कयाधू नदीच्या काठावरील शेवाळ हे राम शेवाळकरांचे मूळ गाव. तिथूनच त्यांच्या घरून शेवाळकरांकडे साहित्याचा वसा आणि वारसा आला. त्यांचे मूळचे आडनाव धर्माधिकारी. कालांतराने अचलपुरास वस्तीला आल्यावर शेवाळकर झाले. गोपिका बाळकृष्ण शेवाळकर या त्यांच्या आई. […]
गोगा कपूर यांचे खरे नाव रविंद्र कपूर पण ते बॉलीवूड मध्ये गोगा कपूर या नावाने काम करत असत. अनेक चित्रपटात सपोर्टींग व्हिलनची भूमिका करणाऱ्या गोगा कपूर यांनी अभिनय क्षेत्रात रंगभूमीच्या माध्यमातून पदार्पण केले. […]
जन्म.३ मार्च १९४३ रोजी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील जायगव्हाण गावी.
सामाजिक,राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या विचारांसह सांस्कृतिक कलांचा आस्वाद सर्वसामान्यांना घेता यावा, यासाठी “उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट च्या माध्यमातून अविरतपणे कार्यरत असलेल्या माधवराव खाडिलकर हे ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका आशाताई खाडीलकर यांचे पती होत. […]
सनई हे त्यांच्या कुटुंबात २०० वर्षांहून अधिक काळ वाजवण्यात येणारे वाद्य होते. अनंत लाल यांनी आपले वडील, पंडित मिठाई लाल, तसेच आपल्या काकांकडून वयाच्या नऊव्या वर्षापासून शिकवणी घेतली. […]
पिढीजात शास्त्रीय गायनाचा वारसा लाभलेले गुलाम मुस्तफा खान हे अनेक घराण्यांचे गायन आत्मसात केलेले गायक होते. त्याखेरीज ते एक संशोधक आणि व्यासंगी अभ्यासक म्हणूनही ज्ञात होते. जाती गायन, प्रकारावर त्यांचा विशेष अभ्यास झाला होता. […]
बॉलिवूडमधील व्हिलन शक्ती कपूर यांची मुलगी असलेल्या श्रद्धा कपूरने आज बॉलिवूडमध्ये आपलं वेगळे स्थान निर्माण केले आहे. सुपरहिट सिनेमा ‘आशिकी-2’ मुळे श्रद्धाची हटके अशी ओळख निर्माण झाली. […]
फिराक गोरखपूरी हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला. […]
यशोधन बाळ यांचे शालेय शिक्षण पुण्यातील विमलाबाई गरवारे येथे, व महाविद्यालयीन शिक्षण मॉडर्न कॉलेज मध्ये झाले. कॉलेज मध्ये असतानाचा फिरोदिया करंडकात चमक दाखवून यशोधन बाळ यांनी अभिनय क्षेत्रात उडी घेतली. अभिनय क्षेत्रात काम करताना सुरवातीच्या काळात १९८१ ते १९९५ मध्ये केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया मध्ये नोकरी करत होते. […]
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. […]
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. […]