विज्ञान मराठी : विज्ञानविषयक मजकूर
विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे. […]