साली बँक मल्टिस्टेट म्हणून ओळखली जाऊ लागली. सहकार क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून जनता सहकारी बँकेने आपला नावलौकिक निर्माण केला आहे. आजमितीस बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात ६६ शाखा कार्यरत असून बँकेची एकूण उलाढाल रुपये १२ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. देशाच्या सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिल्या दहा बँकांमध्ये जनता बँकेची गणना होते.

आधुनिकतेची कास धरणाऱ्या जनता सहकारी बँकेने बँकिंग संबंधीच्या सर्व सेवा सुविधा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी खास मोबाईल बँकिंग सेवा प्रणाली तयार केली आहे. या सुविधेमुळे जनता बँकेच्या महाराष्ट्र व गुजरात मधील सर्व ६६ शाखांमधील ग्राहकांना २४ तास आणि ३६५ दिवस मोबाईलच्या एका क्लिकवर आपल्या खात्यावरील शिल्लक पाहणे, मुदतठेव खाते उघडणे, स्वत:च्या अन्य बँकांच्या खात्यांमध्ये हस्तांतरण करणे, मोबाईल, केबल टी.व्ही रिचार्ज, वीज, विमा, दूरध्वनी इ. देयकांचा भरणा करणे सहज शक्य झाले आहे.

बँकिंग क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आमुलाग्र बदल झाले. आधुनिकतेची कास धरून सर्वच क्षेत्रातील बँकांनी आपल्या शाखांचे जाळे देशाच्या ग्रामीण भागापर्यंत पसरविले. जनता सहकारी बँकेने देखील बँकिंग क्षेत्रातील आधुनिकता आत्मसात करून आपल्या ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एनिवेअर बँकिंग, कोअर बँकिंग, डीमॅट, विमा, ’आरटीजीएस, नेफ्ट’ यासारख्या अत्याधुनिक बँकिंग सेवा अतिशय अल्प दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. बँकेने आपले स्वत:चे अत्याधुनिक डेटा सेंटर उभारले असून या डेटा सेंटरचा उपयोग सध्या राज्यातील अन्य लहान सहकारी बँकादेखील करून घेत आहेत.

सहकार क्षेत्राच्या आणि जनता सहकारी बँकेच्या इतिहासात सोमवार दिनांक १५ फेब्रुवारी २०१६ हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला गेला. या दिवशी जनता सहकारी बँकेच्या ’अमृतकलश’ या ठेव योजनेत केवळ एका दिवसात शंभर कोटी रुपये जमा झाले. बँकेच्या ग्राहक, सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी बँकेवर असलेले आपले अपार प्रेम आणि विश्वास दाखवून दिला. रिझर्व्ह बँकेने जनता सहकारी बँकेला ‘टियर टू कॅपिटल’ साठी ’अमृतकलश’ या ’लाँग टर्म डिपॉझिट’ (एलटीडी) या योजनेद्वारे रुपये शंभर कोटी जमा करण्यास परवानगी दिली होती. यानुसार ग्राहकांनी ’अमृतकलश’ योजनेत रुपये शंभर कोटी जमा करून एक नवा इतिहासच घडविला. गेल्या काही वर्षात सहकारी बँकिंग विश्वारला तडे जात असताना ’अमृतकलश’ योजनेच्या माध्यमातून जनता सहकारी बँकेवर ग्राहक, ठेवीदार, सभासद, हितचिंतक यांनी जो विश्वा स दाखविला त्यामुळे सहकारी बँकिंग चळवळ आणखी बळकट होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

जनता सहकारी बँकेने यापूर्वी मुंबईतील पुना को-ऑप बँक, गुजरातमधील खेडब्रम्हा आणि कोकणातील रत्नागिरी को-ऑप बँक या बँकांचे यशस्वी विलिनीकरण करुन घेतले आहे. जनता बँकेत विलीन होणारी चौंडेश्वपरी बँक ही चौथी बँक आहे. बँकेची एकूण उलाढाल रुपये १३ हजार २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देण्याकरिता ‘ई-न्यूजलेटर’ सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांशी असणारी आपुलकी, जिव्हाळा तसेच आधुनिक बँकिंग यांचा योग्य समन्वय साधल्यामुळेच जनता सहकारी बँकेचा आलेख उंचावत आहे. आगामी काळातदेखील शाखा विस्ताराच्या माध्यमातून तसेच खासगी आणि राष्ट्रीयीकृत बँका देत असलेल्या आधुनिक सेवा सुविधा जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांना अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा जनता बँकेच्या संचालक मंडळाचा तसेच व्यवस्थापनाचा मानस आहे.

२०१७ ते २०२२ पर्यतचे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे – विद्यानंद देवधर, जगदीश कदम, डॉ. मधुरा कसबेकर, बिरू खोमणे, संजय लेले, सी.ए माधव माटे, सुनील मुतालिक, सीए सुधीर पंडित, प्रभाकर परांजपे, लक्ष्मण पवार, महेंद्र पवार, सी.ए मोहन फडके, किशोर शहा व अमित शिंदे, रामदास शिंदे, अ‍ॅड. गौरी कुंभोजकर व अलका पेटकर.

— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 2994 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..