नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

ढेपे वाड्याचे संस्थापक नितीन ढेपे

वाडा या पारंपरिक भारतीय वास्तुरचनेमधील राहणीमान व त्यात नांदणारी संस्कृती नव्या पिढीला पर्यटनातून अनुभवता यावी, या उद्देशातून ढेपे वाडा वास्तू साकारण्यात आली. […]

मेजर थॉमस कँडी

मेजर थॉमस कँडी हे जन्माने ब्रिटिश असलेले लष्करी अधिकारी भारतीय भाषापंडित होते. ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले. […]

प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुधीर तेलंग

सुधीर तेलंग यांना लहानपणापासून व्यंगचित्रे काढण्याची आवड होती. सुधीर तेलंग लहानपणी तैलंगला टिनटिन फँटम आणि ब्लॉंडी यांसारखे कॉमिक्स पाहायचे. याची त्यांना भुरळ पडली होती. ज्याने त्याला व्यंगचित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. […]

ध्वनिमुद्रिका संग्राहक जयंत राळेरासकर

आपण जयंत राळेरासकर यांना अवलिया म्हणू शकतो. जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. शिक्षण बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. २००१ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरी करता करता त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा त्या मुळे १९९२ पासून सोसायटी आॕफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर मुंबई च्या संपर्कात राहिले. […]

वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक भाऊ तोरसेकर

भाऊ तोरसेकर हे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, वाचकप्रिय ब्लॉगर व लेखक असून स्थानिक राजकारणापासून ते आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करण्यात त्यांची हातोटी आहे. […]

पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर

गणेश वासुदेव मावळणकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले. […]

ज्येष्ठ गझल गायक पंकज उधास

आपल्या मलमली आवाजाने गझलप्रेमींना वेड लावणारे जगप्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांनी गझल गायकीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.आज देशातील गझल गायनातील ते एक प्रमुख गायक मानले जात.त्यांनी गझल गायनाला एक वेगळी शैली आणि आयाम प्राप्त करून दिले होती.१९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील ‘चिठ्ठी आई है..’ या गाण्याने पंकज उदास घराघरांत पोहोचले. […]

ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. […]

भारताचे माजी कसोटीपटू गुंडप्पा विश्वनाथ

गुंडप्पा विश्वनाथ हे शैलीदार स्ट्रोक प्लेयर म्हणून क्रिकेटवर्तुळात परिचित होते. गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेअर कटचे बादशहा म्हणून ओळखले जात असत. त्यांचा लेटकटही तितकाच प्रभावी असे. […]

आकाशवाणी या नावाचे जनक पं. नरेंद्र शर्मा

आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. […]

1 2 3 4 5 379
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..