बडोदा वस्तूसंग्रहालय
वस्तुसंग्रहालय म्हणजे ऐतिहासिक ठेवा जतन व संवर्धन करण्याचे ठिकाण होय. ‘वस्तुसंग्रहालय’ या संकल्पनेचा उगम युरोपमध्ये झाला. इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात अलेक्झांड्रीयामधील टॉलेमी राजाने आपल्या राजवाड्यात पहिल्यांदा वस्तुसंग्रहालय सुरू केले. या राजवाड्यातच अलेक्झांडर द ग्रेट यांचा ग्रंथसंग्रह ठेवण्यात आला होता. परंतु ग्रीक लेखक पॉसॉनियस यांच्या माहितीनुसार इ.स. दुसऱ्या शतकात अथेन्स शहरात एका मोठ्या दालनात काही पेंटिंग्ज सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवलेल्या होत्या. ही प्राचीन काळातील सार्वजनिक वस्तुसंग्रहालयाची सुरुवात होती. […]