Web
Analytics
गुगलवर माहिती शोधताना काही इंटरेस्टिंग ट्रिक्स – Marathisrushti Articles

गुगलवर माहिती शोधताना काही इंटरेस्टिंग ट्रिक्स

गुगलवर हवं ते सापडत नाही? वापरा या 10 ट्रिक्स

अनेकदा आपल्याला हवा सर्च रिझल्ट गुगलवर मिळत नाही. मग ते फोटो असो वा गाणी, एखादी विशिष्ट माहिती. सर्च करताना हजारो रिझल्ट्सची यादी समोर येते. असं आपल्यासोबत नेहमीच घडतं. अशावेळी कुठल्या वेबसाईटवर आपणास अचूक माहिती मिळेल हे सांगणे कठीण जातं आणि प्रत्येक वेबसाईट उघडून पाहण्याशिवाय पर्याय उरत नाही. बर्‍याचवेळा निरनिराळ्या प्रकारची माहिती गुगलवर आपण शोधतो आणि आपल्याला हव्या असलेल्या माहितीसाठी महत्त्वाचा वेळ वाया जातो. अशावेळी कंटाळा येऊन काम लांबत जातं. पण आपणच जर आपली माहिती शोधण्याची पद्धत बदलली तर योग्य ती माहिती लवकर शोधायला गुगल आपल्याला मदत करतं आणि परिणामी आपला वेळही वाचतो.

गुगलवर माहिती शोधताना काही इंटरेस्टिंग ट्रिक्स अर्थात कि-बोर्डवरील काही विशिष्ट चिन्हांचा वापर केल्यास गुगलला आपला प्रश्न व्यवस्थित कळतो. त्यासाठी:

1. आपल्या प्रश्नामध्ये ‘ + ‘ चिन्हाचा वापर करावा : समजा गुगलवर आपणास मोबाईलची हिस्ट्री (उदा: विन्डोज 8 चा इतिहास) शोधायचा असल्यास गुगलवर ‘ Windows8 + History ‘ असे सर्च केल्यास गुगलवर हे दोन्ही शब्द असलेलीच पाने समोर दाखवितो.

2. आपल्या प्रश्नामध्ये ‘ – ‘ चिन्हाचा वापर करावा : समजा जर आपणास गुगलवर ‘sachin’ असे शोधायचे असेल. पण येणार्‍या यादीमध्ये ‘sachin tendukar’ च्या माहितीची पाने सहाजिकच जास्त असतील. अशावेळी गुगलला खास एखादा शब्द शोधू नकोस असे जर सांगायचे असेल, तर ‘sachin -tendukar’ असे टाईप करुन सर्च करावे. म्हणजे मग गुगल येणार्‍या उत्तरामध्ये ‘tendukar” हे नाव नसलेल्याच वेबसाईटची यादी दाखवेल.

3. आपल्या प्रश्नामध्ये ‘ ~ ‘ चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादी माहिती शोधताना येणार्‍या उत्तरामध्ये त्या शब्दाचा समानार्थी शब्द असल्यास ती पाने देखील गुगल दाखवितो.

4. एखाद्या ठराविक वेबसाईटवर शोधायचे असल्यास : सध्या बर्‍याच वेबसाईटवर सर्चची सेवा उपलब्ध असते तरीही एखाद्या वेबसाईटवर सर्च करण्याची सोय उपलब्ध नसल्यास गुगलवर त्या वेबसाईटचे नाव आणि आपणास शोधायची माहिती दिल्यास गुगल फक्त त्याच वेबसाईटवर ती माहिती शोधून उत्तर देतो.

उदा. ‘ www.facebook.com mobile ‘ असे दिल्यास गुगल फक्त www.facebook.com वर mobile हा शब्द शोधेल.

5. एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असल्यास : आपणास जर फक्त एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असल्यास गुगल त्या शब्दाच्या आधी ‘ define: ‘ असे दिल्यास गुगल त्या शब्दाची माहिती असलेल्याच वेबसाईटची यादी दाखवितो. उदा. ‘Define: Hard Disk ‘ असे शोधल्यास गुगल ‘ Hard Disk ‘ या शब्दाचा अर्थ सांगणार्‍या वेबसाईटची यादी देईल.

6. मिळती-जुळती वेबसाईट शोधण्यासाठी : बर्‍याच वेळेस आपणास एखादी वेबसाईट त्यावरील छान आणि उपयोगी माहितीमुळे आवडते. परंतू त्या वेबसाईट प्रमाणेच इतरही त्या विषयीच्या आणि त्याच प्रकारची माहिती असलेल्या वेबसाईट आहेत का ते शोधण्यासाठी ‘ related: ‘ या शब्दाचा उपयोग करावा. उदा. ‘ related:http://www.gmail.com/ ‘ असे शोधल्यास गुगल ‘www.gmail.com ‘ प्रमाणेच माहिती असणार्‍या वेबसाईटची यादी देईल.

7. जसाच्या तसा शब्द शोधायचा असल्यास : जर एखादा शब्द गुगलवर जसाच्यातसा शोधायचा असल्यास असल्यास त्या शब्दाच्या पुढे आणि मागे अवतरण चिन्हाचा (Double Inverted Commas) म्हणजेच ” ” याचा वापर करावा. उदा. गुगलवर “contact us” असे शोधल्यास ज्या पानावर हे दोन्ही शब्द एकत्र असतील त्याच पानांची यादी समोर देईल.

8. आपल्या प्रश्नामध्ये ‘ * ‘ चिन्हाचा वापर करावा : गुगलवर एखादा शब्द शोधताना तो शब्द पूर्ण माहित नसल्यास अथवा त्या शब्दाच्या संबंधित इतरही शब्द सापडल्यास ती देखील दाखवावी असे आपणास जेव्हा हवे असेल तेव्हा ‘ * ‘ चिन्हाचा वापर करावा. उदा. गुगलवर ‘friend* ‘ असे शोधल्यास friend ह्या शब्दासोबत friends, friendship या त्याच शब्दाशी संबंधीत शब्दांचादेखील उत्तरामध्ये विचार करतो.

9. आपल्या प्रश्नामध्ये ‘ ? ‘ चिन्हाचा वापर करावा : एखाद्या शब्दाची पुर्ण स्पेलिंग माहित नसल्यास ‘ ? ‘ चिन्हाचा वापर करावा. उदा. ‘fri??d’ असे सर्च केल्यास गुगल त्या प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य ती अक्षरे घेऊन त्या माहितीची पानं दाखवितो.

10. आपल्या प्रश्नामध्ये ‘ AND अथवा OR ‘ शब्दाचा वापर करावा : एखाद्या वेळेस आपल्याला दोन शब्दांना मिळून एकत्रित सर्च करायचे असते अशा वेळी ‘AND अथवा O ‘ शब्दाचा वापर करावा. उदा. जर गुगल मध्ये सर्च करताना ‘ Mobile or Books ‘ सर्च केल्यास गुगल ज्या पानावर या दोन्ही शब्दांपैकी एखादा जरी शब्द असल्यास ती पाने दाखवितो तर या उलट ‘ AND ‘ शब्दाचा वापर केल्यास ती दोन्ही शब्द असलेलीच पाने दाखवितो.

– तुषार भामरे

About Guest Author 512 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…