नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

आला कोन, गेला कोन

जेव्हा कॅरमबोर्डावरच्या सोंगटीला आपण स्ट्रायकरचा वापर करून ढकलतो तेव्हा काय होतं हे बारकाईनं पाहिलं आहेत कधी?
[…]

हवामानशास्त्र……..

सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इतर अनेक महत्त्वाची शास्त्रे सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित झालेली दिसतात. मात्र माहिती तंत्रज्ञानाची जोड या अनेक शास्त्रांना मिळाली आणि या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग सकारात्मकपणे केला तर ते मानवी जीवनासाठी उपयुक्त ठरते, हे हवामानशास्त्राद्वारे सिद्ध झाले आहे. सुनामी किंवा चक्रीवादळ, अतिपर्जन्यवृष्टी या सारख्या आपत्ती उद्भवण्यापूर्वीची सूचना सहज मिळते. याचे कारण म्हणजे प्रगत असे हवामानशास्त्र होय.
[…]

मीरा (MIRA)महासंगणक

मीरा (एमआयआरए) हा लॅटिन शब्द असून, त्याचा अर्थ आश्चर्यकारक वस्तू असा होतो. अमेरिकेला तिचे महासत्तापद टिकवायचे असेल तर एखादा मोठा शोध लागणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा लोकांच्या कानीकपाळी ओरडून भारत व चीनमध्ये महत्त्वाचे शोध लागायला नकोत असे सांगत आहेत […]

अश्मयुगापासून आजपर्यंत

आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. […]

अंतराळातून… संपूर्ण सूर्यदर्शन

सूर्यावर घडणार्‍या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात. […]

दिवस घटला…!

जपानमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपानंवर पृथ्वीच्या प्रदक्षिणाकाळात घट होऊन दिवसाचा कालावधी कमी झाला आहे….. का?
[…]

ॲ‍ॅमनिओ पॅच – एक वरदान

ज्या गर्भार महिलेच्या गर्भाशयातील पाणी काही कारणास्तव अचानकपणे कमी झालेले किंवा निघून गेलेले असते, अशा गर्भाची नीट वाढ होत नाही व त्याच्या जगण्याची शक्यताही धूसर होते. अशा वेळी ‘अॅमनिओ पॅच’ या वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रक्रियेद्वारे त्या बाळास जीवदान देता येते व प्रसूतीही चिंतामुक्त होऊ शकते. हे शक्य केले आहे नाशिकच्या एका सहृदय महिला डॉक्टरने!
[…]

आईबाबांनो, भांडा; पण जरा जपून, मुलं शिकताहेत!

आई-वडिलांचे भांडण ही मुलांची जागतिक समस्या आहे. भांडण बघताना मुलांच्या रक्तात कॉर्टिसॉल नावाचे तणाव निर्माण करणारे इंद्रियक्रियाप्रवर्तक (हॉर्मोन) वाढते. मुलाला असुरक्षित वाटू लागते. वादविवाद, शिव्याशाप, धक्काबुक्की, मारहाण, फेकाफेकी अशा घटना वारंवार घडल्यास त्यांच्या मनांवर, शिक्षणावर गंभीर व कायमस्वरूपी परिणाम होतो. […]

चेर्नोबिल दुर्घटना

अणुविद्युत्निर्मितीमध्ये अणुभट्टीची सुरक्षितता सर्वोपरी असते. बाकी सर्व गोष्टी त्यानंतर येतात. परंतु चेर्नोबिल दुर्घटनेत डिझाइनमधील त्रुटी, मानवी चुका, प्रचालकांच्या ज्ञानाची कमतरता आणि सुरक्षिततेबाबतची अक्षम्य बेपर्वाई या गोष्टी कारणीभूत ठरल्या. याच दुर्घटनेस यंदाच्या पंचवीस एप्रिल रोजी पंचवीस वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने या गंभीर अपघाताचा हा आलेख…..
[…]

जपानमधील कालप्रलय

जपानला 1854 साली 8.4 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर त्यापेक्षा अधिकचा म्हणजे 8.9 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप शुक्रवार दिनांक 11 मार्च, 2011 रोजी जपानच्या वेळेप्रमाणे दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी झाला आहे. त्या वेळी भारतात सकाळचे 11 वाजून 16 मिनिटे झाली होती. पण 2004 साली सुमात्रा बेटात झालेला भूकंपही 8.9 तीव्रतेचा होता. म्हणजे तेव्हाचा सुमात्रातील भूकंप आणि आताचा जपानमधील भूकंप हे सारख्याच तीव्रतेचे होते. […]

1 62 63 64 65
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..