दत्ताजीराव गायकवाड – भारतीय क्रिकेटचे पितामह
दूर असले तरी मार्गदर्शक वाटणारे अनेक जुने तारे कालौघात निखळून पडत असतात. भारतीय क्रिकेटच्या प्रांगणातून यावर्षी आपल्यापासून दूर गेलेला, स्वातंत्र्यपूर्व काळाशी नाळ जुळलेला असाच एक तारा म्हणजे ‘दत्ताजीराव कृष्णराव गायकवाड’. बडोदा (आत्ताचे–वडोदरा) येथे २७ ऑक्टोबर १९२८ रोजी जन्मलेले ‘डीके’ या टोपणनावाने प्रसिद्ध दत्ताजी बडोद्याच्या प्रतिष्ठित ‘गायकवाड’ राजघराण्याशी संबंधित होते. […]
