राष्ट्रीय कॅलेंडरचा वापर

राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख दररोज आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रसारण सुरु होताना सांगितली जाते. प्रमुख वर्तमानपत्रांमध्येही आतल्या पानावर रोजचे पंचांग दिलेले असते. तिथेही भारतीय राष्ट्रीय सौर तारीख दिलेली असते. रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरमध्येही या तारखांचा उल्लेख असतो. राष्ट्रीय सौर कॅलेंडरही काही संस्था प्रकाशित करु लागल्या आहेत. आपणही सौर कॅलेंडरचा वापर करु या. सुरुवात स्वतःपासून करु. […]

राष्ट्रीय कॅलेंडर आणि इंग्रजी कॅलेंडर

राष्ट्रीय आणि इंग्रजी ही दोन्ही कॅलेंडर सूर्यावर आधारित आहेत. त्यामुळे त्यात १२ महिने आणि ३६५ दिवस आहेत. प्रत्येक दिवस हा तारखेने दर्शविला जातो आणि तारीख मध्यरात्री बदलते. ऋतूंशी मेळ रहावा म्हणून यामध्ये ४ वर्षातून १ दिवस जास्त घ्यावा लागतो. त्यामुळे या शृंखलेतील चौथे वर्ष हे ३६६ दिवसांचे असते. या कारणामुळे इंग्रजी कॅलेंडर सुटसुटीत आहे. वरील सर्व गोष्टी राष्ट्रीय कॅलेंडरलाही लागू असल्यामुळे राष्ट्रीय कॅलेंडर ही वापरण्यास सोपे आणि सुटसुटीत आहे. राष्ट्रीय कॅलेंडरचा वेगळेपणा आता पाहू. […]

जुन्या गोष्टी नवे बदल (राष्ट्रीय कॅलेंडर)

भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरची ही उपेक्षा आपण किती काळ सहन करणार ? सरकारने ते करावं असं नुसतं म्हणून चालणार नाही. जनतेकडून यासंबंधीची चळवळ उभी राहिली तरच या कॅलेंडरचे अस्तित्व राहील. अन्यथा कागदोपत्री असलेले हे अस्तित्वदेखील काळाच्या ओघात नाहीसं होईल की, काय असे वाटते.  […]

भारतीय राष्ट्रीय सौर कॅलेंडर

गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. इंग्रजी कॅलेंडर आपल्या हाडी-मासी इतकं खिळलं आहे की आपण गुढीपाडवा केव्हा आहे असे विचारतो. गुढीपाडवा म्हणजे चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा ही तिथी. पण आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला जे कॅलेंडर रोज वापरतो त्या कॅलेंडरच्या भाषेत हवं असतं. ६ एप्रिलला गुढीपाडवा आहे असं म्हटलं की आपली पेटते ! […]

‘बुध’ ग्रहाचे वेगळे दर्शन अर्थात बुध अधिक्रमण

बुधाचे निरीक्षण बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. […]

भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ वर्षांनी, म्हणजे १९५२ च्या सुमारास सी.एस्.आय्.आर्. या संस्थेने पंचांग सुधारणा समिती या नावाने एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉ. मेघनाद साह भौतिकशास्त्रज्ञ तर होतेच परंतु ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. पंचांग सुधारणा समितीने आपल्या देशासाठी एक दिनदर्शिका सुचवावी असे या समितीला सांगण्यात आले. कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..