नवीन लेखन...

मीरा (MIRA)महासंगणक

जगात जो संगणक जास्तीत जास्त वेगाने गणन करून कूटप्रश्नांची उकल करू शकतो त्याला महासंगणक असे म्हणतात.

सध्याचा सर्वांत वेगवान महासंगणक चीनमध्ये असून, त्याचे नाव तियानहे-१-ए असे आहे.

त्याच्या चारपट वेगाने काम करणारा मीरा हा महासंगणक आयबीएम कंपनी अमेरिकेत तयार करीत आहे. त्याचा गणनाचा वेग हा सेकंदाला १० क्वाड्रिलियन (१ क्वाड्रिलियन म्हणजे १००० ट्रिलियन) असेल. अमेरिकेत शिकागोपासून जवळच असलेल्या अरगॉन नॅशनल लॅबोरेटरीसाठी हा महासंगणक तयार केला जात आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येएवढे लोक सेकंदाला एक गणन या वेगाने आकडेमोड करू लागले तरी त्यांना मीरा महासंगणक एक सेकंदाला जेवढी गणने करतो तेवढी करायला एक वर्ष लागेल. यावरून त्याच्या वेगाची कल्पना यावी. हा महासंगणक तयार करण्यासाठी पाच कोटी डॉलर इतका खर्च येणार आहे. सध्या अरगॉन लॅबोरेटरीकडे इंट्रेपिड नावाचा महासंगणक आहे. तो सेकंदाला ५०० ट्रिलियन गणने करतो. त्याच्यापेक्षा वीसपट अधिक गणन मीरा करणार आहे.

मीरा (एमआयआरए) हा लॅटिन शब्द असून, त्याचा अर्थ आश्चर्यकारक वस्तू असा होतो. अमेरिकेला तिचे महासत्तापद टिकवायचे असेल तर एखादा मोठा शोध लागणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा लोकांच्या कानीकपाळी ओरडून भारत व चीनमध्ये महत्त्वाचे शोध लागायला नकोत असे सांगत आहेत. इनोव्हेशनसाठी हा महासंगणक अमेरिकेला उपयोगी पडणार आहे. उद्योग, शिक्षण, सरकारी संस्था यांना या महासंगणकाचा वापर करण्यास परवानगी मिळणार आहे. आयबीएमच्या ब्लू-जीन-क्यू या मालिकेतील हा महासंगणक १० पेटाफ्लॉपचा आहे. त्याचा उपयोग जास्तकरून संशोधकांनी करावा, असे अपेक्षित आहे.

साथीच्या रोगांच्या नियंत्रणातही त्यातील माहिती वापरली जाईल. साथीच्या काळात औषधांचा नेमका किती साठा उपलब्ध असला पाहिजे हे तत्काळ समजू शकणार आहे. त्यामुळे तातडीने रुग्णांवर उपचार सुरू करून नियोजनाच्या पातळीवरील कमतरता भरून काढता येईल. ऊर्जा क्षेत्रात एखादा नवा शोध लागावा, अशी अपेक्षा ओबामा यांना आहे. त्यातही त्याचा उपयोग वैज्ञानिक करू शकतील. आर्थिक क्षेत्रातही अमेरिकेने लेहमान ब्रदर्स प्रकरणात मोठा धक्का खाल्ला आहे. त्यामुळे वॉल स्ट्रीटवरील चढउतारांवर लक्ष ठेवून त्याचे विश्लेषण करण्यातही महासंगणक पूरक ठरणार आहे.

२०१२ म्हणजे पुढील वर्षी या महासंगणकाच्या निर्मितीचे काम पूर्ण झालेले असेल, पण तोपर्यंत चीन किंवा जपानसारखा देश त्यापेक्षा वेगवान महासंगणक तयार करणार नाही कशावरून? तरीही मीरा त्या वेळी महासंगणकाचा दर्जा अबाधित राखेल अशी आशा करायला हरकत नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..