भारतीय क्रिकेटला असंख्य गुणवान क्रिकेटपटू देणाऱ्या मुंबईच्या खाणीत अशीही काही अभागी रत्ने निपजली जी कधीही देशाचे प्रतिनिधित्व करू शकली नाहीत. यातले सर्वात ठळक आणि चर्चिले जाणारे नाव म्हणजे ‘पद्माकर काशिनाथ शिवलकर’. या महान डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने यंदा जीवनाच्या क्रीडांगणातून ‘एक्झिट’ घेतली. त्या फिरकीच्या जादूगाराचे हे संस्मरण. […]
उंच आणि चष्मिस अंशुमनचा कॉलेजमध्ये असतानाच १७ व्या वर्षी बडोद्याच्या रणजी संघात समावेश झाला. बडोदा आणि पश्चिम विभागासाठी ६ वर्षे धावांच्या राशी ओतल्यावर अखेर डिसेंबर १९७४ मध्ये अंशुमनचा वेस्ट इंडिजविरुद्ध कलकत्ता कसोटीसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. […]
दूर असले तरी मार्गदर्शक वाटणारे अनेक जुने तारे कालौघात निखळून पडत असतात. भारतीय क्रिकेटच्या प्रांगणातून यावर्षी आपल्यापासून दूर गेलेला, स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जुळलेला असाच एक तारा म्हणजे ‘दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड’. बडोदा (आत्ताचे–वडोदरा) येथे २७ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्मलेले ‘डीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध दत्ताजी बडोद्याच्या प्रतिष्ठित ‘गायकवाड’ राजघराण्याशी संबंधित होते. […]
भारताचे पाचवे राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचा जन्म १३ मे १९०५ रोजीं झाला. फक्रुद्दीन अली अहमद यांचे शिक्षण उत्तर-प्रदेश व दिल्ली येथे झाले. शिक्षण झाल्या वर ते १९२३ ला इंग्लैंडला गेले. तिथे कैम्ब्रिज मधून उच्च शिक्षण घेतले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. […]
ज्येष्ठ तबलावादक, लेखक पंडित निखिल घोष यांचा जन्म २८ डिसेंबर १९१८ रोजी बारीसाल या पुर्व बंगालमधील गावी झाला. निखिल घोष हे जेष्ठ बासरीवादक पन्नालाल घोष यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी आपले संगीताचे शिक्षण आपले वडील अक्षय कुमार घोष यांच्या कडे घेतले, जे सतार वाजवण्यासाठी प्रसिद्ध होते तसेच त्यांनी तबला वादनाचे शिक्षण व संगीताचे शिक्षण अहमद जान थिरकवा,अमीर […]
लता रंगाचारी हे त्यांचे लग्नाच्या आधीचे नाव. लता यांचा जन्म तामिळ कुटुंबात चेन्नई येथे झाला. त्यांनी चेन्नईच्या इथिराज कॉलेज फॉर वुमनमधून इंग्रजी साहित्यात पदवी प्राप्त केली आहे. […]
गोरा रंग, धारदार नाक, डोलदार बांधा, गालावरचा तीळ आणि नजरेतील वेधकता या वैशिष्ट्यांच्या जोरावर वैविध्यपूर्ण भूमिका साकार करत आपल्या अभिनयाच्या जोरावर थोड्याच कालावधीत रसिकांना आपलेसे करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रंजना. […]
ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. […]
भारतीय गरीब शेतकऱ्याच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. भारतासारख्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ ची स्थापना केली होती. […]