नवीन लेखन...
प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

बॅलन्सशिट

बॅलन्सशिट सांभाळून मुलांच्या शिक्षणासाठी जिवाचे रान करणाऱ्या प्रत्येक आईबापांच्या नशिबात असे पुतणे येतातच असे नाही. पुस्तकी ज्ञान आणि शिक्षणासोबत संस्कार आणि आपलेपणाची जाणीव देणेही तितकंच महत्वाचे आहे. […]

सेल बोट

लाँच चुकली म्हणून आम्हाला आणायला आलेल्या शिडाच्या होडीतील नावाड्याने पैसे घेण्यासाठी नकार दिला पण बाबांनी त्याला पाचशे रुपये घ्यायलाच लावले. पाचशे रुपयात आलेल्या त्या स्पेशल सेल बोट चा त्यावेळचा प्रवास हा आयुष्यातील पहिलाच प्रवास होता आणि अजूनही तो एकमेवच आणि कधीही न विसरता येण्यासारखा आहे […]

स्काय व्ह्यू

फ्लाईट ने ऑनटाइम टेक ऑफ केले. टेक ऑफ नंतर जकार्ता शहराचे दोन अडीच मिनिटे हवाई दर्शन झाले आणि जकार्ता जवळील समुद्रातील लहान मोठी बेटे दिसू लागली […]

फ्लेअर्ड नाईट

डोंगर माथ्यावरून निघणाऱ्या ज्वाला डोंगराच्या पायथ्यावरुन, मध्यावरून का निघत नसाव्यात याचे कुतूहल वाटू लागले पण लगेचच तो डोंगरच जर बाहेर पडणाऱ्या तप्त लाव्ह्या पासून बनला असेल असं वाटून मला पडलेले कुतूहल लगेचच शमले. बराच वेळ जहाज ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या बेटाच्या दिशेनेच चालले होते पण जहाजाची दिशा बदलली असल्याचे जाणवले कदाचित कॅप्टन ब्रिजवर गेला असावा आणि त्याने जहाज बेटाजवळून न नेता लांबून वळवण्यासाठी सूचना दिल्या असाव्यात. […]

स्नेक फ्रुट

सापाच्या स्किन सारखीच साल असणारे स्नेक फ्रुट मोठ्या प्रमाणावर मिळते. स्नेक फ्रुट ची साल काढल्यावर आत दोन गरे असतात. फणसासारखे दिसणारे गरे खाताना नारळाच्या तुकड्यासारखे लागतात पण चव काहीशी संमिश्र अशी असते, काहीशी गोड काहीशी तुरट पण पूर्णतः वेगळी. […]

निवद

चेरोबा आणि पारदेवाच्या चौथऱ्यासारखे बांधकाम केलेले आहे. पण आमच्या शेतांच्या जवळ असलेला म्हसोबा देव बांधावरच आहे. मूर्ती नसलेले आणि शेंदूर फासलेले दगड हेच आमचे गावदेव आहेत. गावात सगळ्यात जास्त चेरोबा देवाला मानतात. म्हसोबा देवाला तिथं आसपास ज्यांची शेती आहे ते लोकं जास्त मानतात. ह्या गावदेवांना गावातली लोकं वर्षातून एकदा तरी कोंबड्याचा निवद म्हणजे नैवेद्य देत असतात. […]

प्रोफाईल

पवन ने तिच्या आठ दिवसापूर्वीच्या सगळ्या पोस्ट बघितल्या आणि त्याच्या मनातल्या संशयाच्या भूताने, आता मला ह्या मुलीशी लग्नच करायचे नाही असा निर्णय घेऊन टाकला. […]

आमच्या गावान

वयाच्या आठव्या वर्षापर्यंत माझे बालपण आमच्या गावातच गेले. त्यावेळेस चार आणे आणि आठ आण्यासह जस्ताचे दहा आणि वीस पैसे पण चालायचे. गावात असलेल्या दुकानात तेव्हा चार आण्यात काचेच्या बरणीत ठेवलेली गोळ्या बिस्कीट मिळायची. […]

ब्लॅक आउट

हवामान सकाळपासून खराब होणार आहे असा व्हेदर फोरकास्ट आदल्या दिवशीच मिळाला होता त्यामानाने संध्याकाळी साडे सहाला डिनर होईपर्यंत सहन करण्याइतपत जहाज हेलकावत होते. पण रात्री दहा नंतर वाऱ्याचा वेग वाढला होता. सुं सुं करत वाहणाऱ्या वाऱ्यासोबत लाटांनी सुद्धा आक्राळ विक्राळ रूप धारण केले होते. जहाज येणाऱ्या लाटेवर स्वार होऊन दुसरी लाट यायच्या आत दोन्हीही लाटांच्या मध्ये धाडकन खाली आदळत होते आणि पुन्हा एकदा उसळी मारल्या सारखं वर येत होतं. […]

1 2 3 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..