आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे डॉ. एडमंड टेड एगर
वैद्यकीय कारणांसाठी रुग्णांना भूल देण्याचे वैद्यकीय तंत्र अॅलोपॅथीत एकोणिसाव्या शतकापासून विकसित झाले. या तंत्रात मोठी सुधारणा घडवून आधुनिक भूलशास्त्राचा विकास करणारे वैज्ञानिक व भूलतज्ज्ञ डॉ. एडमंड टेड एगर यांचे नुकतेच निधन झाले. दर वर्षी विशिष्ट औषधे श्वासावाटे देऊन भूल देण्याची प्रक्रिया आजघडीला ३० कोटी लोकांवर केली जाते. ही नवी प्रक्रिया विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. […]
