Articles by विद्याधर करंदीकर
अनंत चतुर्दशी
हे व्रत भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला करतात. हे व्रत काम्य आहे. याचा कालावधी चौदा वर्षांचा आहे. गतवैभव परत मिळविण्यासाठी हे व्रत सांगितले आहे. कोणी तरी उपदेश केल्याशिवाय अगर सहजपणे अनंताचा दोरा मिळाल्याशिवाय केले जात नाही. […]
वामन जयंती
विष्णूंच्या दश अवतारातील पाचवा अवतार वामन. हा भाद्रपद शुद्ध द्वादशीला मध्यान्हकाळी श्रवण नक्षत्रावर झाला. म्हणून या दिवशी वामन जयंती साजरी करतात. या तिथीला काही भागात वामन द्वादशी असेही म्हणतात. […]
अदुःख नवमी
भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात. […]
श्रीगणेश चतुर्थी
भाद्रपद शुद्ध चतुर्थी रोजी गणेश चतुर्थी व्रत केले जाते. हे व्रत, उत्सव जवळपास संपूर्ण भारतात करतात. याला वरद चतुर्थी असेही नांव आहे.
[…]
हरितालिका तृतीया
भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. या व्रतामध्ये शिवपार्वतीचे पूजन केले जाते. […]
वराह जयंती
विष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे. […]
पोळा
हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला केला जातो. यालाच बेंदूर असेही नांव आहे. देशपरत्वे काही ठिकाणी आषाढ, भाद्रपद अमावस्येला हा सण केला जातो. पेरण्या संपलेल्या असतात, शेतीच्या कामातून बैल रिकामे झालेले असतात. अशा वेळी बैलांना न्हाऊ- माखू घालतात. आरती ओवाळतात. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. दुपारी त्यांना सजवून गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढतात. यात […]