गणपति : विज्ञानयुगीन उकल : विघ्नेश व विघ्नहर्ता
अथर्वशीर्षात गजाननाबद्दल, रक्तिम-वस्त्रे-परिधान-केलेला, रक्तगंधानें-लिप्त-अंग असलेला, रक्तपुष्प-पूजित असे उल्लेख आहेत. गजाननाला रक्तवर्ण (लाल रंग) प्रिय आहे, असे अन्यत्रही उल्लेख आहेत. असें कां बरें ? याचें उत्तर पुरातन वाङ्मयानेंच दिलेले आहे. त्यात उल्लेख केलेला आहे की, गजानन हा आरंभीच्या काळात ‘विघ्नेश’, ‘विघ्नकर्ता’ होता; आणि नंतर त्याचें ‘विघ्नहर्ता’ हें रूप प्रचलित झाले. अरेच्चा !! पण इतका उलटा बदल कसा […]
