नवीन लेखन...

टॉप टेन इंटरनेट स्पीड

Top ten Internet Speeds

इंटरनेट प्रसार वाढू लागला तशी त्याच्या स्पीडची गरजही वाढली. अकामाई टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इंटरनेटचा सर्वाधिक स्पीड असलेले हे “टॉप टेन” देश. विशेष म्हणजे, चौदाव्या स्थानी असलेल्या अमेरिकेला “टॉप टेन मध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

हॉंगकॉंग –
सरकारी मदत आनि लोकसंख्येची घनता यामुळे हॉंगकॉंगमध्ये इंटरनेटचा स्पीड जगात सर्वाधिक आहे. याठिकाणी सरासरी ५४.१ एमबीपिएस स्पीड मिळतो. अधिक विस्ताराने सांगायचे, तर बॅटलशिपसारखा एचडी चित्रपट या स्पीडमध्ये केवळ चार मिनिटात डाऊनलोड होतो. याठिकाणी इंटरनेटवर कुठलीही सेन्सॉरशिपही नाही.

दक्षिण कोरिया –
ऑनलाइन गेमिंग इंटरनेट स्पीडमधील खूप मोठा हिस्सा गिळंकृत करते. वर्ल्ड सायबर गेम्स या ऑनलाइन गेमिंगचे ठिकाण असलेले आणि इलेक्ट्रॉनिक आर्टसाठी स्वतंत्र चॅनेल असलेल्या दक्षिण कोरियामध्ये इंटरनेटवर सरासरी ४८.८ एमबीपीएस स्पीड मिळतो. तोही खूपच स्वस्तात. त्यातच सोलमधील नागरिक, तर दर महिन्याला ३१.९० डॉलर भरुन ११० एमबीपीएसपर्यंतचा स्पीड मिळवतात.

जपान –
इलेक्ट्रॉनिक उद्योगात जपान पिछाडीवर पडत असले, तरी टेलिकम्युनिकेशनमध्ये मात्र, अजूनही आघाडी कायम आहे. याठिकाणी सरासरी ४२.२ एमबीपीएस स्पीड मिळतो. इंटरनेटला चांगला स्पीड देणे हे जपान सरकारचे फार जुने उद्दिष्ट्य आहे.

लाटविया –
तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत देशांच्या यादीत कधीही या देशाचे नाव ऐकले नसेल. पण तरीही इथला स्पीड आहे ३७.५ एमबीपीएस पूर्व युरोपातील या देशात इंटरनेटच्या चांगल्या स्पीडमागील कारण आहे सरकारचा पाठिंबा.

रोमानिया –
या देशात इंटरनेटला ३७.४ एमबीपीएसचा स्पीड मिळतो. तरीही गेल्या तिमाहीच्या तुलनेत त्यात ३.२ टक्क्याची घट झाली.

बेल्जियम –
इथे इंटरनेटला सरासरी ३२.७ एमबीपीएस स्पीड मिळतो. या स्पीडने ऑस्टिन पॉवर्स इन गोल्डमेंबर हा चित्रपट अवघ्या सहा मिनिटांत डाऊनलोड करता येतो.

स्वित्झर्लंड –
आर्थिक क्षेत्रातील महत्वाचा देश असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये ३२.४ एमबीपीएसचा स्पीड मिळतो. अमेरिकेतील २९.६ एमबीपीएसच्या तुलनेत हा खूपच अधिक आहे.

बल्गेरिया –
जगभरात इंटरनेटचा स्पीड घसरत असताना गेल्या तिमाहीच्या तुलनेत बल्गेरियात १५ टक्के वाढ झाली आहे. या ठिकाणी मिळत असलेल्या ३२.१ एमबीपीएसच्या स्पीडसह किमान कर आणि स्वस्तातील मनुष्यबळ या आधारावर हा देश जगभरातून गुंतवणूक आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे.

इस्त्रायल –
राजकीय अस्थिरता असूनही इंटरनेटचा स्पीड पुरविण्यात इस्त्रायल जागतिक पातळीवर टॉप टेनमध्ये आहे. याठिकाणी ३०.९ एमबीपीएस स्पीड मिळतो. याठिकाणच्या टेक्नोसॅव्ही लोकांमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन उद्योग सुरु करण्यासाठी एका सर्वेक्षणानुसार सिलिकॉन व्हॅलीनंतर तेल अविवचा क्रमांक लागतो आहे.

सिंगापूर –
जागतिक सरासरी असलेल्या १५.९ एमबीपीएसच्या तुलनेत दुप्पट असलेल्या ३०.७ एमबीपीएस स्पीडने सिंगापूर टॉप टेनमध्ये स्थान पटकावून आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..