नवीन लेखन...

शैक्षणिक

विश्वकर्मा शिल्पकार – समालोचन

विश्वकर्मा समाजाच्या सांस्कृतिक अध्ययनात सर्वप्रथम शिल्पकारांच्या अस्तित्वाचा शोध घेतल्या गेला आणि नंतर अन्य पैलुवर विचार करण्यात आला आहे. विश्वकर्मा शिल्पकारांनी आपल्या कला कौशल्याने धर्म, रुढी, परंपरा, श्रद्धा, दैवते, कुलाचार, नैतीकता, शिष्ठाचार, या सर्व मनो व्यापाराना शाश्वत रुप दिले आणि एका पिढीने जतन केलेली सांस्कृतिक ठेव पुढच्या अनेक पिढींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय जीवनच समृद्ध करुन नवोन्मेषाने जगण्याची प्रेरणा दिली. पाषाणात प्रेम, शौर्य, हास्य, करुणा किंवा कोणताही भाव मूर्तीमंत (जसाच्या तसा) कोरणे मोठे अबघड काम आहे. पुराण ग्रंथातील प्रसंगाना सुद्धा मूर्त रुप देऊन पाषाणातून सजीव केल्या गेले, त्यामुळे वाचा नसलेले दगडही बोलते झाले; प्रेक्षकांशी संबाद साधू लागले. […]

ओळख मूलांकांची – मूलांक ८

अंकशास्रा प्रमाणे ( Numerology Of Mulank 8:) मूलांक ८ चा स्वामी ग्रह शनी देव आहे. त्यामुळे कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणतात. शनी प्रत्येक राशीच्या लोकांना आपल्या कर्मानुसार फळ देतो. राशींप्रमाणेच अंकशास्त्रात देखील मूलांकावरुन (Mulank) व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी कळतात. यासाठी आज आपण मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत. […]

विश्वकर्मा शिल्पकार: वाकाटक-गुप्त काल ते तेराव्या शतकापर्यंत

गुप्त साम्राज्याचा काळ हा अनेक अर्थाने संपन्नतेचा कालखंड समजल्या जातो. या काळात धार्मिक जीवनात तर मोठाच बदल घडून येऊ लागला होता. धर्माच्या अनेक पंथ-उपपंथाची वाढ होऊ लागली होती. जुन्या वैदिक धमाचे स्वरुप पालटत होते. जुन्या वैदिक देवता व यज्ञ-याग हळुहळु लोप पावू लागल्या होत्या. धार्मिक जीवन अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे वळू लागले होते. […]

ओळख मूलांकांची – मूलांक ७

अंकशास्त्रात (Numerology) प्रत्येक व्यक्तीच्या मूलांकानुसार (Mulank) त्या व्यक्तीचा स्वभाव तसेच गुण वैशिष्ट्य सांगितली जातात. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरवला जातो. या मूलांकाच्या आधारानेच व्यक्तीच्या भविष्याच्या संदर्भात अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. आज आपण असाच एका मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना काही घडण्याआधीच भाकीत करता येतं अंकज्योतिष शास्त्रानुसार, आज आपण मूलांक ७,विषयी जाणून घेणार आहोत. […]

ओळख मूलांकाची – मूलांक ६

अंकशास्त्र (NUMEROLOGY) हे संख्येद्वारे जीवनातील विविध पैलू समजून घेण्यास मदत करतो. अंकशास्त्र केवळ व्यक्तिमत्व आणि प्रवृत्तींबद्दलच सांगत नाही, तर भविष्याबद्दल अचूक अंदाजही लावते. त्यामुळेच आता अंकशास्त्र खूप लोकप्रिय झाले आहे. तसेच जे शतकानुशतके मानवी जीवनातील गुंतागुंत सोडविण्यात उपयुक्त ठरले आहे. […]

ओळख मूलांकाची – मूलांक ५

अंकशास्त्रानुसार, तुम्ही ज्या जन्मतारखेला जन्म घेता त्या जन्मतारखेचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होत असतो. अंकशास्त्रात १ ते ९ अंक आहेत आणि या प्रत्येक अंकाचा स्वामी एक विशिष्ट ग्रह आहे. अंकशास्त्रात (Numerology) ५ हा अंक खूप खास मानला जातो. […]

ओळख मूलांकाची – मूलांक ४

कशास्त्र ही भविष्य कथनाची एक स्वतंत्र शाखा मानली जाते.ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या प्रमाणे राशींनुसार (Zodiac Signs) माणसाचा स्वभाव कळतो. त्याचप्रमाणे, अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्रानुसार, व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा स्वभाव ओळखला जातो. त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा, व्यक्तिमत्व तसेच, आवडीनिवडी ओळखल्या जातात. […]

ओळख मूलांकाची – भाग ३ – मूलांक ३

अंकज्योतिष शास्त्रात प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व आहे. अंकशास्त्रानुसार (Numerology), व्यक्तीचा स्वभाव, त्याचं भविष्य तसेच, व्यक्तीच्या आवडी निवडी यांचा अंदाज लावता येतो. या ठिकाणी आपण आज मूलांक 3 (Mulank) च्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूलांक ३ चा शासक ग्रह गुरू असून हा सात्विक, शुद्ध आणि सौम्य ग्रह मानला जातो. […]

विश्वकर्मा शिल्पकार: आरंभिक इतिहास कालखंड

बुद्ध धर्माचा बुद्ध आणि महावीर यांच्या तत्व विचाराचा अत्यांतिक प्रभाव ज्या कालखंडावर जाणवतो तो कालखंड म्हणजे बुद्ध जन्म शतक इ. स. पूर्व ६०० ते गुप्त राजवटीचे आधी म्हणजे इ. स. ३०० पर्यंत होय. यालाच आरंभिक इतिहास कालखंड म्हटले आहे. या कालखंडात विश्वकर्मा समाजाच्या कला कौशल्यात जे बदल घडले, ते त्यांच्या कला कौशल्यातूनच स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बुद्धाच्या आणि महावीरांच्या तत्व प्रभावाने समाजात वेगळी सामाजिक जाण निर्माण झाली. त्यांचा परिणाम धर्म विचार, कला कारागीरी व भाषा या मूलभूत सांस्कृतिक मुल्यांवर पडला तरी परंतु परंपरेने चालत आलेले वैदिक मत, वैष्णव मत, शैव मत, शाक्त मत, सौरमत आणि मंखलिपुत्त गोसालाचे आजीविकमत आपापल्या परीने राज्यकर्त्यावर व समाजावर प्रभाव गाजवितच होते. सम्राट अशोकाने अंगीकार केल्यानंतर धर्म प्रचारासाठी स्तूप, विहार, स्तंभ निर्माण करविले, व त्यावर बुद्ध धर्माचे सिद्धांत, सदाचार, नैतिकता व धार्मिक गोष्टी कोरल्या. मौर्याचे उत्तराधिकारी शुंग वैदिक धर्माचे उपासक होते तरी ते बौद्ध धर्माप्रति सहिष्णु असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या शासन काळात भारहुत, मथुरा, बौधगया, सांची येथे अनेक बौद्ध स्तूपांची निर्मिती झाली. […]

बाळगुटी एक वरदान: भाग १० – बहुउपयोगी सुंठ

मराठीत सुंठीवाचुन खोकला गेला अशी एक म्हण आहे. यातच सुंठीचे व्यवहारातील औषधी महत्व अधोरिखित होते. सुंठ म्हणजे सुकविलेले आले. आल्याला चुन्यामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. […]

1 2 3 4 5 168
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..